पाऊस आणि मोबाईल

द्यायला हवा होता एक
मोबाईल पावसालाही,
कळलं असतं मग त्याला
आज कुठे बरसू आणि कुठे नाही |

Whatsapp वरून त्याला
रोज कळवले असते Updates
आणि रोज दिले असते त्याला नवीन Targets |

फोटोज व्हिडिओज बघून
त्यालाही कळली असती आपली दैना
बरसताना त्याने नक्कीच
विचार केला असता पुन्हा पुन्हा |

परफेक्ट त्याचा Performance असेल जिथे
हिरवीगार धरती आणि आनंदी शेतकरी
दिसतील त्याला तिथे
हे सर्व कळवण्यासाठी खरंच वाटतं
द्यावा त्यालाही एक Mobile |

— सौ. कल्पना संजय प्रभूघाटे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…