नवीन लेखन...

ओळख नर्मदेची – भाग सात

गरुडेश्वर दत्त मंदिर

४ : भालोद /अंकलेश्वर : (३० मार्च)

अंकलेश्वर ऐवजी भालोदला मुक्काम करून अंकलेश्वर करता निघालो. वाटेत विमलेश्वरला व कोटेश्वरला महादेवांचे दर्शन घेतले. तर रत्नेश्वर महादेवाचे दर्शन व गुमानदेव मारोतीचे, योगायोगानी हनुमान जयंती पण होती.

नर्मदा उभी आहे अशी कल्पना केली तर विमलेश्वर व कोटेश्वरला तिची पावलं आहे असं समजतात. इथुन दुपारीच पुढे रत्नसागरातुन बोटीने जायचे होते. अनपेक्षीत बोटीसाठी जास्त गर्दी असल्याने, रात्री २ वा ची वेळ मिळाली. त्यामुळे अंकलेश्वर ऐवजी भालोदलाच परत जाऊन, जेऊन, रात्री १ वा निघालो व २ वा. बोट सुरू होते त्या जागेवर पोचलो. कंपनीतर्फे सगळ्यांना सुरक्षिततेसाठी लाईफ जैकेटस दिले गेले. मी व श्री गुजर असे दोघे बस मध्येच राहिलो व बाकी लोक “मैजीक“ नी बोटी पर्यंत जाऊन रवाना झाले. आम्ही अंकलेश्वर ते भडोच झालेल्या पुलावरून बस नी ५ वा पर्यंत “मिठीतलाई”ला पोचुन बाकीच्यांची वाट बघत राहिलो. ते जवळ जवळ ७ वाजता ( ४-५ तासांचा रिस्की, कष्टकारक समुद्रातला प्रवास करुन) आले. अर्थात आल्यावर त्यांनी त्याला थ्रिल असा चांगला शब्द वापरून समाधान करुन घेतले असे म्हणायला हरकत नाही.

मग त्यांचे मिठीतलाईच्या गोड पाण्याच्या विहिरीवर हातपाय स्वच्छ करणे करुन,”भडोच“ला थांबण्या ऐवजी “दहेज” ला हॉटेल ला थोडया वेळेसाठी थांबुन,बोटी मुळे झालेला उशिर भरुन काढत (पुढचे रिझरव्हेशनस नियोजित असल्याने) घाई घाईत आंघोळी आदी करुन व तिथेच ब्रेक फास्ट करुन ,भडोच चे श्री स्वामी नारायण मंदिर, निलकंठेश्वर मंदिर, भारतातले एकमेव कुबेर मंदिर, बघुन नारेश्वर ला गेलो. नारेश्वर ही प. .पु. टेंभे स्वामींचे शिष्य श्री रंगावधुत स्वामी यांची कर्म भुमी आहे. तिथेच त्यांची समाधी आहे, तिला नमन करून, नर्मदेवर स्नान करुन, नारेश्वर शिवलिंगाचे दर्शन केले. जेऊन पुढचा मार्ग कूच करायला सुरवात केली. वाटेत “करनाळी” ला भारतातील एकमेव “कुबेर “भंडारी मंदिरात दर्शन घेतले व बहुप्रतिक्षीत गरूडेश्वरला पोचलो

५ : गरूडेश्वर : (३१ मार्च)

येथे नर्मदेचे विस्तिर्ण पात्र व फार सुंदर असा बांधलेला घाट आहे,तिथे स्नान करून,प.पु टेंभे स्वामींनी स्थापन केलेले पुरातन दत्त मंदिर आहे.तिथे त्यांना मिळालेली ३ शिरे व ६ हात असलेली दत्ताची मुर्ती आहे,शिवाय पुजेसाठी दत्ताची पितळेची छोटीशी मुर्ती आहे. अस म्हणतात की ती मुर्ती टेंभे स्वामींशी रोज बोलायची.परिसरांत टेंभे स्वामींची समाधी व त्यांच्या पादुका आहेत.त्यांच्या भक्ताला त्यांच्या पादुका हव्या होत्या तर त्यांनी त्याला दगड(शिळा) आणायला सांगितला, त्यांवर ते उभे राहिले,व दगडावर त्यांच्या पायांच्या खुणा उमटल्या.त्याच पादुका म्हणुन तो त्या घेऊन गेला.कालांतराने त्या इथे स्थापित केल्या गेल्या.

प्रत्यक्ष गुरूदेव दत्ता नंतर श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती,नंतर श्री स्वामी समर्थ,नंतर श्री टेंभे स्वामी,मग त्यांचे शिष्य श्री रंगावधुत स्वामी अश्या ,दत्त परंपरेतील सिध्द विभुतींनी नर्मदा तिरी अनेक ठिकाणी दत्त मंदिरे स्थापन केलीय.आजही त्या मंदिरांमध्ये परिक्रमावासियांना सदावर्त दिल्या जाते.
पुढचा प्रवास महेश्वर चा.वाटेत खुप मोठे सरदार सरोवर धरण लागते ,ते बघितले.ते जवळ जवळ पुर्ण होत आले आहे.महेश्वर ला पोचुन मुक्काम.

६ : महेश्वर : (१ एप्रिल )

सकाळी उठुन घाटावर स्नान केले.महेश्वर ही श्रीमंत होळकरांची राजधानी असल्याने ,राणी अहिल्याबाईं नी इथे गरूडेश्वर सारखा मोठ्ठा घाट बांधला आहे.काठावर च त्यांचा मोठा किल्ला,स्वयंपुर्ण राजवाडा आहे,ज्यात मुख्यत्त्वे मंदिर,बाग बगीचा, आहे.पुर्ण घराणे च तसे दुर्दवी ठरले .खचुन न जाता अहिल्यबाईं नी स्वत: छोट्या जागेत राहुन ,राज्यकारभार संभाळला,रियतेच्या साठी शक्य ते सर्व केले.जनकल्याणा साठी घाट ,धर्मशाळा,मंदिरे ,रस्ते ,शिक्षणा साठी शाळा,बांधणे ,जिर्णोध्दार अशी अनेक कामे कन्याकुमारी ते कश्मिर ,गुजराथ ते बंगाल ,देशभर केली.त्या देवभक्त,देशभक्त,दानशूर होत्या.राजवाडा बघितल्यावर,मंडलेश्वर साठी प्रश्थान केले.पु .टेंभे स्वामींची गुफा,राजराजेश्वर मंदिर ,चतुर्भुज रामाचे मंदिर,दत्तमंदिर, इ. बघितले.वाटेत सहस्त्रधारा,बघुन मांडवगड(मांडु ) ला गेलो.तिथे राणी रुपमती साठी रेवाकुंडात नर्मदा गुप्त रुपात आलेली आहे अशी समजुत आहे.त्या पाण्याचे व नर्मदेच्या पाण्याचे रासायनिक विश्लेषण केल्यावर दोन्ही एक असल्याची पुष्टी होते.त्यामुळेच,ती ओलांडायला नको म्हणुन एवढा हेलपाटा घालण्याचे प्रयोजन ! तिथून जवळ असलेल्या इंदोरला मुक्कामासाठी गेलो.

— सतीश परांंजपे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..