नवीन लेखन...

ओळख नर्मदेची – भाग पाच

आमची परिक्रमा जशी झाली तशी –

केल्याने देशाचे पर्यटन, सभेत संचार ।
शास्त्र न कळुजा, चातुर्य येतसे फार ॥

या उक्ती प्रमांणे ज्ञानार्जनासाठी व दैनंदिन कार्यातुन विरंगुंळा म्हणुन आपण प्रवास/सहलीला जातो. जास्त कालावधी करता शक्य असेल तर आपण लांबच्या ठिकाणी पर्यटनाला जातो. पर्यटनाव्यतिरीक्त  लांब पल्याचा पायी खडतर प्रवास, भावनेपोटी विठुरायाच्या दर्शनाला, ज्ञानदेव व तुकारामाच्या पालख्या घेऊन दर आषाढी एकादशीला वारकरी पंढरपुरला करतातच. ही झाली धार्मिक बाब . गेल्या काही वर्षांत केंद्र सरकार ने कर्मचार्यांकरता एल टी सी  योजना लागु केल्याने पर्यटनाच्या विविध सुखसोई उपलब्ध झाल्या, ज्या मुख्यत्वे  सिमला, कुलु मनाली, काश्मिर, केरळ, गोवा सारख्या सुखवस्तु ठिकाणांसाठी आहेत. अजुन ही एक मोठा वर्ग धार्मिक द्रृष्टीनी यात्रा करण्या साठी जातो व तो नेमका वरिष्ठ नागरिकत्वांचा असतो. उदा: चारधाम, वैष्णवदेवी, पशुपतिनाथ, कैलास मानसरोवर, अमरनाथ, रामेश्वर व तितकीच महत्वाची समजली जाणारी नर्मदा परिक्रमा. ह्या सगळ्याच कठीण समजल्या जातात ,नव्हे, तर आहेत,कारण सगळ्यांना वेळ खुप लागतो,कष्टदायक,शरिराला क्लेष देणार्या व बर्याच प्रमाणात निसर्गाच्या मुड वर अवलंबुन असतात.बस वगैरेने प्रवास सुसह्य ,कमी वेळात,होतो,समाधान होते पण तथाकथीत अनुभव (जसे अश्वस्थामा भेटणे, तेथील लोकांचे अगत्य,मदतीचा हांत,वगैरे.)सहसा येतीलच असे नाही.समाधान ही वैयक्तीक बाब आहे,पण उद्देशपुर्ती निश्चितच होते.

पुर्वानुभावामुळे यशोधन ट्रैव्हलस या प्रसिध्द कंपनी बरोबर जाण्याचे आम्ही उभयतांनी ठरवले. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे, २५ मार्च २०१८ रोजी पुण्याहुन रेल्वेने निघालो व २६ ता ला इंदोर ला पोहोचलो, कंपनीच्या लोकांनी उतरतांच आमचे सामान पुढे जायच्या बसमध्ये ठेवले व एका हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था होती, ते आटोपुन ओंकारेश्वरसाठी प्रस्थान केले.

माझ्या वाचनांत आले नव्हते त्यामुळे इथे आल्यावर कळले की इंदोर केंद्र सरकारच्या “स्वच्छता अभियान “स्कीमअंतर्गत,भारतातले सर्वात स्वच्छ शहर म्हणुन गौरव प्राप्त झाला आहे. तसा अनुभव आला पण. इंदोरला पुर्वी खुपदा आलो तेव्हा गलिच्छ नसले तरी इतके स्वच्छ नव्हते. राजनितिक इच्छा शक्ती असेल व नागरिकांचा सहयोग असेल तर काहीच अशक्य नाही ह्याचे हे सुंदर उदाहरण होय. तसाच फरक उज्जैन च्या बाबतीत पण झाला आहे. नंतरच्या पुर्ण प्रवासांत, सामानाची ने – आण त्यांनीच केली.

१७-१८ दिवसांचा प्रवास,म्हणुन सगळ्यांचेच सामान अर्थातच ज्यास्त व ह्या वयांत आम्हाला सामान कुठेच उचलावे लागले नाही ही केवढी सोय. बसमधे बरोबरच त्यांचे किचन युनीट असल्याने यथासमय चहा, नास्ता, जेवण नीट, व्यवस्थीत, घरच्यासारखे (तेलकट,तुपकट नाही) मिळाले ही दुसरी मोठ्ठी बाब. कंपनीचे मालक श्री प्रकाश मोळक स्वत: बरोबर असल्याने ते सगळ्यांचे हवे नको बघायचे त्यामुळे मोठ्ठा आधार वाटायचा हे सांगणे न लगे. मुख्य म्हणजे खुपच महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक ठिकाणी पोचण्याच्या आधी ते स्वत:स्थानाचे महत्व, पौराणीक संदर्भ, इतिहास, स्थानिक भुगोल, इतकी अद्यावत माहिती सांगायचे  की एखादा गाईड काय सांगेल. आम्ही १९ जण प्रवासी होतो त्यांना ते परिक्रमे संदर्भात म्हणतात तसे “मुर्ती” म्हणुन संबोधायचे. आम्ही “मैया”, ”माताजी “अगर “बाबाजी “नाही झालो हे नशिब. तिकडच्या भागांत अख्ख आयुष्य गेल्याने तिकडच्या चालीरिती, हवामान, भाषा काही नवीन नव्हते. पुर्ण प्रवासात रुटीन असे होते की सकाळी पहाटेच उठायचे (वेक अप कौल विथ tea), लगेच तयार होऊन निघायंच, निजताना चहा, बिस्कीट वगैरे, ७ते८ दरम्यान प्रवास सुरू,मोक्याच्या जागी थांबुन ब्रेकफास्ट,वाटेत कुठेतरी घाटावर थांबुन नर्मदेत कुणाकुणाच्या आंघोळी, आरती, मग पुढे जायचे. दुपारी १-२ च्या सुमारास ढाबा/हॉटेल ला थांबुन inhouse बनवलेले जेवण,मग पुन्हा प्रवास,५-६ वाजता चहा व बरोबर काहीतरी. संध्याकाळी कुठेतरी नर्मदा दर्शन, आरती (सकाळी झाले नसेल तर) आणि मुक्कामा साठी हॉटेल .तिथे जेवण व झोपायचे.संध्याकाळी आरती झाली नसल्यास सगळ्यांनी बाटल्यांमधे भरून आणलेली नर्मदा टेबलावर ठेऊन क्रमवार एका -एका मुर्तीतर्फे आरती व प्रसाद .स्तुतिपर आरती खुपच सुंदर आहे व तितकेच श्रवणीय नर्मदाष्टक.

असे रोजचे रुटीन जमले होते. नर्मदेची क्रृपा म्हणायची की वाटेत कुणाचीच तब्येत बिघडली नाही, बस व्यवस्थीत चाल, एक पंक्चर पण नाही इ. वाटेत तर खुपच देवळ आहेत, त्यापैकी ऐतिहासीक पौराणीक महत्वाची मंदिरे बघितली व नदीमध्ये फुलवातींचे दिवे सोडले. संध्याकाळी ते द्रृष्य विहंगम वाटायचे.पुर्ण प्रवासात नदी न ओलांडण्याची खबरदारी घेतलीगेली.इंदोर हुन via बडवाह, मोरटक्का ओंकारेश्वरला आलो.

— सतीश परांजपे 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..