अंकशास्त्रानुसार, तुम्ही ज्या जन्मतारखेला जन्म घेता त्या जन्मतारखेचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो. अंकशास्त्रात १ ते ९ अंक आहेत आणि या प्रत्येक अंकाचा स्वामी एक विशिष्ट ग्रह आहे. अंकशास्त्रात (Numerology) ५ हा अंक खूप खास मानला जातो. कोणत्याही महिन्याच्या ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक ५ असतो. अंक ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकाचं (Mulank) एक खास वैशिष्ट्य असतं. अंकशास्त्रात, मूलांक ५ ला ४ या अंकाचा विस्तार मानला जातो. अंक ४ जिथे मजबूत पाया आणि संरचनेचं प्रतिनिधित्व करतो, तिथे अंक ५ त्याच ऊर्जेत बदल आणि बुद्धिमत्ता वाढवतो.
मूलांक ५:
हे लोक अत्यंत बुद्धिमान, चपळ आणि कल्पक असतात, ज्यांचे प्रतिनिधित्व बुध ग्रह करतो. हे लोक निर्णय घेण्यात माहीर, व्यावहारिक आणि संवाद कौशल्यात निपुण असतात. व्यवसाय आणि नवीन गोष्टी शिकण्याची आवड हे यांचे प्रमुख गुणधर्म आहेत.
स्वभाव:
1. हे लोक तार्किक निर्णय घेणारे आणि खूप मेहनती असतात.
2. परिस्थितीनुसार स्वतःला बदलणारे आणि लवचिक स्वभावाचे असतात.
3. हे खूप मैत्रीपूर्ण असतात आणि शत्रूंनाही मित्र बनवण्याची क्षमता ठेवतात.
4. त्यांना मोकळेपणा आवडतो आणि ते साहसी वृत्तीचे असतात.
5. मूलांक ५ चे लोक हे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे असतात, जे कठीण प्रसंगातही आपल्या बुद्धीने मार्ग काढतात.
6. याशिवाय, हे लोक मोठे उद्योगपती बनतात आणि कामाच्या ठिकाणी त्यांचं खूप कौतुक केलं जातं.
7. हे लोक व्यवसायात आपल्या डोक्याचा वापर करून भरपूर पैसा कमावतात.
8. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून ते कठिणातल्या कठीण समस्येतून बाहेर पडतात. त्यांची विनोदबुद्धीही खूप चांगली असते.
9. हे लोक मेहनती असतात.
10. या जन्मतारखेचे लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. एकदा निर्णय घेतल्यानंतर हे लोक मागे हटत नाहीत.
11. एवढंच नाही तर, या लोकांचं व्यक्तिमत्त्वही आकर्षक असतं.
12. कोणाकडूनही काम करून घेण्यात माहीर असतात.
13. शत्रू बनवत नाहीत
14. मूलांक ५ असलेल्या लोकांचा सर्वांशी संमिश्र संबंध राहतो. ते कोणाच्याही जास्त आहारी जात नाहीत आणि कोणालाही सहसा शत्रू बनवत नाहीत. या अंकाचा जातकांचा संबंध अंक १,४ आणि ८ यांच्यासोबत सामान्य आणि अनुकूल राहतो. परंतु अंक पाचसाठी अंक २, ७ आणि ९ शुभ अंक नाहीत.
15. आव्हानांसाठी तयार असतात
16. हे लोक अत्यंत धाडसी असतात. कोणत्याही आव्हानांचा सहज सामना करतात. विषम परिस्थितीमधून मार्ग करण्यासाठी प्रयत्न करत राहतात. स्वतःच्या हुशारीनेच सर्व अडचणींवर मात करतात.
17. वैवाहिक जीवनात पाच मूलांक असलेले लोक भाग्यशाली राहतात. हे लोक आपल्या वागणुकीने जोडीदाराला नेहमी खुश ठेवतात.
18. या जन्मतारखेचे लोक शब्दाचे जादूगार असतात. कारण हे लोक आपल्या बोलीने इतरांना आकर्षित करतात
19. संतुष्ट जीवन जगतात
20. नोकरीपेक्षा बिझनेसमध्ये आवड मूलांक 5 असणाऱ्या लोकांना नोकरीपेक्षा बिझनेस करणं पसंत करतात. जरी या
जन्मतारखेचे लोक नोकरी करत असतील तरी कोणी ना कोणी यांच्याबरोबर साईड बिझनेस करणारा असतो. नोकरीपेक्षा जास्त हे लोक बिझनेसमधून पैसे कमावतात. या जन्मतारखेचे लोक लेखक, मॅनेजर, डॉक्टर, पत्रकार आणि ज्योतिष असतात.
21. नेहमी चिंतामुक्त राहतात
22. बुध ग्रहांमुळे मूलांक ५ असलेले व्यक्ती बुद्धिवान असतात, ते प्रत्येक गोष्ट योग्यप्रकारे समजून घेतात आणि यामुळेच एखाद्या गोष्टीचा विचार करून ते जास्त खुशही होत नाहीत आणि दु:खीही होत नाहीत. यामुळेच ते कधी कोणत्या गोष्टीची जास्त चिंता करत नाही आणि मानसिक ताण ओढवून घेत नाहीत.
23. मूलांक ५ ते म्हणतील तीच असते पूर्व दिशा. ९० टक्के सल्ले खरे ठरतात
24. हे स्वातंत्र्यप्रिय असतात, कुणाच्या बॉसिंग खाली काम करू शकत नाहीत.
25. या व्यक्ति उत्कृष संयोजक असतात आणि कोणत्याही मोठ्या कामाचे संयोजन व्यवस्थित आणि यशस्वीरीत्या करतात.
अशी असते लव्ह लाईफ:
५, १४ किंवा २३ तारखेला जन्मतारखेच्या लोकांची लव्ह लाईफ थोडी विस्कळीत राहते. या लोकांचे लग्नापूर्वी अनेक अफेअर्स असतात. तसेच या लोकांचे प्रेमसंबंध जास्त काळ टिकत नाहीत, पण लग्नानंतर त्यांचं आयुष्य चांगलं राहतं. मूलांक 5 चे लोक त्यांचं वैवाहिक जीवन फुलवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या जोडीदाराची खूप काळजी घेतात.
करिअर:
व्यापार विपणन, वकिली, पत्रकारिता, वित्त, किंवा कमिशन-आधारित कामात हे लोक खूप यशस्वी होतात. संवाद कौशल्य चांगले असल्याने ते उत्तम वक्ता किंवा सल्लागार बनू शकतात.
आर्थिक स्थिती:
मूलांक ५ चे लोक पैसा कमावण्यामध्ये खूप हुशार असतात. ते आर्थिकदृष्ट्या यशस्वी होतात, परंतु कधीकधी खर्चही वाढू शकतो.
नकारात्मक बाजू:
1. हे खूप लवकर कंटाळतात आणि एकाच जागी स्थिर राहणे त्यांना कठीण जाते (अस्थिरता).
2. घाईगडबडीत निर्णय घेणे, हे यांचे चॅलेंज असू शकते. पण त्यांचं अस्थिर आणि चंचल मन कधीकधी त्यांच्यासाठी अडथळा बनतं. ते कोणत्याही कामावर किंवा ध्येयावर जास्त वेळ लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या अपूर्ण कामांची यादी मोठी होते.
3. जोखीम घेणे: जोखीम घेण्याची त्यांची प्रवृत्ती काहीवेळा नुकसानीस कारणीभूत ठरू
शकते
4. घाई: ते निर्णय घेताना घाई करू शकतात, ज्यामुळे काहीवेळा चुकीचे निर्णय घेतले
जातात.
4. बदलांची आवड: सतत बदल हवे असल्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी जास्त काळ
टिकून राहणे कठीण होते.
मूलांक ५ च्या आणखी कांही नकारात्मक गोष्टी:
● त्यांच्या स्वभाव मूडी असतो व ते बऱ्याचदा बेचैन किंवा उत्तेजित होतात.
● या लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येण्याची शक्यता असते.
● यांच्या मनासारखे न झाल्यास त्यांना मोठे डिप्रेशन येऊ शकते व त्यातून ते व्यसनांच्या आहारी जाऊ शकतात. विशेषकरून ज्यांचा जन्म 14 तारखेस झालेला असतो ते लोक व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यता असते. जन्मांक असणारे माझे कित्येक परिचित असे आहेत की जे चेन स्मोकर आहेत, किंवा ते दारू जास्त प्रमाणात पितात.
● या व्यक्ति अपयश आले तर निराश होऊन व्यसनाधीन होऊ शकतात. अशा परिस्थितीत या व्यक्ती अविचारी बनून चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते.
● आपल्या कामाच्या बाबतीत यांच्यात बेशिस्तपणा येऊ शकतो.
● यांची अनेक अफेअर्स होऊ शकतात, तसेच यांच्या रिलेशनशिप्स तुटू शकतात.
● रुटीन कामांचा यांना कंटाळा येऊ शकतो, त्यामुळे कामे अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती यांच्यात येऊ शकते.
● यांच्यात बंडखोरपणा आणि विद्रोही वृत्ती येऊ शकते.
● यांना झटपट पैसे कमावण्याचा मोह होऊ शकतो.
भाग्यवान गोष्टी:
भाग्यवान रंग: हिरवा, राखाडी आणि हलका निळा. भाग्यवान दिवस: बुधवार. भाग्यवान अंक: ५, ६, ८.
शुभ रंग: हिरवा, शुभ रत्न: पन्ना (Emerald). ज्योतिषाच्या सल्ल्यानेच धारण करावे.
शुभ दिशा: उत्तर
लकी नंबर्स:
५ व एक अंकी बेरीज ५ येणारे नंबर्स (१४,, २३, ३२, ४१ वगैरे)
सुसंगत नंबर्स (Compatible Numbers)
१, ५, ७
विसंगत नंबर्स (Incompatible Numbers)
२,४,६,८
मूलांक ५ चे २०२६ चे राशिभविष्य:
२०२६ मध्ये मूलांक 5 असलेल्यांचे करिअर खूप यशस्वी होणार आहे. मूलांक 5 असलेल्यांना या वर्षी पदोन्नती मिळेल. या वर्षी तुम्ही करिअरशी संबंधित काही नवीन कौशल्ये देखील शिकाल. काही लोकांना परिवर्तनात्मक बदल अनुभवता येतील. व्यवसायात गुंतलेल्यांना लक्षणीय फायदे मिळतील. 2026 हे वर्ष विद्यार्थ्यांसाठीही चांगले राहण्याची अपेक्षा आहे. वैयक्तिक आयुष्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर 5 मूलांक असलेल्या लोकांचं नाते पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत होईल. ज्यांना त्यांच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करायचे आहे त्यांच्यासाठी हे वर्ष चमत्कारिक ठरेल.थोड्याफार अडचणी येऊ शकतात, पण 5 मूलांक असलेल्या व्यक्ती समजूतदारपणामुळे गोष्टी सांभाळून घेतील. त्याच वेळी, जर या मूलांकाचे लोक एखाद्यासमोर त्यांच्या भावना व्यक्त करू इच्छित असतील तर 2026६ हे वर्ष यासाठी खूप सहाय्यक ठरेल. आरोग्याच्या बाबतीत, 5 मूलांक असलेल्या लोकांना या वर्षीस्वतःची जास्त काळजी घ्यावी लागेल. खूप ताण येईल, ज्यामुळे कधीकधी अस्वस्थता जाणवू शकते. करिअरसाठी नवीन वर्ष – मूलांक 5 च्या लोकांसाठी नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने नवीन वर्ष शानदार असेल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीच्या संधी मिळतील, जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात, त्यांची प्रगती होईल. तुम्ही तुमच्या कामाचा विस्तार करू शकता कारण वेळ अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्यांच्या पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. तुमच्या पगारातही वाढ होईल. नोकरीत बदली हवी असल्यास वेळ चांगला आहे. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांशी संबधित लोकांसाठी हा संमिश्र काळ राहील. मेहनत करत रहा आणि शिस्तीने अभ्यास करा, तरच लाभ होईल. जे लोक फॅशन, दागिने, सौंदर्य सामग्री, परफ्युम किंवा क्रिएटिव्ह क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी नवीन वर्ष खूप खास असणार आहे.
सुख-सुविधांवर पैसा खर्च होईल – मूलांक 5 चे लोक नवीन वर्षात आपल्या सुख-सुविधांवर अधिक पैसा खर्च करू शकतात. तुम्ही तुमच्या घराचे इंटिरिअर बदलू शकता, गॅजेट्स, टीव्ही, फ्रीज किंवा इतर उपकरणे खरेदी करू शकता. यामध्ये तुमचा चांगला पैसा खर्च होईल. नवीन वर्षात नवीन घर किंवा फ्लॅट खरेदी करण्याचा योगही येऊ शकतो.
रस्ते अपघाताची शक्यता -नवीन वर्षात मूलांक 5 च्या लोकांना वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी लागेल. नवीन वर्षात रस्ते अपघाताची शक्यता आहे. वाहन चालवताना तुम्हाला दुखापत होऊ शकते, त्यामुळे थोडे सतर्क राहण्याची गरज आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
२३.०२.२०२३


Leave a Reply