नवीन लेखन...

निरोगी राहाण्यासाठी काय करावे – भाग आठ

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे चौदा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•

नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

आप्तोपसेवीच….
या शब्दाचा अर्थ आप्तांची सेवा असा होतो. आता आप्त कोण ? आणि सेवा म्हणजे काय ? आणि त्यांचा आरोग्याशी असलेला संबंध शोधायचा.

ग्रंथकार म्हणतात, वयोवृद्ध, तपोवृद्ध, आणि ज्ञानवृद्ध म्हणजे आप्त. आप्त म्हणजे आपलं हित जाणणारे. जे वयाने, तपाने, ज्ञानाने मोठे आहेत ते !

ही व्यक्तीच पाहिजे असे नाही, एखादा ग्रंथदेखील आपला आप्त होऊ शकतो.

अनुभवाने शहाणपण येते ते इथे. ज्यांनी चार पावसाळे जास्त पाहिले आहेत, अशा काहीना जीवनाचा अनुभव नक्कीच जास्त मिळालेला असतो. त्याचा फायदा करून घ्यावा.

अर्थात वयाचे बंधन ज्ञानाला येत नाही, म्हणूनच आदि शंकराचार्य, ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती संभाजी महाराज, आम्हाला वंदनीय आहेत. त्याच आदराने आम्ही मार्क झुकेरबर्ग किंवा जॅन कौम यांच्याकडेदेखील पाहायला शिकले पाहिजे. व्यक्तीच्या वयापेक्षा त्याने केलेल्या तपाला हे वंदन आहे.

अगदी आजोबांना वाॅटसॅप शिकवणारा त्यांचा नातू हा आजोबांसाठी आप्त होईल. सासुला पिझ्झा करायला शिकवणारी सून ही, सासुबाईसाठी आप्तच असेल,
आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या वर्क मॅनेजरला, एमबीए झालेला एखाद्या कंपनीचा तरूण वयाचा डायरेक्टर हा आप्त होईल.

पण कधी तरी अनुभवाचा, आणि वयाचाही विचार करायचा असतो. कधीतरी तपाचा तर कधी ज्ञानाचा. हे तारतम्य प्रत्येकाजवळ असेलच, असे नाही. पण ते अंगी आणावे लागेल. हेच ग्रंथकाराना सांगायचे आहे.

पाट्या वरवंट्यावर वाटणे आणि मिक्सरमधून वाटणे या साध्या क्रिया वाटतात, पण आप्तांनी सांगितलेले ऐकले तर चवीत पडणारा फरक समजतोच ना. वरवर पाहाता दोन्ही पद्धतीने तयार झालेली चटणी किंवा वाटप, यातील सूक्ष्म फरक अनुभवानेच समजतो.

चांगले आरोग्य मिळवण्यासाठी या आप्तांचा सल्ला शिरसावंद्य मानावा. भक्तीने विश्वास ठेवावा, ज्ञानाने त्यातील विज्ञान शोधून काढावे तर तपाला तपासून कर्म करावे. हेच खरे !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०३.०८.२०१७

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..