
ही कथा आहे रामायणातली, श्रीगुरुंच्या वाणीतुन आम्ही “ॐश्री” या व्याख्यानमालेत ऐकली…..
श्री राम आणि माता सीता जेव्हा अयोध्येचे राज्य सोडून १४ वर्षे वनवासासाठी जातात, तेव्हा त्या वनवासामध्ये अश्या अनेक प्रसंगाना तोंड देऊन आनंदाने आपला संसार सुरु करतात. त्याच वेळी घडलेली ही घटना….
एके दिवशी रावणाने आपल्या पापी योजनेने माता सितेचे अगदी चालाखीने अपहरण केले आणि लंकेत असलेल्या अशोकवनात काही राक्षसी दासींच्या नजरकैदत ठेवले. आपली पापी इच्छा मनी बाळगुन रावण भयंकर मोठ्या पापात सापडला होता आणि या कृत्याने त्याने आपला अंत निश्चित केला होता.
रावाणाची लंका हि समुद्रापलीकडे होती. खवळलेल्या त्या समुद्रामधून सहज लंकेत पोहोचणे अशक्य होते. इथे मार्ग म्हणुन सेतू बांधण्याचा उपाय आखला. माता सीतेला, लंकेतुन मुक्त करण्यासाठी प्रभु श्री रामांच्या वानरसेनेने लंकेपर्यंत जाणारा सेतु बांधला. ज्या सेतुला रामसेतू म्हणुन संबोधले जाते.
पण हा सेतु बांधला कसा?
आपणा सर्वांना हे माहितेय कि वानरसेनेनी अतिशय भक्ती भावाने श्री रामांचे नाव प्रत्येक पाषाणवर लिहिले. श्रीराम नामाच्या दिव्यत्व आणि त्यांच्या निस्वार्थ भक्तीच्या शक्तीवर पाण्यामध्ये सोडलेले अतिशय जड असे हे पाषाण सुद्धा तरंगु लागले. आणि हा चमत्कार रावणाच्या गुप्तचरांकडुन लंकेमध्ये पोहोचला. जेव्हा रावणाच्या कानी ही लीला ऐकु गेली तेव्हा त्याला अत्यंत क्रोध चढला, पण आच्छर्य सुद्धा तेवढेच झाले, कि हे कसे शक्य होईल. कारण साक्षात परम ईश्वररुप श्रीराम हे त्याच्या अहंकारी दृष्टीतुन एक सामान्य वनवासी होते, ज्यांनी अयोध्येचे राज्य आपल्या पितृवचनासाठी त्यागले होते. त्याला याची कल्पना नव्हती कि श्रीराम हे नाम सुद्धा परमेश्वराची दिव्य आभा आहे आणि ते स्वत: श्रीविष्णुअवतार आहेत. पाण्यात तरंगणारा पाषाण हा मर्यादा पुरुषोत्तम आणि धर्मपरायण राजा श्रीराम नामाच्या दिव्यत्वाचे प्रतिक होते.
श्रीराम नामाच्या चमत्काराने लंकेत होणारया चर्चा रावणाला सहन होत नव्हत्या. म्हणुन त्याने ईर्ष्यायुक्त काहीसा वेग़ळाच प्रयोग सुरु केला. लंकेला असे अनेक द्वार होते. सोन्याची ही लंका समुद्राला चिटकुनच बांधली गेली होती. रावण समुद्र अगदी जवळ असलेल्या कक्षात आला, तिथे त्याने काही सैनिकांना बोलावुन, त्यांना त्याच आकाराचे पाषाण आणायला सांगितले. सैनिकांनी त्याच्या आज्ञेचे पालन केले. ते लगेचच काही पाषाण घेऊन उपस्थित झाले. रावणाने सैनिकांना त्यावर त्याचे नाव “रावण” असे लिहायला सांगितले. सैनिक क्षणभर त्याच्याकडे पाहतच बसले. पण त्याच्या आज्ञेची अवहेलना करण्याचे बळ सैनिकांमध्ये नव्हते, त्यांनी त्वरित रावाणाचे नाव त्या सर्व पाषाणवर लिहिले. आणि मग रावणाने त्यांना ते पाषाण समुद्रात सोडायला सांगितले. सैनिकांनी अगदी तसेच केले. आणि लगेचच सर्व पाषाण समुद्रात बुडाले, रावणाची ईर्ष्या अधिक वाढली. त्याला क्रोध चढला. आपल्या नावामध्ये असं काय नाही, जे रामनाममध्ये आहे. त्यांने पुन्हा हाच प्रयोग दोन ते तीन वेळा आला. पण परिणाम तोच आला. आता त्याने स्वत:च्या हाताने आपले नाव पाषाणवर लिहिले आणि तो समुद्रात सोडला. तेव्हाही परिणाम तोच आला. आतल्या आत त्याचे विचार त्याला सताऊ लागले. सैनिकांच्या नजरेत आपली किंमत कमी होता कामा नये यासाठी कसेही करुन पाषाण हा पाण्यावर तरंगुन दाखवायलाच हवा. त्याने थांबुन थोडा वेळ विचार केला. आता ही बातमी लंकेत पसरता कामा नये कि या रावणाच्या नावात काहीच शक्ती नाही. म्हणुन त्याने पुन्हा स्वत:च्या हाताने आपले नाव पाषाणवर लिहिले आणि तो समुद्रात सोडण्यापुर्वी त्यावर एकटक ध्यान लावुन मनोमन म्ह्णाला कि, “शपथ तुला श्रीराम नामाची”, त्यावेळी मात्र तो पाषाण समुदाच्या पाण्यावर तसाच तरंगु लागला जसा विरुद्ध दिशेला वानरसेनेच्या हातुन श्रीरामनाम लिहिलेला प्रत्येक पाषाण तरंगत होता. ही दिव्य आभा आहे प्रभु श्रीरामनामाची.


Leave a Reply