नवीन लेखन...

नवरात्र .. माळ सातवी

उत्तर कर्नाटकामधल्या एका लहानशा खेडेगावात आपल्या आजी आजोबांबरोवर रहाणारी ती दहा बारा वर्षाची छोटी परकरी पोर ….

तिचे आजोबा निवृत्त शाळा शिक्षक .. घरी पुस्तकंच पुस्तकं आणि आजोबां प्रचंड व्यासंगी !मग काय … रोज रात्री जेवण झाल्यावर अंगणात बसून आकाशातल्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या साथीनं ती आजोबांकडून गोष्टी ऐकत असे . कधी रामायण ,महाभारत , इसापनिती कथासरितसागर , पंचतंत्र तर कधी अरेबियन नाईट्स … कधी परदेशात घडलेल्या काही प्रसंगांच आजोबा गोष्टीत रुपांतर करून तिला सांगत …

कधी तिला गावातल्या छोटया वाचनालयात घेऊन जात आणि मग ती काळ वेळेचं भान विसरून तिथे पुस्तकात रमून जाई …

असंच एका संध्याकाळी वाचनालयातून घरी येतांना आजोबांनी तिला म्हटलं ‘ मी तुला प्रसिद्ध कवितेची एक ओळ ऐकवतो तू ती पूर्ण करशील ? ‘

छोटी सुधा म्हणाली ‘ हो .. मी प्रयत्न करीन ‘
ते दोघं खूपदा हा खेळ खेळत ..त्या मुळे सुधाच्या कितीतरी कविता अगदी तोंडपाठ झालेल्या !
ते म्हणाले , ‘ जर मला पंख असतील तर .. ‘
सुधा क्षणार्धात उत्तरली ‘ मी शेजारच्या गावच्या वाचनालयात जाईन आणि खूप खूप पुस्तकं वाचीन ‘
आजोबा हसले आणि म्हणाले , ” काय मजेशीर पध्दतीनं तू पूर्ण केलीस गं कविता ! ”
घरी पोहोचल्यावर त्यांनी चटई अंथरली .. त्यावर ते बसले आणि सुधाला जवळ बसवून तिचा चिमुकला हात हातात घेतला आणि अमेरिकेतल्या अॅड्रयू कार्नेजीची गोष्ट सांगितली . ह्या कोट्याधीश कार्नेजी नं मृत्यूनंतर आपली सगळी संपत्ती अमेरिकेल्या खेडयापाड्यात वाचनालये बांधण्यासाठी दान केली होती .
ते सुधाला म्हणाले ‘मी अजून किती वर्ष जगेन , ते माहित नाही . पण तू आज ज्या पध्दतीनं कविता पूर्ण केलीस त्यावरून तुला वाचनाची किती आवड आहे ते समजतंय .. मला एक वचन दे- तु मोठी झाल्यावर तुझ्या सर्व गरजा भागून जे पैसे शिल्लक उरतील तर त्याच्यात तू निदान एका तरी वाचनालयाला पुस्तकं घेऊन देशील ! ‘

तिच्या कोवळ्या मनावर आजोबांच्या ह्या बोलण्यानं फार परिणाम झाला कार्नेजी एवढे जरी आजोबा श्रीमंत नसले तरी ज्ञान आणि अनुभवानं आलेली संपन्नता त्यांच्या जवळ निश्चितच होती … कार्नेजीची गोष्ट आणि आजोबांनी दिलेले सुंदर संस्कार , त्यांच जीवन विषयक तत्वज्ञान तिनं कायम स्मरणात ठेवत मोठी झाल्यावर पुढे जाऊन तिने भारतभर जवळ जवळ दहा हजार वाचनालयं बांधली इंन्फोसिस फाउंडेशन च्या माध्यमातून !

तिची आजी कधीच शाळेत गेली नव्हती मग छोटी सुधा आपल्या आजीला साप्ताहिकातल्या पेपरातल्या बातम्या ,गोष्टी वाचून दाखवी … आपल्याला लिहीता वाचता येत नाही याचे आजीला फार वाईट वाटे पण मग एकदा आजीने जिद्दीने ठरवले की आता लिहा वाचायला शिकायचेच अन् लहानग्या सुधाने तिला हळूहळू कन्नड लिहा वाचायला शिकवले .. नंतर आजी स्वतःच पुस्तकं , साप्ताहिकं वाचू लागली ..

तिचे आजी आजोबा खूप दानशूर!आणि कुणाला काही दयायचं झालं तर त्यांचं एकच तत्व .. आपल्याकडे जे चांगल्यात चांगलं आहे ते दयावं . निकृष्ट दर्जाचं कधीही देवू नये . .. आणि आपल्याकडे जे असेल ते देवून आपण लोकांची सेवा केली तर खऱ्या ती खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा !

ह्या अशा गोष्टी शिकत त्या आत्मसात करत करत सुधा मोठी झाली . तीला दानाचं महत्व समजत गेलं आणि ती खूप हुषार , धीट आणि ध्येयवादी ही होत गेली ..

पुढील शिक्षण बंगोलरच्या टाटा इंस्टिट्यूटला घेत असतांना एकदा कॉलेजच्या नोटीस बोर्डावरची टेल्कोची जाहिरात वाचून ती खूप अस्वस्थ झाली त्यात लिहीलं होतं की ‘ आम्हाला शैक्षणिक पार्श्वभूमी उत्कृष्ट असलेले तरुण कष्टाळू इंजिनिअर पाहिजेत . खाली टीप लिहीली होती -स्त्री उमेदवारांनी अर्ज करू नयेत ‘

खरं तर तिला पुढे कॉम्प्युटर सायन्स मधे डॉक्टरेट करायची होती नोकरीत काहीच स्वारस्य नव्हतं पण स्त्री पुरुष भेदभाव दर्शवणारी ती जाहिरातीतील टीप वाचून ते एक आव्हान समजून तिने अर्ज तर केलाच पण पोस्टकार्ड घेऊन रागात जे .आर.डीं ना पत्रही पाठवलं .परिणाम म्हणजे तिला इंटरव्हयू साठी आमंत्रणही आलं … ती निर्भिडपणे त्या मुलाखतीला सामोरी गेली .. प्रदीर्घ इंटरव्हयूनंतर तिची निवड ही झाली .. पुण्याच्या टेल्कोत शॉप फ्लोअरवर काम करणारी सुधा पहिलीच मुलगी !

पुण्यात नोकरी निमित्त असतांनाच सुधाची नारायण मूर्तींशी ओळख झाली ….मुर्ती अतिशय बुजरा शांत पण हुषार आणि प्रचंड व्यासंगी मुलगा .. आयुष्यात वेगळ काहितरी करून दाखवण्यासाठी आसुसलेला . . .दोघांचं लग्न झाल्यावर थोडयाच दिवसांनी मूर्तींनी आपली चांगली नोकरी सोडून इन्फोसिसची स्थापना केली … सुधाही आपली नोकरी संभाळत इन्फोसिसच्या उभारणीत आपले योगदान देत गेली . हळूहळू इन्फोसिस भारतातली अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी झाली . . त्यासाठी दोघांनी अपार मेहनत घेतली … त्यांनी आपली नीतीमूल्य प्राणपणाने जपत हा बिझनेस उभारला … अन् समाजाचे ऋण फेडण्यासाठी इन्फोसिस फाउंडेशन स्थापन केला ….त्या निमित्तानं सुधा भारतभर फिरली अनेक लोकांना भेटली मोठ्या पदावरील व्यक्ती ,सामान्य माणसं , गोरगरीब , विद्यार्थी .. सगळ्याकडून तिला काही ना काही शिकायला मिळालं .. तिचे अनुभव ती गोष्टी रूपात शब्दबद्ध करत गेली ….
एक प्राध्यापिका , समाजसेविका ,एक हुषार मुलगी , समजूतदार नात ह्या वेगवेगळ्या रूपात तिने लिहिलेल्या गोष्टींमधून मला ती भेटत गेली … आणि खूप आपलीशी वाटायला लागली … तिच्या सरळ साध्या पण तत्वांना पटणाऱ्या गोष्टींनी मनाला निखळ आनंद देत राहिली . .. तिच्या कथालेखनाच्या शैलीनं मला मोहवत राहिली ….आपल्यावर झालेल्या सुंदर संस्कारांमुळे धैर्य , क्षमाशीलता , कनवाळूपणा , इतरांप्रती असलेली सहानुभूती ….कर्तव्यदक्ष आणि प्रेमळ या सर्व सद्गुणांनी परिपुर्ण असलेली सुधा माझीच काय पण साऱ्या भारताची आवडती असणार यात शंका कसली ?

©️®️ दिपाली भावसार -ज्ञानमोठे

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..