नवीन लेखन...

राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी

 

राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) व निफ्टी –

 (शेअर मार्केटशी मैत्री लेख ३)

आपल्या सर्वाना १९९२ सालातला हर्षद मेहता स्कॅम आठवत असेलच. याच्यानंतर भारतीय  भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात बदल झाले. हे सर्व गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी होते. भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी १९८८ साली सेबीची स्थापना झाली आणि ३० जानेवारी १९९२ पासून सेबीला सर्व अधिकार बहाल करण्यात आले. NSDL (ऑगस्ट १९९६) व CDSL (फेब्रुवारी १९९९)  या दोन प्रमुख DEPOSITORY अस्तित्वात आल्या आणि शेअर डीमैट स्वरुपात उपलब्ध होऊ लागले. राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) ची स्थापना १९९२ साली झाली आणि नोव्हेंबर १९९४ पासून शेअरचे सौदे नियोजित पणे NSE वर होऊ लागले. NSE वर साधरण पणे १९०० कंपन्या नोंदल्या गेल्या आहेत. NSE वर सुरवातीपासूनच अत्याधुनिक स्वरुपात शेअर्स चे सौदे होऊ लागले ते पण  संपूर्णपणे इलेक्ट्रोनिक स्वरुपात. ‘सेन्सेक्स’ बॉम्बे स्टौक मार्केट चा निर्देशांक आहे तसाच ‘निफ्टी’ हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (इंडेक्स) आहे.  विविध क्षेत्रातील अग्रगण्य व आर्थिक दृष्ट्या सक्षम व मोठी उलाढाल होणाऱ्या अशा ५० “लार्ज कॅप” कंपन्यांचा समावेश निफ्टी मध्ये आहे. म्हणून हा इंडेक्स  “निफ्टी फिफ्टी”  या नावाने ओळखला जातो.

१ एप्रिल १९९६ पासून निफ्टी हा इंडेक्स अस्तित्वात आला. या इंडेक्सचे बेस वर्ष १९९५ हे आहे तर  इंडेक्स १००० अंक मानला गेला आहे. भारतातील विविध क्षेत्रातील अग्रगण्य अशा NSE वर नोंदल्या गेलेल्या ५० “लार्ज कॅप” कंपन्यांना “निफ्टी फिफ्टी” इंडेक्स मध्ये स्थान मिळाले आहे. निफ्टी मध्ये कंपनी समाविष्ट होण्यासाठी साधारण सेन्सेक्स प्रमाणेच नॉर्म्स आहेत तसेच निफ्टीमध्ये समाविष्ट केलेल्या कंपन्यांचा नियमित पणे परामर्श घेतला जातो. जुन्या कंपन्या जाऊन नवीन समाविष्ट होत असतात. बहुतेक दिग्गज ब्लू चीप कंपन्या निफ्टी व सेन्सेक्स या दोन्ही इंडेक्स मध्ये समाविष्ट आहेत मात्र त्यांच्या दोन्ही इंडेक्स मधील वेटेज कमी ज्यास्त असू शकते. निफ्टी मध्ये कोणती कंपनी समविष्ट करावी या बाबत NSE ची संबधित समिती निर्णय घेत असते. निफ्टी फिफटी हा एक व्यापक निर्देशांक असून यात भारतातील १२ सेक्टरमधील ५० अग्रगण्य कंपन्यांना  प्रतिनिधित्व मिळाले आहे. प्रामुख्याने  ‘निफ्टी फिफ्टी’ मध्ये “बँकिंग व फायनान्स’ मधील कंपन्यांना ज्यास्त वेटेज आहे (३७.१८ %).  त्यामुळे निफ्टी चा performance प्रामुख्याने बँकिंग व फायनान्स क्षेत्राच्या performance वर अवलंबून आहे. खाली “निफ्टी फिफ्टी” मधील विविध सेक्टरचे वेटेज दिले आहे.

 

अनुक्रमांक सेक्टर निफ्टी मध्ये वेटेज %
बँकिंग व फायनानशिअल सर्विसेस ३७.१८
एनर्जी १५.४४
आय टी १४.८२
कन्झुमर गुड्स १०.८०
ऑटो ६.५९
मेटल ३.८१
कनस्त्रक्षण ३.६९
फार्मा २.५३
सिमेंट व सिमेंट प्रोडक्ट १.६३
१० टेलीकॉम १.५३
११ खत आणि पेस्टीसीड्स ०.७७
१२ मिडिया व करमणूक ०,६०
१३ सर्वीसेस ०.५९

 

निफ्टी मधे समाविष्ट असणाऱ्या कंपन्यांची नावे.(दिनांक २५ एप्रिल १९१९ )

अनु क्र कंपनीचे नाव अनु क्र कंपनीचे नाव
 रिलायन्स इंडस्ट्रीज २६ इंडस इंड बँक
टाटा कन्सलटनसी सेर्विसिस २७ टायटन
एच डी एफ सी बँक २८ पौवेर ग्रीड
हिंदुस्थान युनिलिवर २९ बजाज ऑटो
आय टी सी ३० महिंद्र & महिंद्र
एच डी एफ सी ३१ अडाणी पोर्ट
इंफोसिसीस ३२ टेक महिंद्र
 स्टेट बँक ऑफ इंडिया ३३ भारत पेट्रोलियम
कोटक महिंद्र बँक ३४ गेल
१० आय सी आय सी आय बँक ३५ ब्रिटानिया
११ ओ एन जी सी ३६ टाटा मोटर्स
१२ मारुती सुझुकी ३७ जे एस डब्लू स्टील्स
१३ एक्सिस बँक ३८ वेदान्ता
१४ लार्सन and टुब्रो ३९ ग्रासिम
१५ विप्रो ४० टाटा स्टील्स
१६ बजाज फायनान्स ४१ इचर मोटर्स
१७ भारती ऐअरटेल ४२ येस बँक
१८ कोल इंडिया ४३ हिरो मोटोर कॉर्प
१९ एच सी एल टेक ४४ भारती इन्फ्रा
२० इंडिअन ओईल ४५ युनायटेड फॉस्फरस
२१ एशियन पेंट्स ४६ डॉक्टर रेड्डीज
२२ एन टी पी सी ४७ सिप्ला
२३ अल्ट्रा टेक सिमेंट ४८ हिंदाल्को
२४ बजाज फिन सर्विसेस ४९ झी एन्टरटेनमेंट
२५ सन फार्मा ५० इंडिया बुल होऊसिंग फायनान्स

 

“निफ्टी फिफ्टी” इंडेक्स पण सेन्सेक्स प्रमाणेच मोजला जातो. या इंडेक्स मधील अंतर्भूत  ५० कंपन्यांच्या ‘फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशनच्या’ बेसिस वर निफ्टी इंडेक्स मोजला जातो. त्यासाठी base year १९९५ आहे आणि निफ्टी फिफ्टी १००० अंक. त्यामुळे निफ्टी कॅलक्युलेशन खालील प्रमाणे. समजा बेस year निफ्टी फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन आहे रु. ८०००० तेव्हा निफ्टी १००० अंक. आता  निफ्टी कंपन्यांचे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन झालंय रु.५००००० तेव्हा निफ्टी होईल

१००० ÷ ८०००० × ५००००० = ६२५० अंक

 

अशा प्रमाणे निफ्टी मोजला जातो, ११९५ साली १००० अंक असणारा निफ्टी आज १२००० च्या जवळ पोचलाय. २००० सालाच्या आसपास डेरीवेटीव – FUTURE/OPTIONS मार्केट सुरु झाले आणि मार्केट टर्नओवर मध्ये प्रचंड वाढ झाली. त्यामुळे “निफ्टी फिफ्टी’ या निफ्टीच्या मुख्य इंडेक्स बरोबर NSE वर अनेक इंडेक्स अस्तित्वात आले. उदा. “निफ्टी नेक्स्ट फिफ्टी’  “निफ्टी १००” ‘ निफ्टी मिड कॅप” “निफ्टी स्मौल कॅप” तसेच विविध सेक्टरचे इंडेक्स उदा. ‘निफ्टी बँक’ ‘निफ्टी फार्मा’ ‘निफ्टी एफ एम सी जी’ ‘निफ्टी आय टी’ इत्यादी. या सर्वांमध्ये  निफ्टीचा performance दर्शवणारा मुख्य इंडेक्स म्हणाजे “निफ्टी फिफ्टी” ज्याप्रमाणे सेन्सक्स ने गुंतवणूकदारांना चांगला लाभ मिळवून दिल्या तशीच निफ्टीने पण आकर्षक रिटर्न्स दिलेत. १९९५ सालापासून आजपर्यंत निफ्टीची वाटचाल खालील तक्त्यात दाखवली आहे.डिसेंबर वर्ष अखेरची निफ्टी लेव्हल दाखवली आहे. गेल्या पंचवीस वर्षात वर्ष अखेर तुलना करता सहा वर्षात निफ्टी मध्ये घट झालेली दिसतेय (लाल रंगात दाखवली आहे) बाकी वर्षात निफ्टीने वाढ दाखवली आहे.

निफ्टी गेल्या पंचवीस वर्षाची वाटचाल.

वर्ष निफ्टी वर्ष निफ्टी
१९९५ ९०९ २००८ २९५९
१९९६ ८९५ २००९ ५२०१
१९९७ १०७९ २०१० ६१३५
१९९८ ८८४ २०११ ४६२४
१९९९ १४८० २०१२ ५९०५
२००० १२६४ २०१३ ६३०४
२००१ १०५९ २०१४ ८२८३
२००२ १०९४ २०१५ ७९४६
२००३ १८८० २०१६ ८१८६
२००४ २०८१ २०१७ १०५३१
२००५ २८३७ २०१८ १०८६३
२००६ ३९६६ २६ एप्रिल २०१९ ११७५५
२००७ ६१३९    

 

वरील तक्त्या वरून आपणाला सहज समजेल की निफ्टी मध्ये केलेली दीर्घकालीन  गुंतवणूक लाभदायक ठरते आहे, निफ्टी व सेन्सेक्स हे दोन मोठे इंडेक्स शेअर बाजाराची स्थिती दाखवत असतात. याच धर्तीवर निफटीचे सेक्टर स्पेसिफिक निर्देशांक त्या त्या सेक्टरची दिशा दाखवतात. निफ्टी व सन्सेक्स मध्ये होणारी तेजी इतर निफ्टी सेन्सेक्स बाहेरील असणाऱ्या शेअर्सना पण अप्रत्यक्ष रित्या लाभ मिळवून देत असते. आज आपण सेन्सेस्क्स निफ्टी मधील एखादा शेअर घ्यायच्या ऐवजी  डायरेक्ट सेन्सेक्स, निफ्टी किंवा सेक्टर स्पेसिफिक निर्देशकांमध्ये गुंतवणूक करू शकतो. ही गुंतवणूक प्रामुख्याने डेरीवेटीव  मार्केट (future व options ) मधून करता येते. मात्र त्यासाठी डेरीवेटीव मार्केटचा खूप अभ्यास करावा लागेल. याबाबत आपणाला विविध शेअर विषयक channel वर माहिती व सल्ला मिळू शकतो.

अनेक मुच्युअल फंड/ETF गुंतवणूकदारांना निफ्टी सेन्सक्स मध्ये गुंतवणूक करण्याची संधी त्यांच्या अनेक योजनातून देतात. तसेच सेक्टर स्पेसिफिक पण फंड असतात. आज आपल्या देशाचे शेअर मार्केटची स्थिती निफ्टी व सेन्सेक्स दाखवतात. या दोन्ही इंडेक्स मध्ये होत असलेली वाढ आणि गुंतवणुकीवर मिळणारे रिटर्न्स यामुळे परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. NSE वरील  सेक्टर स्पेसिफिक विविध इंडेक्स मुळे   इकॉनॉमीमध्ये कोणता सेक्टर perform करतोय कोणता सेक्टर मागे पडतोय याचा अंदाज येऊ शकतो व गुंतवणुकीचा ओघ साहजिकच performing सेक्टर कडे वळतो. शेअर बाजारात सतत हे रोटेशन चालू असते.

— विलास गोरे

(वरील लेखासाठी  विविध शेअर विषयीच्या वेबसाईटचा आधार घेतला आहे).

 

 

 

Avatar
About विलास गोरे 19 Articles
मी आय डी बी आय बँकेत एन पी ए विभागात (कर्ज वसुली) व्यवस्थापक पदावर काम करतो, मला ३५ वर्षाहून अधिक काळ बँकेच्या विविध विभागात काम करण्याचा अनुभव आहे, मी कॉमर्स पदवीधर असून कायद्याचा अभ्यास पण पूर्ण केला आहे (B, COM , L L B). मी शेअर मार्केट मध्ये नियमित गुंतवणूक करतो व शेअर मार्केट व इतर investment चा मला २५ वर्षाहून अधिक अनुभव आहे. मला हिंदी चित्रपट संगीत, मराठी साहित्य, किल्ल्यांवर भटकंती तसेच इतर पर्यटन याची आवड आहे.मी काही कथा , लेख,व्यक्तिचित्रण लिहू इच्छितो.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..