नवीन लेखन...

माय – लेक

स्वाती जोशी यांचा हा लेख WhatsApp वरुन आला आणि मनाा भावला. म्हणूनच ुमच्यासाठी शेअर करतोय. 


रात्रीचे साडेअकरा वाजून गेले होते. अंथरूणाला पाठ टेकणार, इतक्यात एकाएकी लक्षात आलं की आपण गडबड करून ठेवलीये. ऊद्या पहाटे ऊठून डबा करायचाय आणि कणिक भिजवायची राहिलीये.

स्वत:वरच चरफडत बाहेर आले. स्वैपाकघरातली माझी खुडबुड ऐकून अभ्यास करत बसलेला मुलगा आत आला.

– हे काय? आत्ता काय करतीयेस ? झोपायला गेली होतीस ना?
– अरे, पहाटे डबा द्यायचाय अन् मी कणिकच भिजवायला विसरले.
आजकाल ना मी काय काय विसरेन काही सांगता येत नाही.
– ममा, तू दमलीयेस. दे, मी भिजवतो कणिक.
(मला कौतुकाने हसूच आलं.)
– किती शहाणं माझं पिलू. राहू दे रे. तू बोललास यातच आलं सगळं.

तोपर्यंत मी परातीत पीठ घेतलं होतं आणि पाणी घेतलं.
पण याने खरंच परातीचा ताबा घेतला की…
आणि मला विचारत विचारत कणिक पटकन भिजवली सुद्धा, आयुष्यात पहिल्यांदाच.

(मीसुद्धा इतकी सहज आणि इतकी छान भिजवली नव्हती पहिल्या प्रयत्नात.)

त्याची ताकद जास्त असल्याने कणिक जरा घट्टच झाली. मग दुसऱ्या दिवशी त्याला मी भिजवलेली कणिक दाखवून बोटं खुपसून दोन्हीतला फरक दाखवला. तर पठ्ठ्याने पुढच्याच दिवशी हुबेहूब तश्शी कणिक भिजवून दाखवली की हो.

खेळीमेळीत गंमतीत मी रोज त्याला दिवसातून एकदा तरी त्याला चिडवायला पेटंट डायलॉग ऐकवते… ‘काश, मुझे एक बेटी होती’
अर्थात मनात म्हणतेच ‘तुम ना होते तो राम जाने मेरा क्या होता ‘
पर सचमुच ऐसे लडके पे तो जान कुर्बान है…..

ही पोस्ट मुद्दाम टाकायची पार्श्वभूमीही सांगते.
विशाखाताईंनी Vishakha Abhyankar चिमणी दिनाच्या दिवशीची लाडक्या लेकींवरची पोस्ट टाकली होती ना…

त्यावरच्या कॉमेंट्समधे ‘आमच्या पोटी मुलगी नाही’ ही खंत मी आणि Rajani Joshi ने व्यक्त केली आणि आमचे हे कावळे पोट्टे नाराज झाले असं माझ्या लक्षात आलं…..

तेव्हा लक्षात आलं की आपण या मुलग्यांना किती गृहित धरतो.

त्यांची सळसळती ऊर्जा, वजनदार पिशव्या-सामान झटकन् ऊचलून पटापटा जिने चढून जाणे, त्यांचं दिलखुलास गडगडाटी खिदळणं (आणि रागाने धुमसणंही), तासनतास टीव्हीवर खेळ वगैरे पहात बसणे, खूप बडबड केली तरी खरंखुरं पोटातलं फारसं कधी ओठांवर येऊ न देणे, हळूच आरशात मागून पुढून पाहून बॉडी, कट्स, हेअरस्टाईल किंवा दाढी-मिशा निरखत रहाणे.
एवढा मोठा झाला तरी मधेच दिसून येणारी निरागसता आणि त्यामुळे या भयंकर जगात आपल्या पिलाचं काय होईल याची वाटणारी काळजी.
अजूनही त्याचं कुशीत शिरून लाडीगोडी लावणं आणि पुढच्याच क्षणाला ‘तुम्ही बायका ना…. ‘ असली काहीतरी शेरेबाजी करून रागाला आणणं…

काहीही म्हणा… ये सबकुछ ऊतनाही प्यारा लगता है….खरंच घरात एक मुलगा वाढताना पहाणे ही फार फँटँस्टिक गोष्ट आहे.

मुली कशा खूप बडबड करतात, हक्काने राग, लोभ, प्रेम व्यक्त करतात. पण मुलांना हे जमत नाही तर आपण त्यांना गृहितच धरू लागतो ……म्हणून मुलग्यांचं कौतुक करण्यासाठी ही खास पोस्ट.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..