नवीन लेखन...

‘कलावैभव’ नाट्यसंस्थेचे मालक मोहन तोंडवळकर

मोहन तोंडवळकर यांचा जन्म १८ मार्च १९३४ रोजी काळसे रेवडी मालवण येथे झाला.

काहीएक रिस्क घेऊन वेगळ्या प्रकारची नाटके करण्याची धमक मोहन तोंडवळकर यांच्यात होती. त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्यासही ते मागेपुढे पाहणारे नव्हते. मोहन तोंडवळकर हे व्यावसायिक नाटय़निर्मात्यांमधले ‘प्रायोगिक निर्माते’ म्हणून ओळखले जात. राज्य नाटय़स्पर्धा तसेच इतरत्र होणाऱ्या नव्या नाटकांच्या प्रयोगांना आवर्जून उपस्थिती लावून त्यातलं एखादं नाटक वा कलाकार त्यांच्या रत्नपारखी नजरेस पसंत पडला की व्यावसायिक गणितं बाजूला ठेवून, ते त्यांना व्यावसायिक रंगभूमीवर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत. विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, सई परांजपे, महेश एलकुंचवार, सुरेश खरे ते किरण पोत्रेकर, योगेश सोमणपर्यंत त्या-त्या काळातील नव्या लेखकांना त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचं धाडस दाखवलं. साहस हे त्यांच्या रक्तातच होतं. ते करताना त्यांनी परिणामांची कधीच पर्वा केली नाही. ‘काचेचा चंद्र’,‘हिमालयाची सावली’,‘वाडा चिरेबंदी’, ‘मला उत्तर हवंय’,‘महासागर’,‘पुरूष’,‘जास्वंदी’,‘माणसाला डंख मातीचा’, ‘सावित्री’,‘पर्याय’,‘दुसरा सामना’,‘गोष्ट प्रेमाची?’,‘नातीगोती’,‘राहिले दूर घर माझे’,‘राव जगदेव मरतड’,‘शॉर्टकट’,‘एक हट्टी मुलगी’,‘अपूर्णाक’,‘कस्तुरीमृग’, ‘नांदा सौख्यभरे’,‘नल-दमयंती’,‘पाऊलखुणा’,‘महायोग’,‘मी राष्ट्रपती’,‘सौभाग्य’,‘वन रूम किचन’,‘कार्टी काळजात घुसली’,‘लफडा सदन’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘लपंडाव’,‘अचानक’,‘प्रासंगिक करार’ ते ‘शंभुराजे’पर्यंत कलावैभवने निर्मिलेल्या नाटकांचं वैविध्य पाहिलं तर मोहन तोंडवळकर यांच्या नाटय़निर्मितीच्या कक्षा किती लांब-रुंद आणि सखोल होत्या याची कल्पना येते. नाना पाटेकरांपासून डॉ. अमोल कोल्हेंपर्यंत अनेक कलावंतांना मोहन तोंडवळकर यांनी आपल्या नाटकांतून पुढे आणलं. परंतु याचं श्रेय मात्र त्यांनी कधीच घेतलं नाही. ‘जो-तो आपापल्या कर्तृत्वानं पुढे येतो. मी फक्त निमित्तमात्र ठरलो. त्यात कसलं श्रेय घ्यायचं?,’असा त्यांचा सवाल असे.

मोहन तोंडवळकर यांचं वाचन उत्तम होतं. त्यामुळे संहितेतलं वेगळेपण त्यांना लगेचच जाणवे. लेखकाच्या प्रभावी नाटय़वाचनाला भुलून त्यांनी कधीच नाटकं स्वीकारली नाहीत. याबाबतीत ते स्वत:व्यतिरिक्त दुसऱ्या कुणावरही सहसा विसंबले नाहीत. नाटकाच्या बुकिंग प्लॅनवर एक नजर टाकली तरी त्यांना त्या नाटकाचं भवितव्य कळे. त्यामुळेच आपल्याला आवडलेलं नाटकही त्यांनी चालत नसताना कधी हट्टाग्रहानं सुरू ठेवलं नाही. लगेचच ते नाटक बंद करीत आणि पुढच्या नाटकाकडे ते वळत. अर्थात त्यापुढचं नाटकही ते धंद्याचं गणित मांडून करतील, असंही कधी घडलं नाही.

कलावैभव संस्था काढण्याआधी ते जुनी नाटकं कंत्राटी पद्धतीनं लावीत. त्यासाठी बीपीटीतल्या आपल्या सहकाऱ्यांकडून ते कर्ज वगैरे काढत. मात्र व्यवहार चोख असल्यानं त्यांना हवे तेव्हा पैसे उभे करता येत. पण तोंडवळकरांनी एकाच उद्योगात स्वत:ला कधी अडकवून घेतलं नाही.

त्यांनी नाटकांबरोबरच सीरियल्स, टेलिफिल्म्सचीही निर्मिती केली. त्यांना चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात उतरण्याची ऑफर दस्तुरखुद्द दादा कोंडके यांनी दिली होती. परंतु तोंडवळकर चित्रपट क्षेत्रापासून मात्र का कुणास ठाऊक, कटाक्षानं दूर राहिले. पल्लवी ॲ‍डव्हर्टायझिंग ही जाहिरात संस्था काढून जाहिरातीची कामंही ते करीत. एखाद्याची एखादी गोष्ट आवडली तर त्या व्यक्तीला आवर्जून फोन करून ते कळवीत. नाटय़क्षेत्रात ही गोष्ट तशी दुर्मीळच म्हणावी लागेल. कुठलीही गोष्ट करताना फळाची अपेक्षा न धरता करणं, ही साधारणत: योग्यालाच साध्य होणारी गोष्ट तोंडवळकरांना साध्य झालेली होती.

ते नेहमी म्हणत, ‘मी ‘आज’ जगतो. काल किंवा उद्याबद्दल मी बिलकूल विचार करीत नाही.’ त्यामुळेच ते नेहमी ‘आज’ला सामोरे गेले आणि म्हणूनच कायम समकालीन राहू शकले. जे. कृष्णमूर्तीच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता. वरकरणी ते आध्यात्मिक वृत्तीचे वाटत नसले तरी अंतर्यामी मात्र ते सगळ्यापासून अलिप्त असत. प्रायोगिकांना व्यावसायिक रंगभूमीवर काहीएक सादर करायचं असेल, त्या प्रत्येक वेळी एक खंदा आधारस्तंभ होता.

मोहन तोंडवळकर यांचे ६ ऑगस्ट २०१० रोजी निधन झाले.

‘मोहनशेठ’ नावाचं पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं.’ हे आपलं विधान चुकीचं आहे. सदर पुस्तकाचं संपादन मी आणि रामविजय परब यांनी केलं होतं आणि ‘डिंपल पब्लिकेशन’नं ते प्रकाशित केलं. त्याचं प्रकाशन आम्ही ‘मोहनशेठ अमृत महोत्सवी’ समारंभात शिवाजी मंदिर येथे ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यनिर्माते प्रभाकर पणशीकर यांच्या हस्ते झालं होतं. अध्यक्षस्थानी ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर होते. विजया मेहता, नाना पाटेकर, गंगाराम गवाणकर हेही यावेळी उपस्थित होते. ‘मोहनशेठ’ या पुस्तकामध्ये एकूण ७५ रंगकर्मींचे मोहनशेठ यांच्या संबंधातील लेख अंतर्भूत आहेत.

— अरूण घाडीगावकर.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..