नवीन लेखन...

महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्यावर समताधिष्ठित समाजासाठी सत्याग्रह केला. चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला गुलामगिरी व अस्पृश्यतेच्या अनिष्ट प्रथेतून मुक्ता केले. अस्पृश्याच्या भिंती गाडून इथल्या वर्षानुवर्षे वाट पाहत असणाऱ्या पददलितांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी हा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले. महाडमध्ये हा दिवस प्रतिवर्षी “क्रांतिदिन” म्हणून साजरा केला जातो.

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक सत्याग्रह तथा आंदोलने झाली. पण आपल्याकडे म. गांधींनी केलेल्या सत्याग्रहांचा इतिहास आपल्याकडे सातत्याने शिकविला आणि चर्चिला जातो.आपल्याला पाठ्य पुस्तकाच्या अभ्यासक्रमात आवर्जून आणि कायमचा आढळणारा सत्याग्रह करणारे म . गांधी आणि कसला तर मिठाचा.पण का काढली हे जर कोणाला विचारलं तर याच कारण नाही देता येत .असो,जेव्हा ब्रिटीशानी एक नवीन कायदा केला कि आता मिठावरही कर (टॅक्स ) द्यावा लागेल आणि हा कर रद्द करण्यासाठी दांडी यात्रेचं आयोजन केलं. मीठ चवीसाठी वापरात असत आणि सर्वाना त्याकाळी उपलब्ध होते आणि कोणाला मीठ मिळालं नाही अशी त्याकाळी घडलेली कोणतीही घटना हि नाही . पण जर का माणसाला पाणीच मिळाले नाही तर काय होईल याची कल्पना करा जरा .

आज आपण २१ व्या शतकात पाहतोय काही शहरी भागात तर खेड्यापाड्यात पाणी टंचाई आहे ती आणि पाणी न मिळाल्यामुळे किती लोकांना जीवाला मुकावं लागत ते .आणि जर इतिहासावर नजर टाकली तर काय दिसत एक भयाण सत्य. जे मुळात अभ्यासक्रमात टाकण्याची फार गरज आहे. कारण गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहपेक्षा महत्त्वाचा सत्याग्रह म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ” चवदार तळ्याच्या सत्याग्रहा “कडे पहावे .कारण महाडचे चवदार तळे अजरामर झाले ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहामुळे.१९ मार्च १९२७ रोजी डॉ.आंबेडकरांनी महाडमध्ये पहिली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद घेतली होती आणि याच्या दुसर्याब दिवशी चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून सत्याग्रह केला होता.हा सत्याग्रह केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नव्हता, तर उभ्या देशाला प्रेरणा देणारा होता.

सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून मुंबई विधान परिषदेतील सदस्य रावबहादूर सीताराम केशव बोले यांनी ४ ऑगस्ट १९२३ रोजी मांडलेला एक ठराव संमत झाला होता. या बोले ठरावात असे म्हटले गेले होते की, ‘सार्वजनिक तळी, धर्मशाळा, मंदिरे, विद्यालये, न्यायालये आदी जी सरकारी खर्च वा अनुदानाने बांधली वा चालविली जातात, त्यात अस्पृश्यांना मुक्तखद्वार असावे.’परंतु हा ठराव फक्त चोपडी बंद होता अस्पृश्याचे होणारे हाल आपेष्टा काही पुढार्यानाही पाहवत नव्हते . म्हणून बोलेंनी पुन्हा एकदा ५ ऑगस्ट १९२६ रोजी त्याचे कायद्यात रूपांतर केले. त्याचबरोबर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ( ज्यांना सरकार कडून अनुदान मिळते अश्या मंदिर, धर्मशाळा, दवाखाने इ )ठरावाची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांचे अनुदान बंद करण्याची तरतूद केली. अनुदान बंद झाल्यावर व्यवहार ठप्प होणार असल्याने मुंबई राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या क्षेत्रात अंमलबजावणीचे ठराव पास केले. पुढे फेब्रुवारी १९२७ मध्ये डॉ. आंबेडकर यांची मुंबई विधानसभेवर नियुक्तीस झाली. त्यांनी १९-२० मार्च १९२७ रोजी तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील महाड नगरपालिकेच्या हद्दीत या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे पक्के ठरवले. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक सहकारी कार्यरत होते. शिवाय गंगाधरपंत सहस्रबुद्धे, अनंतराव विनायकराव चित्रे, सुरबानाना टिपणीस, प्रधान बंधू आदी मंडळीही आघाडीवर होती. त्यांच्याबरोबर संभाजी तुकाराम गायकवाड, सुभेदार विश्राम सवादकर, आर. बी. मोरे, शिवराम जाधव, खोलवडीकर, आड्रेकर, गुडेकर, पां. न. राजभोज, एन. टी. जाधव ,दादासाहेब गायकवाड आदी शेकडो कार्यकर्त्यांनी महाडच्या चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा सत्याग्रह करण्याचे ठरवले. यासाठी एका परिषदेची आखणी करण्यात आली. बोले ठरावाची अंमलबजावणी करण्याचा ठराव महाड नगरपालिकेनेही केला होता. या ठरावाची अंमलबजावणी करणार्यास परिषदेचे अध्यक्ष स्वतः बाबासाहेब होते.

या परिषदेच्या पहिल्या दिवशी १९ मार्चला या ठरावावर भाषणे झाली. या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणाले होते की, ‘हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी मूलभूत हक्कांहसाठी आहे. चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आम्ही अमर होऊ, अशातला भाग नाही. आजपर्यंत चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो, तर तुम्ही-आम्ही काही मेलो नव्हतो. त्यामुळे चवदार तळ्यावर केवळ पाणी पिण्यासाठी जायचे नसून इतरांप्रमाणे आम्हीही या समाजातील माणसे आहोत, हे सिद्ध करण्यासाठी.’ अशा आशयाचे प्रतिपादन केल्यानंतर दुसर्याा दिवशी म्हणजे २० मार्च रोजी सकाळी रांगेने जाऊन चवदार तळ्याचे पाणी पिण्याचे ठरवण्यात आले.

तलावाच्या चारही दरवाजांतून सत्याग्रही तळ्याच्या काठावर आले व त्यांनी स्वत:च्या ओंजळीने पाणी प्राशन केले. प्रस्थापित वर्णवर्चस्ववादी शक्तींसना हे रुचणारे नव्हते. साहजिकच, या सत्याग्रहानंतर एक प्रचंड विरोधी लाट आली. सत्याग्रहींना मारहाण झाली. जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना बाबासाहेबांनी स्वत: दवाखान्यात नेऊन पोहोचवले. कालांतराने या कार्यकर्त्यांवर हल्ले करणार्यास लोकांवर खटले चालवून त्यांना शिक्षाही देण्यात आली. यासाठी महाडच्या न्यायालयात बाबासाहेब लढले. या एका लढ्यामुळे ठिकठिकाणचे पाणी पेटले.आणि पुढे देशभरातील लोकांनी या विरुद्ध आवाज उठविला आणि अश्या प्रकारे समाजात अभूतपूर्व क्रांती झाली. या समाजाचा स्वाभिमान जागा झाला आणि गुलामगिरीच्या बेड्या तुटण्यास सुरुवात झाली. भारताच्या इतिहासातील एक मोठा क्रांतिकारी लढा आणि जगातील एकमेव असा लढा जो पाण्यासाठी करण्यात आला होता.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4238 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..