नवीन लेखन...

गुजरातच्या सक्षम सागरी सुरक्षेकरता

नऊ सप्टेंबरला समुद्राकडून गुजरातच्या कच्छच्या रणात दहशतवादी हल्ला करण्याकरता ५० दहशतवादी तयार आहेत असा इशारा बॉर्डर सिक्यूरिटी फोर्सने दिला. भारतीय सैन्याच्या सदर्न कमांडचे मुख्य जनरल सैनी यांनी पण कच्छच्या रणात मध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा इशारा दिला आहे.आठवत असेल की दोन आठवड्या पूर्वी नौदल प्रमुख यांनी समुद्रातून पाण्याखालून दहशतवादी हल्ला होऊ शकतो असा इशारा दिला होता.

गुजरातचे भूराजकीय स्थान

पाकिस्तान आणि आखाती देशांशी असलेली भारतीय किनारपट्टीची जवळीकच गुजरातला असलेल्या धोक्यात भर घालतात. पाकिस्तान पुरस्कृत सीमापारच्या दहशतवादाचा सामना, भारत अनेक दशकांपासून करत आहे. पाकिस्तानच्या जमिनीवरील सीमांतून, दहशतवादी शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांसहित घूसखोरी करत आहेत. आत्ता दहशतवादी व त्यांचे समर्थक समुद्रातून घुसत आहेत.

जमिनीवरील सीमां वर्षानुवर्षे वाढत्या संख्येने तैनात केलेल्या सुरक्षा दलांच्या, टेहळणी साधनांच्या व कुंपणांच्या वाढत्या तैनातीमुळे सक्षम झाल्या आहेत. मात्र, किनार्यावरील सुरक्षा अजूनही ढिसाळच आहे. जमिनीवरील सीमांवर सुरक्षा मजबुत असल्यामुळे, भारतात शिरण्याचा पर्यायी मार्ग म्हणून, तस्कर,गुन्हेगार,दहशतवादी, समुद्राकडे पाहू ला्गले आहेत.

किनारपट्टी घुसखोरीकरता आदर्श

गुजरातचे किनारे भूसंरचनेच्या वैविध्याने नटलेले आहेत, जसे की; खाड्या, छोटी आखाते, पाणवठे, छोट्या नद्या, उथळ तलाव, नदीमुखे, दलदली, खारजमीनी, तसेच टेकड्या, खडकाळ कडे, दांडे, किनारे आणि बेटे (लोकवस्ती असलेली आणि  नसलेली). पाणवठे आणि नदी प्रवाहक्षेत्रे किनार्यातून जमिनीत खोलवर शिरत असतात, त्यामुळे किनारा भूखंडात शिरलेला असतो. दुर्गम असल्याने  हा भाग असुरक्षित किवा अपुर्या सुरक्षेसह राहिली. अशी ठिकाणे, छुप्या रीतीने अवैध शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि तस्करीकृत सामान उतरवून घेण्याकरता, तसेच तस्कर व दहशतवाद्यांच्या घुसखोरीकरता आदर्श ठरली आहे. अवैध नौका सहजच इथे दाखल होऊ शकतात आणि गुपचुप नाहीशाही होऊ शकतात.या वर्षी अनेक पाकिस्तानी बोटी  कच्छच्या किनारपट्टीवर पोहचल्या आहेत,मात्र त्यातिल नाविक गायब आहेत.त्यांना, भू-संरचनेच्या वैशिष्ट्यांचा लाभ घेता येतो. नद्यांची प्रवाहक्षेत्रे जी बहुतेकदा परस्परंशी जोडलेलीही असतात आणि भूखंडात खोलवर गेलेलीही असतात, त्यांमुळे किनारपट्टी दहशतवादास, तस्करीस आणि शस्त्रास्त्रे व अंमली पदार्थांच्या व्यापारात मदत करते. (Mangrove Forests) खारफुटीची जंगले, वालुकादंड आणि मनुष्यवस्ती नसलेली किनारपट्टीनजीकची बेटे घुसखोर, गुन्हेगार आणि अवैध धंदे करणार्यांकरता आदर्श लपण्याची ठिकाणे ठरतात.

देखरेखकरता सीमा सुरक्षा दलाच्या जलशाखेच्या दोन बटालिअन्स

या भागात सीमेच्या रक्षणासाठी सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफ तैनात आहे. या भागात भरतीच्या वेळेला पाणी खूप आत येते आणि ओहोटीच्या वेळी जमीन समुद्रात जाते. म्हणून या भागामध्ये फ्लोटिंग बीओपीज – बॉर्डर ऑऊट पोस्ट म्हणजेच तरंगणार्या बोटींवरील चौक्या तैनात केल्या आहेत. म्हणजे त्या भागात काही बोटी तरंगत राहुन या भागातील सीमेचे रक्षण करतात. खाड्यांच्या सुरक्षा आणि देखरेखकरता सीमा सुरक्षा दलाच्या जलशाखेच्या दोन बटालिअन्स, सहा तरत्या सीमाचौक्यांसह बॉर्डर आऊटपोस्टस तैनात केलेल्या आहेत. ह्यांपैकी चार आघाडीवर तैनात आहेत, तर दोन आरक्षित ठेवलेल्या आहेत. ह्या सीमाचौकी गस्तीनौकांच्या मदतीने संपूर्ण क्षेत्रावर नजर ठेवतात.परंतू ही सुरक्षा व्यवस्था पुरेशी नाही.

विशेषतः गुजरात मधील खाडीक्षेत्र गुन्हेगारी आणि राष्ट्रविरोधी कृत्यांमुळे असुरक्षित आहेत. उत्तर गुजरातमध्ये अनेक मोठ्या खाड्या आहेत. ह्यांपैकी काही, पाकिस्तान सोबतच्या आंतरराष्ट्रीय सीमांनाही पार करून जातात.सर्व खाड्या लहान नाल्यांनी जोडले असतात. उथळ आणि खोल खाड्या चक्रव्यूह घडवतात. खाड्यांतील परस्पर जोड; अशा मार्गांचा वापर करून भारतीय सीमेच्या आत-बाहेर, ये-जा करणार्या घूसखोर, तस्कर आणि दहशतवादी इत्यादींकरता; सीमा सच्छिद्र करतात.

ओहोटीच्या काळात तयार होणारी बेटे आणि वालुकादंड ह्यांवरील खारफूट त्यांना आसरा देते. भारतीय बाजूने ह्या लहान लहान प्रवाहक्षेत्रांपर्यंत पोहोचण्यास मार्गच नाहीत. त्यामुळे परिस्थिती आणखीनच वाईट होते. उदाहरणार्थ गुजरातमध्ये, हरामी नाला प्रवाहक्षेत्र भारतात उगम पावून पाकिस्तानात प्रवेश करते, मग पुन्हा भारतात येते. त्यामुळे हे प्रवाहक्षेत्र घूसखोर व तस्करांच्या पसंतीचे झालेले आहे.

सर खाडी’ ९६ कि.मी. लांब आहे. वादग्रस्त सागरी सीमा गंभीर सुरक्षा आव्हानेच उभी करतात व समुद्री विकासाला अडथळे निर्माण करत असतात. ’

सागरी सुरक्षेत अनेक सुधार घडुन आले

गेल्या काही वर्षात सागरी सुरक्षेत अनेक सुधार घडुन आले आहेत, पण ते पुरेसे नाही. कारण किनार पट्टीवर अफू, गांजा, चरस आदी अमली पदार्थांची तस्करी करणे, खोट्या नोट्या पाठवणे, बेकायदा व्यापार करणे किंवा दहशतवादी किंवा त्यांच्या समर्थकांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करणे सुरुच आहे.२६ जुलै २०१९ च्या आकडेवाडी २०१मासेमार पाकिस्तानी तुरुंगात आहेत. मुंबईत 2008 मध्ये झालेल्या 26-11 च्या हल्ल्यावेळी याच भागातील एक बोट म्हणजे आयएनएस कुबेर ही पाकिस्तानने ताब्यात घेतली होती. या बोटीचा मालक अनेक महिने पाकिस्तानच्या तुरूंगामध्ये होता. त्यानंतर 26-11 च्या हल्ल्याकरिता या बोटीचा वापर करण्यात आला होता.पाकिस्तान या कोळ्यांवर मानसिक दबाव टाकून भारताविरोधात दुष्कृत्य करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतो.

अजुन काय करता येइल

पाकिस्तानी सागरी सुरक्षा दले भारतीय पाण्यात घुसखोरी करण्याकरता, आणि भारतीय मासेमारी नावा आणी मासेमारांना पळवण्याकरता विख्यात आहे.

सागरी सुरक्षेचा इतिहास हे अगदी स्पष्टपणे दाखवतो की, सगळ्यांनीच इतिहासाचा नियमितपणे अभ्यास करावा ज्यामुळे दुर्देवी इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही.

या भागामध्ये अशी वाहाने जी पाण्यावर आणि जमिनीवरही हालचाल करू शकतील (होव्हरक्राफ्ट)अशी वाहाने, आणण्याचा देशाचा प्रयत्न सुरू आहे. त्याशिवाय ऑल टरेन व्हेईकल म्हणजे अशा गाड्या ज्या पाण्याच्या आत आणि जमिनीवर वाळवंटी प्रदेशातही हालचाल करू शकतात, याची या भागामध्ये गरज आहे. अशा प्रकारच्या काही गाड्या येऊ लागल्या आहेत परंतू त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे.

मालडबे (कंटेनर्स) अण्वस्त्र वाहतुकीकरताही वापरले जाऊ शकतात, म्हणूनच त्यांची सुरक्षा चिंतेचा विषय आहे. १००% सुरक्षा सुनिश्चितीकरता, कंटेनर्स संपूर्णपणे क्ष-किरण यंत्रांखाली तपासले जावेत.

दररोज मासेमारीकरता बाहेर पडणार्या हजारो मासेमारांच्या आणि त्यांच्या नावांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे; आवश्यक आहे. दर सहा महिन्यांनी होणार्या तपासणीशिवाय, भारतीय तटरक्षकदलाच्या पुढाकाराने सुरक्षादलांकडून, एकदा तरी संपूर्ण तपशीलवार तपासणी केली गेली पाहिजे.

राष्ट्रीय ऍटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम केवळ मोठ्या जहाजांचा माग काढू शकणार आहे, मासेमारी नावांचा नव्हे. भारतीय तटरक्षकदलाने नौकारोहण ऑपरेशन, गुप्तवार्ता सूचनांबरहुकूम अथवा संशयावरून हाती घ्यावी. किनार्यावर तैनात असलेल्या सर्व सरकारी संस्थाना, स्वतःच्या ऑपरेशन योग्य गुप्तवार्ता संकलन करण्यास, जबाबदार धरले गेले पाहिजे. प्रत्येक राज्याने मासेमार समाजाच्या आणि किनारपट्टीवरील स्थानिक रहिवाशांच्या आधारे ’होम गार्डस’ आणि ’गुप्तवार्ता बटालिअन्स’ उभी केली पाहिजेत. त्यांचे साहाय्याने त्यांनी, ऑपरेशन योग्य पुरेसे गुप्तवार्ता संकलन करावे आणि सागरी सुरक्षा कर्तव्येही बजावावीत.

एन.टी.आर.ओ.ने सागरी सुरक्षेकरता तांत्रिक गुप्तवार्ता संकलनात अधिक सक्रिय भूमिका निभवावी. सरकारने सर्व जहाजांची नोंदणी केली पाहिजे आणि किनारी लोकांना ओळखपत्रे द्यावीत. किनारी रडार साखळी आणि ऍटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम अविलंब लागु करावी. वृत्तपत्रे आणि दूरदर्शन वाहिन्या अनेकदा; सुरक्षा संस्थांचा भ्रष्टाचार(जसा की कस्टम खात्याचा), निष्काळजीपणा(पोलिसांचा) बाबत बातम्या प्रकाशित करतात. शोध पत्रकारितेच्या अशा सर्व अहवालांची छाननी केली गेली पाहिजे. कुणी अपराधी आढळल्यास शिक्षा केली गेली पाहिजे. त्यातील गुन्हेगार उजेडात आणले पाहिजेत. हे संबंधितांच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली गेली पाहिजेत.

निर्दोष सुरक्षा निर्माण करण्याकरता

किनारी राज्ये देशाच्या किनारी सुरक्षेतील प्रमुख भागीदार आहेत. त्यामुळेच, किनारी राज्यांना सशक्त/सक्षम करण्यास प्राधान्य देणार्या असाव्यात. ज्यामुळे सागरी सुरक्षेबाबतची तयारी, जलदीने स्वीकारार्ह पातळीपर्यंत येऊ शकेल.

आपले नौदल आणी तटरक्षकदल जशास तसे म्हणुन पाकिस्तानी मासेमारांना का पकडुन आपल्या मासेमार्यांची सुटका का करु शकत नाही? भारतीय समाजातील निरनिराळ्या उणीवांचा गैरफायदा घेण्यांसाठी आय.एस.आय. आणि पाक लष्कर सक्रिय आहे. काळाची गरज ही आहे की, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षकदल, पोलिस, गुप्तवार्ता संस्था, आणि निरनिराळी सरकारी मंत्रालये यामधे विलक्षण समन्वय असणे. पेला अर्ध्याहून अधिक भरलेला आहे. पण निर्दोष सुरक्षा निर्माण करण्याकरता आपल्याला अजूनही पुष्कळ चालायचे आहे.

— ब्रिगेडयर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..