![मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2019/07/dKdwsh8DP_0.jpg)
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=dKdwsh8DP_0[/embedyt]
माती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना आहे. आपल्या पूर्वजांना त्याचे महत्त्व ठाऊक होते. तसंच त्याचा वापर कसा करावा याची माहिती देखील त्यांना होती. म्हणूनच त्यांनी मातीची भांडी, मडकी, माठ बनवायला सुरवात केली. त्यामुळे मातीच्या मडक्यातून पाणी प्यायचे हे सगळ्यांच्या अंगवळणी पडले आणि ती आपली परंपरा बनली.
उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी अनेकजण फ्रिजचे थंडगार पाणी पितात. मात्र फ्रिजमधील थंड पाणी आरोग्यासाठी मुळीच चांगले नसते. फ्रिजमधील थंड पाणी पिण्याचे अनेक दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. शिवाय अनेक ठिकाणी उन्हाळ्यात लोडशेडींग केली जाते. त्यामुळे वीजे अभावी फ्रिजचा वापर करणं शक्य होत नाही. पूर्वीपासून पाणी थंड करण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर केला जात असे.
माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात. परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो.
मातीच्या भांड्यातील पाण्याने तुमची तहान लवकर भागते. मात्र फ्रिजमधील पाणी वारंवार प्यावेसे वाटते. माठातील पाणी पिण्याने डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. मातीच्या भांड्यातील पाण्यामुळे अॅसिडिटीचा त्रास कमी होतो. मातीच्या भांडयातील थंड पाणी पिण्यामुळे सर्दी,खोकला, घशाचे इनफेक्शन, ताप असे विकार होत नाहीत. माठातील पाण्यामुळे उष्माघातापासून संरक्षण होते. उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी प्या. मातीच्या भांड्यातील थंड पाण्याचे शरीरावर दुष्परिणामदेखील होत नाहीत. कारण मातीचे भांडे हे अनेक मिनरल्स आणि पोषकतत्वांचा खजिनाच असते.
सर्दी, खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्यांना फ्रिजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता. कारण ते पाणी घशासाठी चांगले असते. शिवाय मातीच्या भांड्यात वाळा घालून ठेवल्यामुळे तुमच्या आरोग्यावर चांगले फायदे होतात. वास्तविक मातीच्या भांड्यात पाणी साठवणे, अन्नाचा साठा करणे, स्वयंपाक करणे ही आपली परंपराच आहे.
Sanket
Leave a Reply