नवीन लेखन...

मंत्र आणि आयुर्वेद

 

आयुर्वेदाने तीन प्रकारची चिकित्सा सांगितली आहे. दैवव्यपाश्रय, युक्तीव्यपाश्रय आणि सत्वावजय हे ते तीन प्रकार होत. यातील दैवव्यपाश्रयात मंत्रपठणाचा उल्लेख आहे. आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद. अथर्व आणि आंगिरस हे दोन ऋषी अथर्ववेदाचे उद्गाते होते. यातील अथर्व हे मंत्रशास्त्र तर आंगिरस हे औषधी उपचारांनी रोगहरण करत. स्वाभाविकपणे या गोष्टीचा प्रभाव आयुर्वेदावरही आहे. आजच्या घडीला वैद्यगण प्रामुख्याने आंगिरसी चिकित्सा म्हणजेच औषधी उपचारांचाच वापर करत असले तरी कित्येक ठिकाणी आथर्वण चिकित्सेचादेखील वापर करता येऊ शकतो. अर्थात हे मंत्र तपस्वी आणि शुचिर्भूत अशा तसेच वाचासिद्धी प्राप्त झालेल्या महर्षींनीच म्हणावेत असे आयुर्वेद सांगतो.

आयुर्वेदात सान्निपातिक ज्वरात विष्णूसहस्रनाम, ज्वरात रुद्राची उपासना, रसौषधी तयार करत असताना पाऱ्याचा वापर होतो तेव्हा अघोरमंत्राचा जप, वैद्यांसाठी त्रिपदा गायत्रीजप, गर्भादान संस्कार तसेच प्रसुतीसमयी व जातकर्म संस्कार समयी उच्चार करायचे मंत्र, भोजनोत्तर उत्तम पचनासाठी भीम-हनुमंताचे स्मरण, रसायनप्रयोगात ओमकार जप अशा विविध ठिकाणी मंत्रचिकित्सेचा उल्लेख आढळतो. ‘मननात् त्रायते अनेन इति मन्त्रः|’ (ज्याचे मनन केल्याने लाभ होतो तो मंत्र) अशी मंत्रांची व्याख्या आहे. आयुर्वेदीय औषधोपचारांसहच मंत्रचिकित्सेचा वापर केल्यास ‘अधिकस्य अधिकं फलम्|’ हे नक्की.

आज मंत्रांचा आरोग्यावरील परिणाम या विषयात संशोधने सुरु आहेत. या विषयात अभ्यास आणि प्रयोग होणे महत्वाचे आहे. त्यावरून निघणारे निष्कर्ष मोलाचे ठरतील असे वाटते.

 

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Aug 29, 2016

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..