नवीन लेखन...

दिल खोल के छिंको यारो

आऽऽक्छू’…..एकापाठोपाठ एक- दोन- तीन अशा अगदी सलग दहा दहा शिंका येणारे कित्येकजण असतात. इतक्या शिंकांनी माणूस अगदी हैराण होऊन जातो; मात्र काही केल्या शिंका थांबत नाहीत. अशा व्यक्तींनी लक्षात ठेवण्याच्या दोन सोप्या पण महत्वाच्या गोष्टी.

१. दोन शिंकांच्या मधील अंतरात श्वास जोरात ओढला जाणे ही स्वाभाविक प्रतिक्षिप्त क्रिया असते. मात्र तसे केल्याने अधिक शिंका येतात.

२. शिंका येताना नाकाला स्पर्श करू नये. तसे केल्यानेही शिंका वाढतात.

तीव्र गंध, सर्दी यांशिवाय सूर्यप्रकाश, आय ब्रो करणे आणि शरीरसंबंध यांनंतर देखील काहींना शिंका बळावू शकतात.

आयुर्वेदाने शिंक हा ‘अधारणीय वेग’ म्हणजे अडवून ठेवू नये अशी शारीर प्रक्रिया आहे असे सांगितले आहे. त्यामुळे शिंक आल्यावर आल्यावर ती दाबून ठेवू नये. मोकळेेपणाने शिंकावे. त्याचप्रमाणे मुद्दाम शिंका काढूदेखील नयेत. याकरताच वरील उपाय सांगितले आहेत. मुद्दाम शिंका काढल्याने वात वाढतो. तपकीर ओढण्याची सवय असणाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे!

शिंकताना काही काळासाठी आपले हृदय थांबते असे काही ठिकाणी म्हटले जाते. परंतु ते सत्य नाही. हं; शिंका अडवल्यात तर मात्र नाकातला जंतूसंसर्ग कानापर्यंत पोहचू शकतो असे आधुनिक वैद्यक सांगते.

त्यामुळे दिल खोल के छिंको यारो।

(सतत शिंका येण्याची प्रवृत्ती असल्यास मात्र आपल्या वैद्यांकडून उपचार जरूर सुरु करावेत.)

 

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Jul 21, 2016

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..