नवीन लेखन...

मन की बात-हरपत चाललेलं समाजभान

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हल्ली एक गोष्ट हमखास दिसू लागलीय. ट्रेनमधेच कशाला, कुठेही हेच दृष्य दिसते.. जवळपास प्रत्येकाचे डोळे हातातल्या स्मार्ट मोबाईलच्या स्क्रिनमध्ये खिळलेले आणि कानात इअरफोन कानात गच्च बसवलेले..आपण काय करतोय, कुठे आहोत असं ना स्वत:चं भान ना आजुबाजूचं..! गंभिर गोष्ट म्हणजे ह्याला कोणताही वयोगट अपवाद नाही..

डोळे व कान ही अतिशय महत्वाची ज्ञानेद्रीये आहेत. बाहय जगाचं भान ही ज्ञानेद्रीये आपल्याला करून गेत असतात. आणि तिच अशी घट्ट मिटून घेतली तर कसला समाज अन् कसचं काय..! आपण जे इतरांप्रती, निसर्गाप्रती जे संवेदनाशुन्य कसे होत चाललोत त्याचं हे निदर्शक आहे की त्यामुळेच आपण संवेदनाहीन झालोत?

केवळ मी आणि नंतर माझं एवढाच स्वयंकेंद्रीत व स्वार्थी उद्देश उरलेला आहे..खोट्या, आभासी, व्हर्च्युअल दुनियेत रमताना आपल्या आसपासच्या रसरशीत जिवंत जगाचा आपल्याला साफ विसर पडलाय..आणि म्हणून आपणही त्या व्हर्च्युअल दुनियेतलया एका निर्जीव बाहुली प्रमाणे होत चाललोत..मग अशा व्हर्च्युअल बाहुलीने भरलेल्या समाजाकडून १५ वर्षांच्या अजाण पोरीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या किंवा कुत्र्याच्या जिवंत पिलांना जाळून मारून त्याचा आनंद घेतल्याच्या किंवा अशा परपिडेत आनंद शोधण्याच्या घटना सातत्याने घडणं अगदी अपेक्षित आहे..कारण निर्जीव बाहुल्याना मन नसतं, भावना नसतात..आभासी दुनियेत रक्त येतं पण दुखत नाही आणि प्रत्यक्षातही तसंच घडत असावं अशी आपल्या त्या आभासी दुनियेशी एकरूप झालेल्या मनाची समजूत झाली असणं शक्य आहे.

बहुतेक सर्वांच्या पाठ कींवा पोटावर असलेली आणि गच्च भरलेली सॅक हा आणखी चिंतेचा विषय..काय त्या बॅगेत घेऊन हिंडतात कोण जाणे..! काही जणांना मी विचारतोही की, बाबा काय एवढं सामान घेऊन फिरतोस म्हणून. तर दाढीच्या सामानापासून ते चादर, कपड्यांच्या जोडीपर्यंत काहीही अशी उत्तरं मिळाली..

मला तर वाटत की ह्या टम्म भरलेल्या सॅकधारींना घरचे लोक बहुदा तंबी देऊनच बाहेर पाठवित असावेत की, बाबा आज काय आमच्या उपयोगाचं काही मिळालं नाही तर घरी यायची गरज नाही आणि म्हणून ते असे सॅकेत रोजचं गरजेचं सामान घेऊन फिरत असावेत. आणि खरोखरंच तसं असेल तर आधिच विभक्त झालेली कुटूंब व्यवस्था आणखी विभक्त होण्याच्या दिशेने वेगाने जातेय असं म्हणायला हरकत नाही. बहुदा एकटंच राहायची पद्धत येणार आपल्याकडे..

ट्रेनच्या प्रवासात तर हे सॅकधारी इतरांना प्रचंड तापदायक ठरतात..सुरूवातीस म्हटल्याप्रमाणे डोळे मोबाईलमधे व कानात इअरफोनच्या बोळ्यांनी गच्च मिटलेले, पाठीवर वा पोटावर गच्च भरलेली सॅक आपल्या पुढे अथवा मागे उभं राहीलेल्यांना त्रास देतेय याचं भानच नसतं ह्यांना..बरं, सांगायची सोय नाही. पहीलं म्हणजे, कान बंद असल्याने आपण काय सांगतोय हे त्यांना ऐकूच जात नाही. मग त्रासलेला चेहेरा करून, नाईलाजाने कामातला इअरफोन काढून उर्मटपणे, ‘तो क्या हुना?’ असं विचारणार..दादागिरी करणार..आपण गप्प बसायचं कारण त्यांची मेजाॅरीटी असते. लोकशाहीचं हे एक तत्व मात्र हे लोक मनापासून पाळत असतात..मग समाजापासून तुटलेल्या किंवा समाजाचं काहीच देणं-घेणं न उरलेल्या माणसांची मेजाॅरीटी वाढलीय असं समजायचं का?

-नितीन साळुंखे

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..