नवीन लेखन...

माझा बाळ कुठे गेला

… मंडळी हे जे झाड दिसत आहे ते झाड सौंदडीचे आहे तसे पाहिले तर हे झाड सात्विक असे आहे. पूर्वी आम्ही रानात राहिला असताना मैना च्या पटीतील हे झाड. त्यावेळी मी पाच वर्षाचा होतो आमच्या राणा पासून हे झाड काही अंतरावर आहे. आमच्या गावात येळावीहुन राहिला आले ले राम-लक्ष्मण शिंदे हे दोन भाऊ. ही राम-लक्ष्मण ची जोडी यांचा स्वभाव अतिशय सुंदर होता. माझी शाळा सुटल्यानंतर मी काही वर्षे त्यांच्या शेतात काम करत होतो. त्यामुळे यांचा स्वभाव मला माहित होता ही राम-लक्ष्मण जोडी खरोखरच चांगली होती. यांची दहा बारा एकर जमीन हो ती जमीन लांब पडते म्हणून ही मंडळी आमच्या गावात म्हणजे रानात राहायला होती. पूर्वी यांच्या रानामध्ये उसाचं पीक भरपूर यायचं परंतु तंत्र योगा प्रमाणे ही मंडळी दिवसांनी दिवस प्रगती करू लागली. तसं हे कुटुंब फार सुंदर दोन का क्या तोंडभरून सर्वांशी बोलाय च्या एकत्र कुटुंब असल्यामुळे त्यांच्या घरी कधी भांडण नाही असे ही कुटुंबवत्सल घराणी होय. मी पाच वर्षाचा असताना या झाडाकडे गेलो होतो आणि परवा परवा या झाडाकडे जाण्याचा योग आला. लक्ष्मण हनुमान चा एक नंबर चा मुलगा सुरेश याला याच झाडाखाली सर्पदंश झाला होता ही आठवण पटकन माझ्या लक्षात आली…।

…. त्या वर्षी अण्णांनी याच मैना च्यापटीत संपूर्ण धना. केला होता. त्याकाळी पाऊस भरपूर पडत होता निसर्ग हिरवागार दिसत होता. शेतीने हिरवा गार शालू परिधान केला होता इतका निसर्ग शोभून दिसत होता. कोकिळा आनंदाने झाडावर गात होती गावातील प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. अण्णांच्या याचमैना च्या पटीत धना काढायचे काम चालू होते. धना काढण्यासाठी मजूर हात हलवून काम करत होते. वेळ सकाळची होती आणि अण्णांचा थोरला मुलगा सुरेशमैना च्यापटीत. मजुरांचा चहा घेऊन गेला होता याच झाडापाशी त्यावेळी गुडघ्या एवढे हिरवे गवत उगवले होते. याच गवतात नाग आणि नागिन खेळत होती हे सुरेश च्या लवकर लक्षात आले नाही तो तिथूनच गेला आणि त्याचा चुकून पाय सापाच्या जुळी वर पडला त्यामुळे नागांनी त्याला डवचले. तिथं हा सुरेश खाली पडला त्याच्या तोंडातून फेस. हळूहळू येत होता तोपर्यंत एक कामगार या झाडाकडे पळत आला. त्यांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांन शिंदे अण्णांच्या घराकडे पळ काढला. घरात जाऊन सांगितले की सुरेशला सर्पदंश झाला आहे लवकर चला. ही बातमी वाऱ्यासारखी वस्तीवर समजली आणि मीही पळत सुटलो…।

.. मी जाण्याअगोदर अण्णांच्या घरातील सर्वजण या झाडाजवळ हजर राहिले होते. त्यावेळी वाहनांची एवढी सोय नव्हती लगेच एका मजुराने बैलगाडी जुंपून या झाडाजवळ आणली. याच बैलगाडीत चार-पाच माणसाने सुरेश ला गाडीत घातले आणि बैलगाडी भिलवडी रेल्वे स्टेशन जाऊ लागली. दवाखान्यात जाईपर्यंत रस्त्यातच सुरेश चा प्राण मावळला होता अर्ध्या रस्त्यातून गाडी अण्णांच्या मळ्याकडे हलवण्यात आली. अण्णांच्या घरापुढे एक चिंचेचे मोठे झाड आहे त्या झाडाखाली वस्तीवरील आजूबाजूच्या बायका पुरुष मंडळी थांबली होती. धाकट्या काकूच्या मनाला वाटत होते माझ्या बाळाला काही होणार नाही व इतर म्हणत होत्या काकी मनाला धीर द्या तुमच्या मुलाला काही होणार नाही. कारण अशावेळी धीर देणे हाच खरा ग्रामीण भाग असा स्वभाव आहे. थोड्याच वेळात बैलगाडी अण्णांच्या मळ्यात आली. थोरली राम आणि धाकटे लक्ष्मण यांच्या डोळ्यातून आलेले पाणी पाहून दोन काक्या नी. हंबरडा फोडला आणि धाकटी का की म्हणाली माझा बाळ कुठे गेला. हे ऐकून सर्वजण रडू लागली सुरेश हा अतिशय चांगला मुलगा कुणाच्या च भानगडीत न पडणारा. अण्णांच्या घरापुढे रडारड चालू होती झाडावर चे. पक्षी स्थिर झाले होते आणि वातावरण मुके झाले होते. हा सारा वृत्तांत मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो एक चांगला मुलगा या जगातून निघून गेला याच्या सारखे वाईट दुख कोणते असू शकते. दोन का क्या हानून बडवून घेऊ लागल्या यामुळे वातावरण अधिकच गंभीर होत गेले. हा सीन पाहून बाकीच्या लोकांनी पुढील तयारी चालू केली. लाकडे आणून शेतीच्या एकाबाजूला सुरेशला काही वेळातच अग्नी कष्ट करण्यात आले. हे वातावरण पाहून माझ्या मनाला भयंकर मोठा धक्का बसला सोन्यासारखा मुलगा या जगातून निघून गेला याची खंत माझ्या लक्षातुन जात नव्हती. काही वेळातच हा कार्यक्रम मी माझ्या डोळ्यांनी पहात होतो सुरेश च्या प्रेताला अग्नी दिली परंतु आरडाओरड हा विषय कमी नव्हता. तर चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या बायका म्हणत होत्या तुमच्या सुरेश ला पुढील जन्मात राजयोग मिळणार आहे. आणि पुढील जन्मात सुरेश राजा होणार आहे काकी तुम्ही तुमचं दुःख आवरा. माणसाचा मृत्यू कुठे असतो हे सांगता येत नाही परवा परवा हे झाड पाहून माझे डोळे पाणावले. जुन्या आठवणी लक्षा तूं न कधी जात नाहीत परवाचा योगायोग माझ्या लक्षात आला. अशा अनेक गोष्टी माझ्या लक्षात आहेत हे विसरू शकत नाही हेच खरे. सुरेश या जगातून निघून गेला दुःख मात्र घरातील माणसांना झाले. पण सुरेश याची आठवण अजून माझ्या स्मरणात आहे. मायाजाळ किती मोठा आहे याची जाणीव झाली याच्यापेक्षा नवीन काय हवे. सुरेश या मुलाला सवदडी च्या झाडाखाली सापाने दंश केला हा मुलगा पुण्यवान आहे हे माझ्या लक्षात आले. सुरेश पुढील जन्मात राजा होणार अश्या काही स्त्रिया म्हणत होत्या हे खरे असेल का या का विचार मी मनात करीत होतो.
धन्यवाद मंडळी..।

-दत्तात्रय पांडुरंग मानुगडे

ग्रामीण कथा लेखक..।

Avatar
About दत्तात्रय पांडुरंग मानुगडे 30 Articles
दत्तात्रय मानुगडे हे ग्रामीण कथा लेखक आहेत. त्यांचे वास्तव्य किर्लोेकरवाडी येथे असते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..