नवीन लेखन...

मैत्रीला निरोप

शाळा कॉलेजचे सहजीवन संपते आणि निरोप देण्या-घेण्याची वेळ येते तेंव्हा मनाची घालमेल होते. जुन्या त्या आठवणींनी सुचलेल्या काही ओळी… मैत्रीला निरोप

मैत्रीचं ते अनोखे जग
असे मोडवत नव्हते.
भूतकाळाला वर्तमानापासून
काही केल्या तोडवत नव्हते.

तिचे ते बोलके डोळे
आता काही बोलत नव्हते.
शब्दांचे मोती ओठातून
काही केल्या फुटत नव्हते.

दुनिया आहे खूप छोटी
भेटत राहू म्हणालो.
होती नुसती खोटी आशा
अन् खोटं खोटं हसलो.

माझ्या उदास डोळ्याकडे
एकटक ती पहात होती.
कोरडा चेहेरा होता तिचा
अन् बळे बळे हसत होती.

गाडीच्या खिडकीतून बघत
ती हात हलवत होती.
नकळत उलट्या हातानं हळुच
पापण्या ती पुसत होती.

जगलेले ते सारे सुंदर क्षण
दूर जावु लागले होते.
नियतीचे हे विलक्षण खेळ
क्रूर वाटु लागले होते.

मनाचे रोखलेले सारे बांध
तेंव्हा फुटले होते.
थकलेल्या पापण्यांना सारून
अश्रु माझे ढळले होते.

एवढ्या दिवसांची सोबत
अर्ध्यावर सुटली होती.
मैत्री राहिली फक्त नावाला
साथ मात्र तुटली होती.

– डॉ.सुभाष कटकदौंड

डॉ. सुभाष कटकदौंड
About डॉ. सुभाष कटकदौंड 25 Articles
डॉ. सुभाष कटकदौंड हे स्त्री रोग तज्ञ असून १९९२ पासून खोपोली येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत. लहानपणापासूनच त्यांना लिहिण्याची आवड आहे. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत पण विशेष करून कविता लिहिल्या आहेत. आतापर्यंत साधारण विविध विषयांवर २०० हुन अधिक कविता लिहिल्या आहेत. "भिंतींना ही कान नाहीत" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..