नवीन लेखन...

माधवी पुरी बुच – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

माधबी पुरी बुच- यांचा जन्म १२ जानेवारी १९६५ रोजी झाला बुच यांचे शिक्षण मुंबईतील फोर्ट कॉन्व्हेंट स्कूल आणि दिल्लीतील कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी येथे झाले. त्यानी  दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून गणित विषयात पदवी प्राप्त केली,  आणि नंतर आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केले. त्या  एक भारतीय व्यावसायिक महिला आहेत. त्या  भारतातील सिक्युरिटीज नियामक संस्था, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) च्या अध्यक्षा आहेत. त्या SEBI चे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला आहेत आणि या पदावर नियुक्त झालेल्या खाजगी क्षेत्रातील पहिल्या व्यक्ती आहेत.एप्रिल २०१७ ते मार्च २०२२ पर्यंत, त्यानी  SEBI च्या पूर्णवेळ सदस्य म्हणून काम केले आणि महत्त्वाच्या नियामक आदेशांची अमलबजावणी त्यानी केली.  .सेबीच्या कामाची  प्रणाली सुधारण्यासाठी तसेच नियामक संस्थेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी जलद बदल घडवून आणण्याचे श्रेय बुच यांना दिले जाते.

सेबीमध्ये करिअर

एप्रिल २०१७ मध्ये, बुच यांची सेबीमध्ये पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना सामूहिक गुंतवणूक योजना, देखरेख आणि गुंतवणूक व्यवस्थापन यासारख्या पोर्टफोलिओची जबाबदारी देण्यात आली. त्यांचा  कार्यकाळ संपल्यानंतर, त्यांना  सेबीच्या अंतर्गत तंत्रज्ञान प्रणाली डिझाइन करण्यास मदत करण्यासाठी स्थापन केलेल्या सात सदस्यीय तंत्रज्ञान समितीमध्ये नियुक्त करण्यात आले. त्यांच्या तंत्रज्ञान आणि डेटा एनलिसिस  वृत्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या, बुचने काही ऐतिहासिक नियामक आदेश पास  केले आहेत. २०१८ मध्ये, त्यानी  सहारा समूहाविरुद्ध पूर्णपणे परिवर्तनीय डिबेंचरद्वारे गुंतवणूकदारांकडून जमा केलेले १४,००० कोटी रुपये परत करण्याचा आदेश दिला.

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 110 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..