Web
Analytics
लोपलेले श्रेष्ठत्व – Marathisrushti Articles

लोपलेले श्रेष्ठत्व

डोळे उघडून बघा तुम्हीं    आपल्या देशाला  ।
महानतेची परंपरा    दिसेल तुम्हाला  ।।१।।

जगातील श्रेष्ठ देश म्हणूनी    नाव होते त्याचे  ।
आज विसरलो महत्त्व सारे    आपल्या पूर्वजांचे  ।।२।।

दोष असेल त्यांचा कांहीं    सोडून  द्यावा  ।
परि अभिमान हा परंपरेचा   मनात ठेवावा  ।।३।।

डोळ्यांनी जे बघतो सारे    सत्य  समजता  ।
कर्ण ऐकवी आम्हांस ज्ञान जे    चूक  ठरविता  ।।४।।

कित्येक गोष्टीची उकलन होती   वेदामध्ये आपल्या  ।
परि पुराणातील वांगी समजूनी    फेकून त्या दिल्या  ।।५।।

आमचे जवळील ज्ञान गंगाजळ    आम्ही  विसरतो  ।
परकियांची कास धरूनी    वाट  भटकतो  ।।६।।

ते तर आहे महाठगते     वेद नेई चोरूनी  ।
पिऊनी आमचीच ज्ञान गंगा    चाले मान उंचावूनी  ।।७।।

विचार करावा थोडा याचा    शांत चित्ताने  ।
मालक तुम्ही असूनी घराचे    नोकर परि बनले  ।।८।।

अमेरिकेतील वैज्ञानिकाने    नूतन शोध लाविला  ।
अनेक प्रयोगाचा आधार घेऊन    निष्कर्ष  मांडला  ।।९।।

गर्भाशयातील अर्भक देखील    सारे ऐकू शकते  ।
चंचल त्याचे कर्णेद्रिये असूनी    ध्वनी लहरी खेचते  ।।१०।।

विस्मित होतो सारे आपण    प्रयोग हा जाणता  ।
परि सहजपणे विसरूनी जातो    अभिमन्यूची कथा  ।।११।।

ऐके सुभद्रेचे बाळ तेजस्वी    चक्रव्यूह भेद  ।
हुंकार निघाला गर्भामधूनी    सांगे महाभारत  ।।१२।।

तेहतीस कोटी देव सारे    फिरती आकाशी  ।
नारद मुनींचा संचार होता    विश्व मंडळाशी  ।।१३।।

अंतराळी चालला मानवच्या    दिसे दूरदर्शनी  ।
चेष्टा करितो नारदाची आम्ही    गोष्टी त्या समजूनी ।।१४।।

प्रवास करिता विमानातूनी    आधुनिक जगाच्या ।
करमणुकीसाठी कथा वाचतो    पुष्पक विमानाच्या ।।१५।।

दुर्बिण त्यांची घेवूनी आम्ही    पाही दुरीचे तारे ।
आर्यभट्ट इंदूमतीचे खगोल ज्ञान    विसरून जातो सारे ।।१६।।

विनाशाच्या काठी आहे जग    आजच्या क्षणाला ।
अमेरिका,रशियाची क्षेपणास्त्रे    भिवविती जगाला ।।१७।।

फार पुरातन काळी देखील    महायुद्ध झाले ।
कर्ण, अर्जून, भिष्म, द्रोण यांनी क्षेपणास्त्र वापरले ।।१८।।

विसरतो आम्ही इतिहास सारा    आपल्या भूमिचा ।
वेद उपनिषदे ग्रंथ पुराणे    हाच पुरावा त्याचा ।।१९।।

सोन्यासारखी धरणी आमची   आम्हां सारे देई ।
कष्ट तुमचे तिजला मिळतां    नंदनवन ते होई ।।२०।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

About डॉ. भगवान नागापूरकर 1333 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…