नवीन लेखन...

कार्टून्स ‘स्कूबी डू’च्या जनकांपैकी एक केन स्पिअर्स

कार्टून्स ‘स्कूबी डू’च्या जनकांपैकी एक केन स्पिअर्स यांचा जन्म १२ मार्च १९३८ रोजी झाला.

‘स्कूबी डू’ हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय कार्टून्स पैकी एक म्हणून ओळखले जाते. १९६९ साली केन स्पिअर्स यांनी जो रबी यांच्या मदतीने या कार्टूनची निर्मिती केली होती. स्कूबी हा एक कुत्रा आहे. तो आपल्या मित्रमंडळींच्या मदतीने विविध प्रकारच्या रहस्यांचा उलगडा करतो. हे कार्टून आपल्या जबरदस्त पटकथेमुळे लोकप्रिय झालं. स्कूबी डूच्या यशामागे केन यांचा सिंहाचा वाटा आहे. लक्षवेधी बाब म्हणजे आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी या कार्टूनवर काम केलं. ते एक उत्तम स्केच आर्टिस होते. स्कूबी डू सोबतच त्यांनी ‘पॉपाय द सेलर मॅन’, ‘टॉम अँड जेरी’, जॉनी ब्राव्हो यांसारख्या अनेक कल्ट क्लासिक कार्टूनसाठी क्रिएटिव्ह आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे.

एक थोराड कुत्रा, पण मुलखाचा भित्रा. तरीही करतो करामती, गुंग होते साऱ्यांची मती.. ‘स्कूबी डू’ ही सचेतपट (ॲनिमेशन) मालिका ज्यांनी पाहिली असेल, त्यांना हे वर्णन नक्कीच पटेल. ग्रेट डेनसारख्या जातीचा हा भित्रा कुत्रा आणि त्याच्या करामती यांनी आबालवृद्धांना गुंग करण्याचे श्रेय ज्यो रूबी आणि केन स्पिअर्स यांचे होते.

१९६९ मध्ये अमेरिकेतील चित्रवाणीवर सुरू झालेली ही ‘स्कूबी डू’ मालिका भारतात १९९९ मध्येही लोकप्रिय होती. ‘स्कूबी डू’च्या जनकांपैकी रूबी हे २६ ऑगस्ट २०२० रोजी निधन पावले. या दोघांनी ‘आर-एस प्रॉडक्शन’ नावाची कंपनीही काढली होती. पण सुरुवात झाली ती ‘टॉम अॅाण्ड जेरी’ या अजरामर सचेतपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘हॅना बार्बरा स्टुडिओ’मध्ये केन स्पिअर्स नोकरीला होते तेव्हा! तरुण वय, त्यामुळे पडेल ते काम झटपट शिकून घेण्याची तयारी, या गुणावर ते पुढे सचेतपटकार झाले.

स्कूबी हा कुत्रा आणि त्याला पाळणारे मित्रमंडळ, कोठेही काही चुकीचे घडत असेल तर तेथे पोहोचते पण दांडगटांपुढे आपले काही चालणार नाही असे त्यांना वाटत असतानाच स्कूबीच्या करामतींमुळे, दुष्टांना धडा शिकवला जातो, अशा स्वरूपाची ही मालिका मुळात जॉन केनेडींच्या हत्येनंतर, ‘चित्रवाणी सचेतपटांमध्ये फार हिंसाचार असतो’ या तक्रारीला उत्तर म्हणून सुरू झाली.

‘स्कूबी डू, व्हेअर आर यू’ या शीर्षकगीतापासून अनेक प्रकारची जबाबदारी स्पिअर्स यांनी सांभाळली. ‘कालयंत्रा’सारखे यंत्र स्कूबीला शक्ती देते, ही कल्पनाही त्यांची होती.

केन स्पिअर्स यांचे निधन ६ नोव्हेंबर २०२० रोजी झाले.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4231 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..