नवीन लेखन...

कटकटी

जीवन म्हणजे जशी कटकटीची मालिकाच होय.अडचणी, अडथळे पार करतच मार्गक्रमण करावे लागते.कोणतेही कार्य सुरळीत पार पडत नाही.सततची परवड हतबल करते.सहज सोपे वाटणारे काम देखील अडथळ्यांविना पूर्ण होत नाही.

मोठमोठ्या कामात अडथळे कमी येतात परंतु दैनंदिन जीवनात बारीकसारीक गोष्टी खूपच वेदना देऊन जातात, मनस्ताप देतात.लहान कारणांमुळे मोठे काम अडते.साधा खिशाला दोन रुपयांचा पेन वेळेवर नसेल तर किती अडचण येते याचा अनुभव आपल्यापैकी सर्वांनाच आहे. इस्त्री करतांना वीज गेली . घाईने कार्यालयात चाललो असतांना चपलेचा अंगठा तुटला.गृहिणीला स्वयंपाकाची वेळ ,तेल किंवा अजून काही संपले , सिलेंडर समाप्त.रविवार दुकान बंद.शेजारी असून नाही म्हणाले म्हणून मनाला वेदना.नवऱ्याने डबल सिलेंडर नाही घेतले म्हणून त्रागा,आदळआपट.दोघेही कटकटीने त्रस्त,पोरं त्रस्त.

भाजी आणली त्यामध्ये अळ्या.नळाला पाणी कमी आले.नळी लिक झाली.फ्रिज खराब झाले.फिल्टर चांगले
काम करत नाही.मिक्सरचे भांडे बदलायला वेळ नाही.पाहुणा उसने दिलेले पैसे परत करेना.एकनदोन सतराशे साठ विघ्न.
शाळा, दवाखाना, कोर्ट, पोलिस ठाणे इथल्या कटकटी तर पार कोलमडून टाकतात.वाढीव आलेले वीज बिल,मुलाला मिळालेले कमी गुण मस्तक फिरवतात.

नवा मोबाईल बंद पडला.मित्र गाडी घेऊन गेला , पेट्रोल संपवून गाडी परत लाऊन गेला.अचानक खुप पाहुणे आले. पन्नासीनंतर तर आरोग्याच्या कटकटी सुरु होतात.कन्हणे,कुथणे सुरू असते.माझे हे दुखते ते दुखते. केलेला मेकअप पावसाने धुवून गेला.न्हाव्याने केस चूकीची कापली किंवा परीटाने कपडे स्वच्छ धूतले नाही. शिंप्याने शर्ट ढीगाळ केला.नळाला पाणी कमी आले किंवा उशिरा आले.साचलेला कचरा,चावणारे मच्छर पार वैतागून सोडतात. दारावरचे भिकारी,आवारात कुत्री, डुक्कर,मांजर किंवा घरातले अनेक कीडे, ढेकूण वगैरे जगणे असह्य करतात‌. अनेक ठिकाणांहून येणारे कानफाडू आवाज सहन करावे लागतात.

बसमध्ये जागा धरणे, रिक्षावाल्याशी हुज्जत रोजची कटकट असते.बस, रेल्वे वेळेवर न निघणे या बाबी त्रास देतात.बैंकेत किंवा आफिसात एखाद्या कामासाठी खुप चकरा मारणे खुप कटकट वाटते. लोकांशी असलेले मतभेद ,अधिकाऱ्याचा जाच , सहकारी
लोकांचा असहकार असह्य होतो.बायको, पोरांच्या मागण्या पूर्ण न केल्याने, त्यांच्यापासून होणार विसंवाद कटकटीचा भाग आहे.
या सर्व कटकटीवर मात करत जगावे लागते.कदाचित हेच जगणे असावे.आपण कटकटी कमी करु शकलो तर जगणे सुसह्य होईल.कधी न संपणाऱ्या कटकटी आपणास संपवतील त्यापेक्षा आपणच त्या वाढवू नये.त्यास खतपाणी घालू नये.कमीतकमी कटकटीत जीवन जगता यावे.एवढी उसंत हवीच आहे. संगीत, साहित्य,यासाठी भरपूर वेळ आणि उसंत मिळायला हवी, त्यासाठी कटकटी कमी करण्याची कला जाणून घेऊया!

– ना.रा.खराद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..