नवीन लेखन...

कल्पना मोरपारिया – भारतीय स्त्रिया – आर्थिक क्षेत्र

कल्पना मोरपारिया यांचा जन्म ३० मे १९४९ रोजी भवानदास आणि लक्ष्मीबेन तन्ना यांच्या लोहाणा कुटुंबात झाला. लहान वयातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. १६ वर्षांच्या वयात त्यानी   शालेय शिक्षण पूर्ण केले आणि विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी सोफिया कॉलेज फॉर वुमनमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर १९७० पर्यंत त्यानी  रसायनशास्त्रात बी.एससी. पदवी प्राप्त केली. नंतर त्यानी  कायद्याची पदवी घेतली. कल्पना मोरपारिया या एक भारतीय बँकर आहेत. त्या आयसीआयसीआय बँकेशी तेहतीस वर्षे जोडल्या गेल्या आहेत . त्या आशियातील जेपी मॉर्गनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. कल्पना अनेक आघाडीच्या भारतीय कंपन्यांच्या मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून काम करतात. बॉम्बे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेल्या मोरपारिया यांनी भारत सरकारने स्थापन केलेल्या अनेक समित्यांवर काम केले आहे. फॉर्च्यून मासिकाने त्यांना आंतरराष्ट्रीय व्यवसायातील पन्नास सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक म्हणून स्थान दिले आहे.

करिअर

त्यांची मोठी बहीण पारुल ठक्करने कायद्याचे शिक्षण घेतले होते आणि त्या  एका सॉलिसिटर फर्मशी संबंधित होत्या . कल्पनानी  तेच करण्याचा निर्णय घेतला आणि लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. दरम्यान, त्यानी  जयसिंगशी लग्न केले.त्यानी  कायद्याची पदवी पूर्ण केली आणि १९७४ मध्ये मातुभाई जमीयतराम अँड मॅडॉन नावाच्या लॉ फर्ममध्ये  पगारावर रुजू झाल्या . १९७५ मध्ये, त्या  आयसीआयसीआयमध्ये त्यांच्या कायदेशीर विभागात काम करण्यासाठी सामील झाल्या . व्यवस्थापनाने त्यांच्यावर  विविध जबाबदाऱ्या सोपवण्यास सुरुवात केली. १९९१ मध्ये व्यवस्थापनाने त्यांना  अमेरिकेतील भांडवली बाजाराचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेला पाठवले जिथे त्यानी  न्यू यॉर्कच्या डेव्हिड पोल्क आणि वॉर्डवेलमध्ये तीन महिने काम केले. आयसीआयसीआय बँकेच्या जन्माची जबाबदारी त्यांच्यावर होती बँक  १९९९ मध्ये न्यू यॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध झाली. त्यानी  २००२ मध्ये आयसीआयसीआय बँकेचे आयसीआयसीआयमध्ये विलीनीकरण करण्यास मदत केली.

व्यवसाय प्रगती

कल्पना यांनी १९७५ ते १९९४ पर्यंत आयसीआयसीआयच्या कायदेशीर विभागात काम केले. १९९६ मध्ये त्यांना महाव्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर त्या कायदेशीर, नियोजन, कोषागार आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स विभागांच्या प्रभारी होत्या. १९९८ मध्ये त्यांना आयसीआयसीआयच्या वरिष्ठ महाव्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले. मे २००१ मध्ये त्या आयसीआयसीआयच्या संचालक मंडळात सामील झाल्या. मे २००२ मध्ये मंडळाने मोरपारिया यांना कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त केले. २००६ एप्रिलमध्ये पुन्हा त्यांना उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांना संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर त्या कॉर्पोरेट सेंटरच्या प्रभारी होत्या,  ज्यात घाऊक, किरकोळ, ग्रामीण आणि आंतरराष्ट्रीय बँकिंगसाठी व्यवहार प्रक्रिया आणि ऑपरेशन्स, धोरण, जोखीम व्यवस्थापन, अनुपालन, ऑडिट, कायदेशीर, वित्त, कोषागार, सचिवीय, मानव संसाधन व्यवस्थापन, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स आणि सुविधा व्यवस्थापन आणि प्रशासन कार्ये यासारख्या जबाबदाऱ्या होत्या. १ जून २००७ ते २०१२ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी त्या मुख्य धोरण आणि संप्रेषण (कम्युनिकेशन)  अधिकारी होत्या. आज त्या जे.पी. मॉर्गनच्या सीईओ आहेत, तसेच त्या टाटा कन्सल्टन्सीच्या डॉ. रेड्डीज लॅब, बेनेट अँड कोलमन, सीएमसी लिमिटेडच्या स्वतंत्र संचालक आहेत. त्या एअरटेलच्या सुनील मित्तल यांच्या भारती फाउंडेशनच्या  कार्याची देखरेख करतात. ही फाउंडेशन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये शाळांच्या बांधकामात गुंतलेली आहे आणि दुर्लक्षित शाळा दत्तक घेते.

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 110 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..