नवीन लेखन...

IUI – मुलं तयार करण्याचा कारखाना (?!)

शिर्षक वाचून नक्की आश्चर्य वाटेल. मात्र आयुर्वेदीय वंध्यत्व उपचारतज्ज्ञ म्हणून काम करताना गेल्या काही महिन्यांत आलेल्या रुग्ण- अनुभवांमुळे हे शीर्षक देणं भाग पडलं.

काय आहेत हे अनुभव? वाचा….

“आम्ही दोघेही जॉब करतो. दोघांचं वेळापत्रक खूपच विचित्र आणि थकवणारं आहे. आम्हाला शरीरसंबंध ठेवायला वेळच नसतो म्हणून IUI करण्याचा निर्णय घेतला पण चार सायकल्स होऊनही अजून तरी काहीच सक्सेस नाही. आता आयुर्वेदाच्या उपचारांत काही आहे का म्हणून तुमच्याकडे आलोय.”

विशेषतः IT मध्ये कार्यरत असलेल्या जोडप्यांकडून अशी विचारणा होण्याचे प्रमाण सध्या लक्षणीय वाढले आहे.

IUI म्हणजे नेमकं काय?

अगदी थोड्क्यात सांगायचं झाल्यास वंध्यत्व उपचार म्हणून सध्या विशेष लोकप्रिय ठरत असलेल्या या उपायात जोडप्यातील पुरुषाचे वीर्य घेऊन त्यातील उत्तम हालचाल असलेले सुदृढ शुक्राणू बाजूला काढून स्त्रीच्या गर्भाशयात थेट सोडण्यात येतात. या प्रक्रियेत स्त्रिलादेखील उत्तम बीजनिर्मिती व्हावी यासाठी काही औषधे, इंजेक्शन्स यांचा वापर केला जातो.

IUI कोणासाठी?

– शारीरिक क्षमतेतील काही त्रुटींमुळे शरीरसंबंध ठेवण्यात अडचण येत असल्यास.

– शुक्राणूंची संख्या कमी असणे वा त्यांत विकृती असणे.

– गर्भाशय मुख (cervix) संबंधित काही विकार.

– कारणमीमांसा स्पष्ट नसलेले वंध्यत्व इ.

काही महत्त्वाचे मुद्दे!

– वर मांडण्यात आलेले मुद्दा क्रमांक एक हा बहुतांशी (शारीर रचनात्मक दोषासारखे क्वचित अपवाद वगळता) कामशास्त्राच्या मदतीने तर मुद्दा क्रमांक दोन हा आयुर्वेदीय उपचार पद्धतीने यशस्वीपणे हाताळता येतो.

– गर्भाशय विकार उपचार संबंधित वा बीजनिर्मिती प्रक्रियेसंबंधितदेखील आयुर्वेदात विचार मांडलेले आहेत.

– National Institute for Health and Clinical Excellence (UK) नुसार पुरुष शुक्राणू संबंधित तक्रारी वा कोणतेही कारण स्पष्ट नसलेले वंध्यत्व याकरता IUI चा वापर सरसकट केला जाऊ नये. तिथे किमान दोन वर्षे अन्य उपचारांचा उपयोग करण्यात यावा.

– American pregnancy association च्या मतानुसार IUI या प्रक्रियेतील यशस्वितेचा दर सगळ्या गोष्टी आदर्श असल्यास जास्तीत जास्त २०% इतका असू शकतो. याचाच अन्वयार्थ असा की; या प्रक्रियेतील अपयशाचा दर हा कमीत कमी ८०% इतका असतो!!

– उत्तमोत्तम पुरुष आणि स्त्री बीजे निवडून आणि त्यांना एकमेकांच्या अगदी जवळ आणूनदेखील या प्रक्रियेचा यशस्विता दर इतका कमी का असावा; याचे कारण नीट लक्षात घेतल्यास इतकी सारी अनुकूल परिस्थिती असूनही काही ‘अज्ञात कारणास्तव’ बीजांचे मीलन न होणे हे असल्याचे दिसून येते. मग या साऱ्या द्राविडी प्राणायामाचा नेमका काय लाभ हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

वरील सगळे मुद्दे लक्षात घेऊन मुळात ‘सुज्ञपणे’ IUI चा उपयोग केला जातो का? याचं प्रामाणिक उत्तर शोधण्याचा प्रयत्न ज्याचा त्याने करावा. इथे त्या प्रक्रियेवर सरसकट आक्षेप नसून त्याचा बाजार माजवण्यावर आहे. शरीरसंबंधातून मुलं होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यासाठी IUI वा त्यापुढील IVF हे काही मार्ग नव्हेत वा वर उल्लेख केल्याप्रमाणे मुलं तयार करण्याचे कारखानेदेखील नव्हेत. नैसर्गिक शरीरसंबंध प्रस्थापित करण्यास अडथळा येत असेल वा अन्य कोणत्याही संबंधित समस्या असतील तर त्यावरील उपाय शोधण्यास आयुर्वेदाचा प्रथम पर्याय म्हणून अवश्य विचार करा. आयुर्वेद आणि कामशास्त्र यांच्या मिलाफातून बहुतांशी संबंधित समस्यांवर उत्तरे सापडतात. क्वचित ज्या रुग्णांत तसे होत नाही त्यांचीही शरीरे (किंबहुना बीजे) वरील उपचारार्थ उत्तम प्रकारे तयार करण्याची भूमिकादेखील आयुर्वेद बजावतो. बहुतेकदा अपरिचित असलेली ही सारी माहिती तुमच्यासमोर मांडली. बाकी निर्णय सर्वस्वी आपलाच!!

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदीय वंध्यत्व उपचार तज्ज्ञ
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

14 March 2017

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..