नवीन लेखन...

भारताचे विख्यात ऑफस्पिनर श्रीनिवास राघवन व्यंकटराघवन

भारताचे विख्यात ऑफस्पिनर श्रीनिवास राघवन व्यंकटराघवन यांचा जन्म २१ एप्रिल १९४६ रोजी मद्रास येथे झाला.

सध्याच्या पिढीला त्यांची ओळख निवृत्त झालेले कसोटी पंच अशी असली, तरी ७०च्या दशकात टिच्चून केलेली ऑफस्पिन गोलंदाजी ही त्यांची मूळ ओळख होय. भारताचे विख्यात ऑफस्पिनर, कर्णधार आणि नंतर उत्कृष्ट कसोटी पंच बनलेले श्रीनिवास वेंकटराघवन उजव्या हाताने गोलंदाजी राईट आर्म ऑफ ब्रेक करण्यात पटाईत होते. श्रीनिवास वेंकटराघवन यांनी चेन्नईतील प्रसिद्ध गुंडी अण्णा अभिय़ांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. श्रीनिवास वेंकटराघवन हे १९७० च्या दशकातील प्रसिद्ध फिरकीपटू गोलंदाज होते. परंतु, संघात बिशन सिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना आणि भागवत चंद्रशेखर यांच्यांसारखे फिरकीपटू गोलंदाज असल्यामुळे त्यांना बऱ्याचदा दुसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर गोलंदाजीस संधी मिळत असे. रणजी ट्रॉफी कारकिर्दीत रजिंदर गोयल (६३७) यांच्यानंतर वेंकटराघवन यांनी ५३० विकेट्स घेतल्या होत्या. तर, प्रथम श्रेणी कारकिर्दीत बिशन बेदी (१५६०) यांच्यानंतर वेंकटराघवन यांनी १३९० विकेट्स घेतल्या होत्या. केवळ गोलंदाजीतच नव्हे तर वेंकटराघवन फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही सराईत होते. ५७ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ३६च्या सरासरीने १५६ विकेट्स घेतल्या. ही आकडेवारी फार अप्रतिम नसली, तरी तो जमाना बेदी, चंद्रा आणि प्रसन्ना या विख्यात स्पिनरांचा होता हे लक्षात घेतले पाहिजे. दोन अर्धशतके त्यांनी झळकवली. त्यांनी कसोटीत पदार्पण २७ फेब्रुवारी १९६५ रोजी केले. एकदिवसीय मध्ये १३ जुलै १९७४ त्यांनी सुरवात केली होती. त्यांनी त्यांचे एकदिवसीय आणि कसोटी पदार्पण इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर असताना केले.

१९७५ आणि १९७९ च्या प्रुडेन्शियल विश्वचषक स्पर्धेत वेंकटराघवन हे भारतीय संघाचे कर्णधार होते. विश्वचषकात भारताचे पहिले कर्णधार म्हणून इतिहासात त्यांची नोंद झाली. वेंकटराघवन हे १९७१ च्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ सामन्यांच्या आणि इंग्लंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचे उपकर्णधार होते. त्यावेळी भारताने दोन्ही कसोटी सामन्यांच्या मालिका जिंकल्या होत्या.

पहिल्या दोन विश्वचषकात त्यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व तर केलेच शिवाय पुढे संघ व्यवस्थापक, आंतरराष्ट्रीय पंच, सामनाधिकारी अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. टीम इंडिया कडून १९६५ ते १९८३ पर्यत खेळले. त्यांनी अंपायरिंगची कारकीर्द १९९३ मध्ये सुरु केली. पंच म्हणून वेंकटराघवन यांनी ७३ कसोटी सामन्यात आणि ५३ वनडे सामन्यात काम केले. पंच म्हणून काम करताना त्यांनी क्वचितच चूका केल्या असतील. संघातील खेळाडूही त्यांचा आदर करत असत. त्यांनी १९९९च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघातील अंतिम सामन्यात तिसरे पंच म्हणूनही काम केले होते. आयसीसी इलाईट पॅनलमध्ये एकमेव भारतीय अंपायर होते. वेंकटराघवन हे एकमेव असे क्रिकेटपटू आहेत जे ५० हून अधिक कसोटी सामन्यात पंच राहिले आहेत. ते ११ वर्ष अंपायरिंग क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या नंतर त्यांच्या तोडीचा आंतरराष्ट्रीय पंच भारता कडून झाला नाही. याशिवाय ते बीसीसीआयचे राष्ट्रीय निवडकर्ताही होते. तसेच त्यांची वृत्तपत्र स्तंभलेखक अशीही एक वेगळी ओळख आहे.

२००३ मध्ये भारत सरकारने श्रीनिवास राघवन व्यंकटराघवन यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..