नवीन लेखन...

भारतीय अक्षय ऊर्जा दिन

आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आज २० ऑगस्ट ! १६ वर्षांपूर्वी म्हणजेच २००४ साली भारत नवीन व नूतनीकरणयोग्य ऊर्जा स्रोत मंत्रालय (The Indian Ministry For New & Renewable Sources) ह्यांनी ह्या दिवसाची स्थापना केली. ह्या दिवसाची स्थापना माजी पंतप्रधान राजीव गांधी ह्यांच्या वाढदिवसानिमित्त झाली होती. २००४ म्हणजे ह्या दिनाच्या दिवशी सर्वप्रथम सोहळा नवी दिल्ली येथे झाला. २००५ साली नागपूर , २००६ साली हैद्राबाद , २००७ साली पंचकुला व २००८ साली हरियाणा येथे ह्या सोहळ्याची पुनरावृत्ती झाली.

हा दिवस स्थापन करण्यामागे सगळ्यांना अक्षय ऊर्जेचं महत्व पटावं , हा उद्देश होता.

सौर ऊर्जा , पवन ऊर्जा , जलविद्युत ऊर्जा ही अक्षय ऊर्जेची प्रमुख उदाहरणं आहेत. ह्या ऊर्जा वापर करण्यामागे सर्वात मोठं कारण आहे की , ह्या ऊर्जा नैसर्गिक व सगळ्यात महत्त्वाचं फुकट उपलब्ध आहेत. ह्या ऊर्जांचा वापर केल्यास पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होऊ शकते. ह्यांचा वापर केल्यास प्रदूषण देखील कमी होऊ शकते. पैसा वाचू शकतो.

सध्याचा काळ पहाता , ह्या ऊर्जांचा वापर करणं सोयीचं ठरेल. म्हणूनच आजच्या दिवशी नैसर्गिक स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करू.

वापरुनी साऱ्या नैसर्गिक ऊर्जा

वाढवूया आपल्या सृष्टीचा दर्जा.

– आदित्य दि. संभूस.

#भारतीय अक्षय ऊर्जा दिवस #२० ऑगस्ट

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

2 Comments on भारतीय अक्षय ऊर्जा दिन

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..