नवीन लेखन...

स्तन्यपान किती काळ चालू ठेवावे?

प्रश्नाचे उत्तर सध्याला सर्रासपणे बाळाचे वय दीड- दोन वर्षे होईपर्यंत असे ऐकू येते. कित्येक बालरोगतज्ज्ञ असे मत अहंअहमिकेने मांडत असल्याचे दिसते. मात्र तसे करणे मुळीच योग्य नाही. आयुर्वेदानुसार विचार करता; बाळाला दात येण्यास सुरुवात होणे हे वय स्तन्यपान थांबवण्यास सुरुवात करण्याचे वय असते. माणसाचेच कशाला; जगातील कुठल्याही सस्तन प्राण्यांतील माता आपल्या पिल्लांना दात येऊ लागले की त्यांना पाजणे थांबवतात.

माणसांचा विचार करता साधारणपणे वयाच्या सहाव्या महिन्यापासून लहान मुलांना दात येण्याची प्रक्रिया सुरु होते. याच कालावधीत त्यांना ‘अन्नप्राशन संस्कार’ करवून स्थूल आहार देण्यास सुरुवात करावी असे आयुर्वेद सांगतो. पुढील दोन- तीन महिन्यांत मातेने स्तन्यपान करवणे थांबवून बकरीचे वा ते न मिळाल्यास देशी गायीचे दूध सुरु करावे असे आयुर्वेदाचे मत आहे.

वरील वयाच्या नंतरही दोन दोन वर्षे पूर्ण होईपर्यंत स्तन्यपान करवत राहिल्यास; ते सोडवताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. शिवाय; त्या मातेला कंबरदुखी, गुडघेदुखी, केस गळणे असे त्रास सुरू होतात. त्यापासून पुढे ही वाटचाल हाडांची झीज भरून काढण्यास कॅल्शियमच्या गोळ्या देणे, त्यातील कॅल्शियम किडनीमध्ये साचून राहिल्याने किडनी स्टोन होणे आणि मग ते काढून टाकण्यास अन्य पर्यायांचा विचार न करताच शस्त्रक्रिया करायला लावणे इथपर्यंत होऊ शकते. ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत्।’ हा सिद्धांत इथेदेखील लागू होतो हे कायम लक्षात ठेवावे. बाळगुटी वापरणे, बाळांना तेल लावणे- धुपन करणे, काजळ वापरणे वाईट आणि वयाची दीड दोन वर्षे पूर्ण होईपर्यंत स्तन्यपान करवणे मात्र चांगले असे ‘अशास्त्रीय’ सल्ले कोणीही देत असल्यास दुर्लक्ष करावे.

 

© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Aug 4, 2016

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..