नवीन लेखन...

हॉटेल आणि आरक्षण

जेव्हा आपण फिरण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं ते चांगल्या ठिकाणी राहणं. आज इंटरनेटच्या माध्यमामुळे Hotels Reservation करणं अत्यंत सोपं झालंय. पण आजही अनेक पर्यटक स्वत: Hotel Rooms त्याचं location पाहिल्याशिवाय बुकिंग्ज करत नाही. जे पर्यटक Tour Operators बरोबर प्रवास करतात त्यांची सगळी सोय त्या कंपनीतर्फे केली जाते.

हॉटेलचे आरक्षण करण्यासाठी वापरात येणाऱ्या काही महत्त्वाच्या बाबी.

१. प्रथम आपले बजेट ठरवा. त्याप्रमाणे Hotel ची निवड करणे सोपे होते.

२. तुम्ही किती जणं आहात. कारण Hotels च्या नियमाप्रमाणे एका रुममध्ये दोन मोठ्या व एक लहान मूल अशी व्यवस्था असते. जर आपण दोन मोठी व दोन लहान असाल तर आपल्याला Extra Bed घेणे आवश्यक असते. त्याचे वेगळे पैसे द्यावे लागतात. तसेच जर आपण एकल प्रवासी असाल तरीही आपल्याला दोन प्रवाशांचे पैसे देणे क्रमप्राप्त असते.

३. तुम्ही राहात असलेल्या Hotel चे location सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. प्रेक्षणीय स्थळांपासून जर Hotel दूर असेल तर तुमचा वाहनखर्च ही वाढतो.

४. जेव्हा तुम्ही Business Trip वर असाल तेव्हा अर्थातच तुमचे राहण्याचे ठिकाण तुमच्या कामाच्या ठिकाणापासून जवळ असणे फायद्याचे ठरते.

५. जेव्हा leisure trip ला असाल तर अर्थातच शांत ठिकाणी किंवा Resort चे बुकिंग केले जाते.

६. बुकिंग करताना Reservation आणि cancelation policies पाहून घेणे.

७. काही हॉटेल्सना आगाऊ रक्कम भरणे तर काही हॉटेल्सना तुमच्या Check Out च्या वेळी रक्कम भरणे क्रमप्राप्त असते.

८. Check In आणि Check Out च्या वेळा पाहाणे.

९. Hotel बुकिंग करताना त्यात काय काय समाविष्ट आहे ( Break Fast, Lunch/ Dinner, Taxes) ह्याची नीट पडताळणी करून घ्यावी.

१०. जेव्हा Hotel चे Special Package असते तेव्हा अनेक Add on services असतात.
त्यांच्या बद्दलही स्पष्टपणे विचारणे.

Hotel Booking करणं जितकं सोपं वाटतं तितकचं ते जिकरीचं ही आहे. पैसे भरण्याआधी सगळ्या शंकांचे निरसन होणे गरजेचे आहे. म्हणजे प्रवास सोपा आणि आनंदायी होतो.

-वृंदा दाभोळकर

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..