नवीन लेखन...

नोटबंदीची पाच वर्ष

आज नोटबंदीला पाच वर्षे पूर्ण झाली, पण त्याविषयीचा अनेकांच्या मनातील संभ्रम अजूनही दूर होत नाही, ८ नोव्हेंबर २०१६ ही भारताच्या आर्थिक इतिहासाची एक महत्वाची तारीख ठरली, जेंव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केली. रातोरात सगळ्यांची झोप उडाली. ज्यांच्याकडे काळा पैसा आहे असे लोक अडकित्त्यात सापडल्यासारखे झाले. गृहिणींनी डब्यात भरून ठेवलेले पैसे बाहेर काढले. बँक कर्मचाऱ्यांच्या डबल शिफ्ट लागल्या. नोटा बदलवून घेण्यासाठी लांबच-लांब रांगा लागल्या. न्यूज चनेल वर अनेक वाद विवाद झाले. ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आल्या. अनेकांना आवडल्या तर इतरांनी त्या खपवून घेतल्या. नोटबंदी एका वादळा सारखी आली आणि आता तीन वर्ष होता-होता हळू-हळू निवळली. या सगळ्यात प्रत्येक जण तावून-सुलाखून निघाला. नोटबंदी विरोधक आणि समर्थक आज देखील आहेत. प्रत्येकाचा वेगळा अनुभव. प्रकारची वेगळी प्रचीती होती.

चार वर्षापूर्वी नोटबंदी का झाली, याचे कारण समजून घेतले पाहिजे. २०१५-१६ ला जे काही कागदी चलन भारतात होते, त्यातील ९५ टक्के चलन हे उच्च मूल्याच्या नोटांच्या रुपात होते. (१००० च्या नोटा- ३८ टक्के, ५०० च्या नोटा- ४५ टक्के आणि १०० च्या नोटा- १० टक्के) याचा अर्थ ३० टक्के नागरिक दारिद्य्ररेषेखाली जीवन जगत असताना एकूण चलनाचे ९५ टक्के मूल्य अशा तीन मोठ्या नोटांत होते. त्यामुळे पैसा फिरत नव्हता आणि त्याचे एक दुष्टचक्र तयार झाले होते.

एका आजारातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा व्हावा, असे हे दुष्टचक्र काम करत होते. याचा अर्थ मोठ्या नोटांच्या अधिक प्रमाणामुळे बॅंकिंग करण्याची गरजच पडत नव्हती, बॅंकिंग न केल्याने अर्थव्यवस्थेत क्रेडीट तयार होत नव्हते. ते होत नसल्याने भांडवल निर्मितीचा वेग मंदावला होता आणि त्यामुळे ते महाग होते म्हणजे व्याजदर जास्त होते. ते जास्त असल्याने शेती, व्यवसाय आणि उद्योगांना कर्ज घेणे इतके महाग पडत होते म्हणजे ते ज्या वस्तू निर्माण करत होते, त्या देशात महाग विकाव्या लागत होत्या तर जागतिक बाजारपेठेत त्यांना स्पर्धा करता येत नव्हती.

बॅंकिंगच कमी केल्यामुळे करवसुली चांगली होण्याचा संबंधच राहिला नव्हता. त्यामुळे प्रचंड संपत्ती निर्माण करणारा आपला देश गेली ७० वर्षे प्रचंड आर्थिक तुटीचा आणि अतिशय कमी दर्जाच्या सार्वजनिक सेवांचा सामना करत होता. या दुष्टचक्राच्या अखेरीस एका सामाजिक असुरक्षिततेत आपण अडकलो होतो.

आता नोटबंदीने हे दुष्टचक्र लगेच म्हणजे गेल्या चार वर्षांत भेदले गेले, असे अजिबात म्हणता येणार नाही.पण चार वर्षांत डिजिटल व्यवहारांना चालना दिली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्क्यांनी वाढले आहे. तसेच, काळाबाजार रोखण्यासाठी खरेदी केलेल्या वस्तूंची बिले घेण्याचे प्रमाणात गतवर्षीच्या तुलनेत वाढ होताना दिसत आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू, किराणा आणि घरकाम करणा-यांचे मासिक वेतनाचे व्यवहार आजही रोखीनेच होत आहेत. कारण व्यवहारातील सवयी बदलण्यास काही वर्षे जातात, हे लक्षात घ्यावे लागेल. पण त्यामुळे दिशा बदलण्यास सुरुवात झाली, हे महत्त्वाचे.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4228 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..