नवीन लेखन...

फस गये ओबामा

मल्लिका आणि ओबामांच्या भेटीचं वृत्त कानावर पडताच राखी सावंतांनी आकाशाकडे बघितले नि देवा,ओबामांनी काय केलय हे त्यांना कळलेलं नाही,त्यामुळे त्यांना तू माफ कर असं त्यांनी आकाशस्थ देवाला विनंती केली.हे राखी सावंत यांचं सॉफ्ट रुप होतं.

या सॉफ्ट रुपातून हॉर्ड रुपात त्यांना यायला वेळ लागला नाही.त्या तशा येताच त्यांचा जळफळाट झाला.त्या स्वत:शीच म्हणाल्या,ती मल्लिका शेरावत असेल तर मी राखी सावंत आहेना.राखी सावंत हे नावच पुरेसं नाही का.मल्लिका ज्या शाळेतील विद्यार्थीनी आहे.त्याशाळेची मी डिलीट धारक स्टुडंट आहे.तिच्या मुखात फुलझडया असतील तर माझ्या मुखात फटाके आहेत.ओबामांना ती आयटम वाटत असेल तर मी आयटेम बाँब्म आहे.ओबामांना हे कुणी तरी सांगायला हवं की मल्लिकाला टीआरपीच नाही.पण राखी सावंतचा टीआरपी नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.मल्लिका बोलते तेव्हा जर वाद निर्माण होत असेल तर राखी सावंत जेव्हा बोलते तेव्हा वितंडवाद निर्माण होतो.समजा मी आणि मल्लिका एकाच नाण्याच्या दोन बाजू असेल तरी,खरं नाणं -खोटं नाणं कोणतं हे ठरविण्याचा निरक्षिर विवेक ठेवायलाच हवा.

राखी सावंत छत्रपतींच्या राज्यातील कन्या असल्याने तिला खोटं बोलणं अजिबात पसंत नाही.मल्लिका भजनलालांच्या राज्यातील कन्या असल्याने तिच्या बोलण्याची सत्यता कोण तपासणार.

राखी का स्वंयवर ते राखी का इंसाफ या साऱ्या टप्प्यांवर मी जाऊन आले आहे.मर्डरच्या पुढे मल्लिकाची मजल कुठे गेली तर हिस्स करण्यात.ते कसं फुस्स झालं हे ओबामांना कुणीतरी सांगायला नको का.

शाहरुख खान म्हणतो आय ऍ़म द बेस्ट.तो त्याच्या प्रातंातला बेस्ट आहे.व्हीवीयन रिचर्ड म्हणाला,सचीन द बेस्ट.सचीन त्याच्या प्रांतातला बेस्ट आहे.मल्लिकाला तिच्या प्रांतातील ती बेस्ट आहे असं, महेश भट्ट सुध्दा म्हणणार नाही.बेस्ट गाडयाच बेस्ट असतात असं ते म्हणतील.मल्लिका जर बेस्ट नसेल तर कुणी तरी बेस्ट असेलच की नाही.ती बेस्ट म्हणजे राखी सावंत.हे ओबामांना सांगायला हवं.

तुम्ही म्हणाल वेळ निघून गेल्यावर आता कशासाठी सांगायचं.अहो,मल्लिकाला बोलावून त्यांची बूंदने गेली आहे.ती भरुन काढणारा हौद म्हणजे राखी सावंत .

माणूस हा स्खलनशील प्राणी असल्याने त्याच्याकडून चुका होतातच.त्या जर झाल्या नाही तर देअर इज समथिंब डिफेक्ट इन हिम ,असं समजायला हवं ,असं ओशो रजनीश 24 वर्षापूर्वी म्हणाले होते.4 महिन्यांपूर्वी हेच श्री रविशंकर म्हणाले.असं समजूया की ओबांमाकडून चूक झाली.चुका दुरुस्त करता येतात.त्यासाठी नवग्रहांची शांती करण्याची किंवा पशुपतीनाथाच्या मंदिरात जाऊन अभिषेक करण्याची गरज नाही.तिरुपती बालाजीला सोन्याचे दागिने देण्याची गरज नाही.सत्यनारायण करण्याची गरज नाही.हाजी अलिला चादर चढविण्याची आवशक्यता नाही.गुरुद्वारात मथ्थाच टेकवायला हवा ,असं कुणी सांगितलं तुम्हाला.माहीमच्या चर्च मध्ये जावं लागतं असं कोण बरं म्हणतय..अहो चुका दुरुस्त करण्याचे 121 मार्ग आहेत,बाबा सोमदेव यांच्या पुस्तकात.ओबामांना चूक दुरुस्त करण्याची संधी दिलीच पाहिजे की नाही.दुर्याेधनाला त्याच्या अनंत चुका दुरुस्त करण्याची वांरवार संधी कृष्ण देत होता.रावणाला त्याच्या चुकीची दुरुस्ती करण्याची संधी देण्यासाठी हनुमंत लंकेत गेला होता.तेव्हा ओबामांची ही पहिलीच चूक असल्याने त्यांना ती दुरुस्त करण्याची संधी देण्याची माझी आग्रही मागणीच आहे.शशी थरुर यांच्या मार्फत मी ही मागणी युनस्कोमध्ये मांडू शकते.

राखी सावंतला चहासाठी निमंत्रण देऊन ओबामा ही चूक दुरुस्त करु शकतात.यावेळी त्यांनी चहा पिला नाही तरी चालेल.मी सेवाग्राम येथे तयार होणारे आंबाडीचे शरबत घेऊन जाते.सेवाग्राम म्हणजेच गांधी बाबांच्या वास्तव्याने पवित्र झालेले ठिकाण.ओबामा गांधी बाबांचे भक्त.तर गांधी बाबांच्या गावातील शरबत म्हणजे त्यांना तीर्थासारखे पवित्र.

बघा, मला बोलवल्याने मल्लीकाला
बोलावून त्यांनी केलेली चूक दुरुस्त होईल आणि नि मी दिलेल्या आंबाडी शरबतामुळे पापक्षालनही होईल.राखी सावंतलाच हे कळू शकतं.सुचू शकतं.तीच हे करु शकतं.

राखी सावंत यांनी आपल्या मनातील या विचारांना मोकळीक करुन दिली आहे.त्यांचे हे विचार आता अमेरिकेकडे हवेसोबत उडत उडत निघाले आहेत.ते लवकरच व्हाईट हाऊस मध्ये पोहचतील.ओबामा आणि मिशेल वहिनी या विचारांना तपासतील आणि राखी सावंत यांना चहापानासाठी निमंत्रण देतील अशी आशा करु या..

तो दिवस धन्य करणारा असेलच कारण,अटकेच्या अटके पार झेंडा लावणाऱ्या पहिल्या मराठी मुलीचा व्हाईट हाऊसने,सन्मान केला,हा गौरव आपल्याला प्राप्त होईल.

राखी सावंत यांनी दिलेल्या आंबाडी शरबताने प्रभावित झालेले ओबामा या शरबातचं आंतरराष्ट्रीय उत्पादन करण्यासाठी सेवाग्रामला प्लांट काढण्याचा निर्णय घेतील.

डे वुईथ ओबामा ही लेख मालिका राखी सावंत टाईम्स ऑफ इंडियासाठी लिहितील.
टीआरपी वाढविण्यासाठीचे गुरुमंत्र राखी सावंत ओबामांना देतील.
कदाचित,कदाचित राखी सावंत यांना ऑफिसर ऑन स्पेशल डयूटी-सल्लागार, या पदावर सुध्दा ओबामा नियुक्ती देऊ शकतील..

अस घडणार नाही.हे कुणी खात्रीपूर्वक सांगू शकतील का..नाही ना..अहो,जगात क्षणाक्षणाला चमत्कार घडत असतात की.मल्लिका शेरावत हीस चहापानासाठी ओबामांच्या निमंत्रणाचा चमत्कार घडू शकतो ,तर राखी सावंत यांना निमंत्रण आणि पुढचं सारच काही घडू शकण्याचा चमत्कार कां होणार नाही..चला बेट लावा बरं..

— सुरेश वांदिले 

Avatar
About सुरेश वांदिले 10 Articles
श्री. सुरेश वांदिले हे महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागात संचालकपदावर आहेत. महाराष्ट्र शासनाच्या “लोकराज्य” या मासिकाचे ते संपादक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..