नवीन लेखन...

जनुकीय बदलांचे परिणाम

आम्ही आयुर्वेदीय वैद्य नैसर्गिक गोष्टींवर कायम भर देत असतो. अगदी आपले अन्नधान्यदेखील शक्य तितके नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले असले पाहिजे यावर आमचा भर असतो. जनुकीय सुधारित वा संकरित धान्य/ भाज्या सर्रास वापरल्या जात असल्या तरी आम्ही त्यांतील संभाव्य धोकेही सतत सांगत असतो. असं करणारे आम्ही आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने बऱ्याचदा थट्टेचा विषय किंवा बुरसटल्या विचारांची छाप असतो. त्यांच्या संशोधनानुसार हे अन्न खाण्यास अगदी योग्य आणि आरोग्याला काहीच अपाय न करणारे असते.
असे असताना वैद्यगण मात्र नेमके याविरुद्ध मत का बरं नोंदवत असावेत? मित्रांनो; काही गोष्टींचे दुष्परिणाम तात्काळ दिसतात तर काहींना कित्येक वर्षे जावी लागतात. कित्येक वर्षे घेतलेले एखादे औषध यकृताला घातक असल्याचे ‘नुकतेच’ करण्यात आलेले संशोधन सांगते असं कारण देत काही औषधे बदलली जातात हे आपल्या अनुभवाचे आहे. मग इतकी वर्षे ती औषधे निर्धोक असल्याच्या निर्वाळ्याचे नेमके काय बरं झाले? असा प्रश्न आपल्याला पडत नाही का?
याच विषयाशी संबंधित असलेले एक वेगळे उदाहरण देऊन अधिक स्पष्ट करतो. कुत्रा हा आपल्यापैकी कित्येकांचा आवडता पाळीव प्राणी. त्यातही वोडाफोनच्या जाहिरातीमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर गाठलेला पग प्रजातीचा कुत्रा कित्येकांच्या गळ्यातला ताईत असतो. ‘शो क्युट’ असणाऱ्या या कुत्र्याची कर्मकहाणी आपल्याला बहुतेक वेळा ठाऊक नसते. हा कुत्रा गोंडस दिसावा यासाठी त्याच्यात वर्षानुवर्षे जनुकीय बदल केले गेले. परिणामस्वरूप आज हा कुत्रा गोड गोंडस दिसत असला तरी त्याला असंख्य आजारांना आणि त्रासांना सामोरे जावे लागते. दातांचे विकार, श्वसनसंबंधी विकार, डोळे आणि कानाचे विकार हे त्यांतील काही प्रमुख. याशिवाय या प्रक्रियेमुळे त्यांच्यामागे उच्च रक्तदाब आणि हृदयविकार हे त्रासही कायमचे लागले. पग इतर कुत्र्यांपेक्षा अधिक काळ झोपून असतो हे आपण पाहिले असेल. हा त्याचा नैसर्गिक स्वभाव नाही तर त्याचा नाईलाज आहे! मेंदूचा रक्तपुरवठा सुरळितपणे चालू ठेवण्यासाठी त्याला सतत झोपावे लागते. त्याच्या मऊशार त्वचेत सतत जंतूसंक्रमण होत असते. कित्येक पग हे पॅरॅलीसीस चा झटका येऊन खंगून मरतात; यामागील कारण त्यांची जनुकीय सुधारणा करून निर्माण केलेली आणि गोग्गोड दिसणारी शेपूट असते!!
आजवर ही माहिती आपल्याला होती का? प्राणी शास्त्रातील तज्ज्ञांकडून खात्री करून ही सारी माहिती आपल्यासमोर मांडली आहे. ‘दृष्टी आड सृष्टी’ हा नियम सर्वत्र लागू पडतो. मग तो संकरित पग असो वा संकरित वांगं किंवा टॉमेटो. निसर्गापासून आपण जितकं दूर जाऊ तितके दुष्परिणाम होत जाणार हे निश्चित. त्यातील काही अपचन, त्वचाविकार यांच्या स्वरूपात आज दिसतील तर काही वंध्यत्वाच्या वा असाध्य रोगांच्या स्वरूपात आपल्या येणाऱ्या पिढ्यांत दिसून येतील. संकरित अन्नाविषयी वैद्य वर्तवत असलेली भीती खरी आहे मित्रांनो; जरी आज बहुतांशी अन्न धान्य तसेच असले तरी त्यापासून शक्य तितके दूर रहा आणि शक्य तितके नैसर्गिक शेतीला पाठबळ मिळवून द्या. याकडे दुर्लक्ष करून विषाची परीक्षा कोणाला करायची असेल तर त्यांनी जरूर करावी; किमान लोकांना जागं करण्यापासून आम्हाला परावृत्त करण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नये!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
#घरोघरी_आयुर्वेद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..