नवीन लेखन...

ध्यास..

गर्दीतून बाहेर पाय काय काढला..
आणि, ध्येय मलाच शोधत आलं …!

माणसांच्या विकासात इतरांचा वाटा असतो, हे खरेच आहे आणि या वाट्याबद्दल प्रत्येकाने कृतज्ञ असायलाच हवे. परंतू मनामध्ये ही कृतज्ञता बाळगत असतांनाच माणसाने आपल्या विकासासाठी आपला प्रयत्न, आपला विवेक, आपले ध्येय, आपले जीवनविषयक दृष्टिकोन इ. घटकांवरच अवलंबुन राहायला हवे.

आईवडील जन्म देतात आणि इतर अनेक व्यक्ती आपली जडणघडण करतात, हे खरे असले तरी आपल्या जीवनाचे ध्येय मात्र ज्याचे त्यालाच शोधावे लागते. तो प्रवास ज्याचा त्यालाच करावा लागतो. विशेषतः जीवनाची काही अंगे तर इतकी सूक्ष्म असतात, की तिथे बाहेरच्या मदतीपेक्षा माणसाच्या मनाची भरारीच महत्वाची असते. एखाद्या कळीला बाहेरून जबरदस्ती करून उमलवता येत नाही. अणुबॉम्ब चा उपयोग करून आपण एखादा पहाड उध्वस्त करू शकू, पण एवढ्या प्रचंड शक्तीने देखील त्या कळीला उमलवता येणार नाही. ती कळी तिच्या अंतर्यामीच्या जीवनरसानेच उमलू शकते. बाहेरच्या वातावरणाची वा इतर घटकांची तिला मदत लागत नाही असे नव्हे. पण उमलायचे असते ते तिचे तिनेच.

आपल्या सभोवतालच्या गोष्टींवर दार्शनिकदृष्ट्या पाहण्याची क्षमता जीवनाच्या परीक्षांवर मात करण्यासाठी शांततेने आणि सोपे विचार करण्यास मदत करते.
यश म्हणजे रहस्य नाही तर सातत्याने केलेली कठोर मेहनत आहे. यश एका रात्रीत मिळत नाही, दिवस रात्र एकच विचार मनात असला पाहिजे ‘माझ्यात अजून सुधारणा कशी होईल.’

एकेका कणाचा प्रवास करून स्वतःच स्वतःला थोडे-थोडे उंचावर नेणे ही खरी साधना असते. या प्रवासात क्षणाक्षणाला माणसाचा एक नवा जन्म होत असतो आणि म्हणूनच या प्रत्येक जन्माच्यावेळी त्याला स्वतःलाच जणूकाही प्रसूतिवेदना भोगाव्या लागतात. त्या वेदनाही स्वतःच भोगायच्या आणि स्वतःला लाभलेले नवे देखणे रूप पाहून क्षणाक्षणाला रोमांचित व्हायचे, तेही आपले आपणच….

श्याम ??


Avatar
About Shyam Thackare 17 Articles
एक वाचक, एक श्रोता आणि रोजच्या जीवनातून जे अनुभव गाठीशी येतील ते अलगद कागदावर उमटवणारा मी...आणि काही आठवणी, काही अनुभव, काही मतं… लेखणीद्वारे मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न…!
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..