नवीन लेखन...

देवास शिक्षा !

समजायला लागल्यानंतर म्हणणे सुध्दा चुकीचे होईल इतक्या लहान वयातील अंधुकशी आठवण.

त्या वेळी माझे वडील विदर्भातील मेहकर या गावी व्हेटरनरी डॉक्टर होते. राहायला सरकारी निवास स्थान होते. कबुतारांसाठी बांधतात तसे आवारात एक ८-१० फुट उंचीवरच्या खांबावर मचाण बांधलेले होते. त्यावर कोंबडीचे खुराडे होते. खुराड्यात २-३ कोंबड्या पाळलेल्या होत्या. बहुदा मांजर – मुंगुस या प्राण्यांपासून व पावसाळ्यातील साचत असलेल्या पाण्या पासून कोंबड्यांचे संरक्षण करण्यासाठी असावे.

सकाळच्या कोवळ्या उन्हात मी व माझ्या पाठची दीड-दोन वर्षांची बहिण बेबी अंगणात येऊन त्या कोंबड्यांना आ आ असे करून जवळ बोलवीत होतो. त्या कोंबड्या व त्यांची पिलावळ आमचे कडे दुर्लक्ष्य करून इतस्ततः खाद्याच्या शोधात फिरत होती.. हे बघून नाना म्हणजे आमचे वडील घरातून जोंधळ्याचे पसाभर दाणे घेउन आले व आम्हा दोघांना ते दाणे कोंबड्यान समोर टाकण्यास सांगितले. असे दाणे फेकल्यावर मग कोंबड्या ते टिपण्यासाठी आमचे जवळ आल्या. ते पाहून आम्हास खूप गम्मत वाटली.

दाणे टाकले की कोंबड्या आपले पाशी येतात हे समजल्या नंतर आम्हीच मग रोज घरातून दाणे आणून ते कोंबड्यान समोर टाकून त्यांना आ आ करून जवळ बोलवू लागलो. काही दिवसांनी त्यांची भीड चेपून ते आमच्या हातावरचे दाणे देखील टिपू लागले. त्यांच्या बरोबर मग आम्ही पाठशिवणीचा खेळ देखील खेळावयास शिकलो.

माझ्यात व माझी बहिण बेबीत दीड वर्षाचे अंतर होते. मी मोठा असल्याने ती मला भाऊ म्हणायची. माझी दुसरी बहिण विद्या ही आमच्या कुटुंबात प्रवेश करण्याच्या प्रतीक्षेत होती!

असेच एके दिवशी दुपारी, आमची आई पुस्तक वाचत आडवी पडली होती. बेबी भाऊ भाऊ म्हणत माझ्या भवती पिंगा घालीत होती. दारा कडे बोट दाखवून बाहेरील कोंबड्या दाखवत तोंडाने आ आ करीत बोटांनी त्यांना बोलव होती. ते पाहून मी घरातून पेलाभर जोंधळे आणले व आम्ही दोघे अंगणात गेलो. बेबीच्या हातावर काही दाणे ठेवले व काही मी माझ्या हातावर घेतले आणी कोंबड्यांना बोलावून हातातले दाणे त्यांना देत होतो त्या देखील आमच्या हातातून दाणे टिपत होत्या. मी मधेच हातातले दाणे खाली टाकले व ते टिपण्यास आलेल्या कोंबडीला पकडण्याचा प्रयत्न केला पण ती मला हुलकावणी देऊन उडून दूर पळाली. मग आम्ही दोघे तिचा पाठलाग करू लागलो. काही केल्या ती आमचे हाती लागेना. तिचा पाठलाग करता करता आम्ही रस्त्यावर कधी आलो ते समजलेच नाही.

आमचे घर हे दवाखान्याच्या आवारात होते व आवाराला चारी बाजूने बांधलेल्या भिंतीचे कुंपण होते. जाण्या येण्यास मोठे लोखंडी दार होते. ते नेहमी उघडेच असायचे. आवारा बाहेर गावाचा मुख्य रहदारीचा रस्ता होता.

आम्ही आता रस्त्यावर होतो. कोंबडीने आम्हास केंव्हाच चकवले होते. दमल्यामुळे आम्ही दोघे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या दगडावर बसलो व रहदारीची मजा बघत होतो. रस्त्यावर कडेला फुलांची तसेंच खेळण्यांची दुकाने होती. ती पाहून आम्ही दोघे हातात हात घालून तिकडे फिरू लागलो.

फिरता फिरता आम्ही खूप दूर निघून आलो. थोड्या वेळाने आजू-बाजूला बरेच लोक टोपल्या विणत असलेली दिसली. म्हणजे आम्ही बुरुड आळीत पोहचलो होतो. आम्ही टोपल्या विणताना बघत होतो. तोच त्या पैकी एकाने काय रे मुलांनो तुमचे आई-बाबा कोठे आहेत? असे विचारले. ते ऐकताच आम्ही दोघे भानावर आलो.

आजूबाजूला अनोळखी लोक बघून आम्ही घाबरलो. बेबी माझा हात ओढून घरी चल असे म्हणून आईच्या आठवणीने रडू लागली. मी देखील तिच्या बरोबर घाबरून रडू लागलो. आम्ही घर चुकलो आहोत हे आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आले. ते आम्हाला नावे विचारू लागले. बेबीला तिचे नाव सांगता येत नव्हते. मी माझे नाव अविनाश यशवंत गद्रे असे सांगितले पण पत्ता सांगता येईना. फक्त दवाखान्यात राहतो असे सांगत होतो. त्या वरून तेथील कोणास काही उलगडा होत नव्हता.

बामनाची पोर दिसतात. कोणीतरी कुजबुजले. तेथील एका कनवाळू प्रौढेने आम्हा दोघांना बाजूला घेउन स्वत: जवळ बसवले. तिच्यापरीने ती आमचा पत्ता जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती. पण मला काही नीट सांगता येईना. दवाखाना एवढेच मी सांगू शकत होतो. लहानग्या बेबीने तर भोकाडच पसरले होते. मुले चुकली आहेत. यांना पोलीस चौकीत घेउन चला. कोणीतरी सुचवले.

पोलिसाचे नाव ऐकून मी पार घाबरून गेलो व मोठ्याने गळा काढला. या वेळे पर्यंत अंधारून आले होते. आता आणखी वाट नको बघावयास असे म्हणत तेथील एकाने बेबीस कडेवर घेतले. एकाने माझा हात धरून समजावणीच्या सुरात चल आपण तुझ्या घरी जाऊ असे म्हणत आम्हाला घेउन जाऊ लागले. आमच्या बरोबर आणखी २-४ लोकांचा घोळका चालू लागला. थोड्याच वेळात आमची वरात पोलीस स्टेशनला आली. तेथे खूप पोलीस पाहताच माझे धाबे दणाणले. मी घाबरून रडू लागलो. आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊन आलेला जमावडा निघून गेला.

तेथील एक पोलिस आम्हास चुचकारून अतिशय प्रेमळपणे आमची चोकशी करू लागला. त्याच्या प्रेमळ बोलण्याने आमची भीती जराशी कमी झाली. मी माझे पूर्ण नाव व दवाखान्यात राहतो एवढेच सांगू शकत होतो. इतक्यात दुसरा एक पोलीस आमचे साठी लिमलेटच्या गोळ्या घेउन आला व आम्हास देऊ लागला. परक्या इसमांनी काही खावयास दिले तरी ते घ्यायचे नाही अशी घरची शिकवण असल्याने मी व बेबीने एकमेकांकडे पाहून नकारात्मक मान डोलावून त्या गोळ्या घेण्यास नकार दिला. तो पोलीस खूप आग्रह करत होता. आम्हास देखील गोळ्या खाण्याचा मोह होत होता पण संस्कार आडवे आले.

इतक्यात बेबीला आमचे नाना सायकल वरून पोलीस स्टेशन मध्ये शिरताना दिसले. तिने एकदम ना SनाS असा हंबरडा फोडला. तिच्या ओरडण्याने माझेही लक्ष त्यांचे कडे गेलेे व आम्ही दोघेही धावत जाऊन त्यांना बिलागलो. आम्हा दोघांना सुखरूप पाहून त्यांना देखील एकदम भरून आले. त्यांची व घरात माझ्या अवघडलेल्या आईची आम्ही हरवल्याचे लक्षात येताच काय स्थिती झाली असेल त्याची कल्पना मुले-नातवंडे झाल्यानंतर आज अधिक चांगल्या रितीने समजून येते.

पोलीस स्टेशन मधील आवश्यक ते सर्व सोपस्कार आटोपून व पोलिसांचे आभार मानून नाना आम्हा दोघांना सायकलवरून घरी घेउन आले. घरात आमच्या काळजीने काळवंडलेली माझी आई डोळ्यात जीव आणून आमची वाट पहात होती. आम्हा दोघांना सुखरूप पाहून तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. बराच वेळ आम्हा दोघांना जवळ घेउन ‘कुठे गेला होतात रे बाळांनो?’असे विचारत थोपटत राहिली. आवेग कमी झाल्यावर एकदम काहीसे आठवून आम्हास तसेंच सोडून आई लगबगीने आत गेली आणी देवघरात थंडीने काकडत असलेल्या ओलेत्या बळकृष्णास पाण्यातून बाहेर काढले.

समजायला लागल्यानंतर म्हणणे सुध्दा चुकीचे होईल इतक्या लहान वयातील अंधुकशी आठवण. त्या वेळी माझे वडील विदर्भातील मेहकर या गावी व्हेटरनरी डॉक्टर होते. राहायला सरकारी निवास स्थान होते. कबुतारांसाठी बांधतात तसे आवारात एक ८-१० फुट उंचीवरच्या खांबावर मचाण बांधलेले होते. त्यावर कोंबडीचे खुराडे होते. खुराड्यात २-३ कोंबड्या पाळलेल्या होत्या. बहुदा मांजर – मुंगुस या प्राण्यांपासून व पावसाळ्यातील साचत असलेल्या पाण्या पासून कोंबड्यांचे संरक्षण करण्यासाठी असावे.

सकाळच्या कोवळ्या उन्हात मी व माझ्या पाठची दीड-दोन वर्षांची बहिण बेबी अंगणात येऊन त्या कोंबड्यांना आ आ असे करून जवळ बोलवीत होतो. त्या कोंबड्या व त्यांची पिलावळ आमचे कडे दुर्लक्ष्य करून इतस्ततः खाद्याच्या शोधात फिरत होती.. हे बघून नाना म्हणजे आमचे वडील घरातून जोंधळ्याचे पसाभर दाणे घेउन आले व आम्हा दोघांना ते दाणे बड्यान समोर टाकण्यास सांगितले. असे दाणे फेकल्यावर मग कोंबड्या ते टिपण्यासाठी आमचे जवळ आल्या. ते पाहून आम्हास खूप गम्मत वाटली.

दाणे टाकले की कोंबड्या आपले पाशी येतात हे समजल्या नंतर आम्हीच मग रोज घरातून दाणे आणून ते कोंबड्यान समोर टाकून त्यांना आ आ करून जवळ बोलवू लागलो. काही दिवसांनी त्यांची भीड चेपून ते आमच्या हातावरचे दाणे देखील टिपू लागले. त्यांच्या बरोबर मग आम्ही पाठशिवणीचा खेळ देखील खेळावयास शिकलो.

माझ्यात व माझी बहिण बेबीत दीड वर्षाचे अंतर होते. मी मोठा असल्याने ती मला भाऊ म्हणायची. माझी दुसरी बहिण विद्या ही आमच्या कुटुंबात प्रवेश करण्याच्या प्रतीक्षेत होती!

असेच एके दिवशी दुपारी, आमची आई पुस्तक वाचत आडवी पडली होती. बेबी भाऊ भाऊ म्हणत माझ्या भवती पिंगा घालीत होती. दारा कडे बोट दाखवून बाहेरील कोंबड्या दाखवत तोंडाने आ आ करीत बोटांनी त्यांना बोलवत होती. ते पाहून मी घरातून पेलाभर जोंधळे आणले व आम्ही दोघे अंगणात गेलो. बेबीच्या हातावर काही दाणे ठेवले व काही मी माझ्या हातावर घेतले आणी कोंबड्यांना बोलावून हातातले दाणे त्यांना देत होतो त्या देखील आमच्या हातातून दाणे टिपत होत्या. मी मधेच हातातले दाणे खाली टाकले व ते टिपण्यास आलेल्या कोंबडीला पकडण्याचा प्रयत्न केला पण ती मला हुलकावणी देऊन उडून दूर पळाली. मग आम्ही दोघे तिचा पाठलाग करू लागलो. काही केल्या ती आमचे हाती लागेना. तिचा पाठलाग करता करता आम्ही रस्त्यावर कधी आलो ते समजलेच नाही.

आमचे घर हे दवाखान्याच्या आवारात होते व आवाराला चारी बाजूने बांधलेल्या भिंतीचे कुंपण होते. जाण्या येण्यास मोठे लोखंडी दार होते. ते नेहमी उघडेच असायचे. आवारा बाहेर गावाचा मुख्य रहदारीचा रस्ता होता.

आम्ही आता रस्त्यावर होतो. कोंबडीने आम्हास केंव्हाच चकवले होते. दमल्यामुळे आम्ही दोघे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या दगडावर बसलो व रहदारीची मजा बघत होतो. रस्त्यावर कडेला फुलांची तसेंच खेळण्यांची दुकाने होती. ती पाहून आम्ही दोघे हातात हात घालून तिकडे फिरू लागलो.

फिरता फिरता आम्ही खूप दूर निघून आलो. थोड्या वेळाने आजू-बाजूला बरेच लोक टोपल्या विणत असलेली दिसली. म्हणजे आम्ही बुरुड आळीत पोहचलो होतो. आम्ही टोपल्या विणताना बघत होतो. तोच त्या पैकी एकाने काय रे मुलांनो तुमचे आई-बाबा कोठे आहेत? असे विचारले. ते ऐकताच आम्ही दोघे भानावर आलो.

आजूबाजूला अनोळखी लोक बघून आम्ही घाबरलो. बेबी माझा हात ओढून घरी चल असे म्हणून आईच्या आठवणीने रडू लागली. मी देखील तिच्या बरोबर घाबरून रडू लागलो. आम्ही घर चुकलो आहोत हे आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आले. ते आम्हाला नावे विचारू लागले. बेबीला तिचे नाव सांगता येत नव्हते. मी माझे नाव अविनाश यशवंत गद्रे असे सांगितले पण पत्ता सांगता येईना. फक्त दवाखान्यात राहतो असे सांगत होतो. त्या वरून तेथील कोणास काही उलगडा होत नव्हता.

बामनाची पोर दिसतात. कोणीतरी कुजबुजले. तेथील एका कनवाळू प्रौढेने आम्हा दोघांना बाजूला घेउन स्वत: जवळ बसवले. तिच्यापरीने ती आमचा पत्ता जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती. पण मला काही नीट सांगता येईना. दवाखाना एवढेच मी सांगू शकत होतो. लहानग्या बेबीने तर भोकाडच पसरले होते. मुले चुकली आहेत. यांना पोलीस चौकीत घेउन चला. कोणीतरी सुचवले.

पोलिसाचे नाव ऐकून मी पार घाबरून गेलो व मोठ्याने गळा काढला. या वेळे पर्यंत अंधारून आले होते. आता आणखी वाट नको बघावयास असे म्हणत तेथील एकाने बेबीस कडेवर घेतले. एकाने माझा हात धरून समजावणीच्या सुरात चल आपण तुझ्या घरी जाऊ असे म्हणत आम्हाला घेउन जाऊ लागले. आमच्या बरोबर आणखी २-४ लोकांचा घोळका चालू लागला. थोड्याच वेळात आमची वरात पोलीस स्टेशनला आली. तेथे खूप पोलीस पाहताच माझे धाबे दणाणले. मी घाबरून रडू लागलो. आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊन आलेला जमावडा निघून गेला.

तेथील एक पोलिस आम्हास चुचकारून अतिशय प्रेमळपणे आमची चोकशी करू लागला. त्याच्या प्रेमळ बोलण्याने आमची भीती जराशी कमी झाली. मी माझे पूर्ण नाव व दवाखान्यात राहतो एवढेच सांगू शकत होतो. इतक्यात दुसरा एक पोलीस आमचे साठी लिमलेटच्या गोळ्या घेउन आला व आम्हास देऊ लागला. परक्या इसमांनी काही खावयास दिले तरी ते घ्यायचे नाही अशी घरची शिकवण असल्याने मी व बेबीने एकमेकांकडे पाहून नकारात्मक मान डोलावून त्या गोळ्या घेण्यास नकार दिला. तो पोलीस खूप आग्रह करत होता. आम्हास देखील गोळ्या खाण्याचा मोह होत होता पण संस्कार आडवे आले.

इतक्यात बेबीला आमचे नाना सायकल वरून पोलीस स्टेशन मध्ये शिरताना दिसले. तिने एकदम ना SनाS असा हंबरडा फोडला. तिच्या ओरडण्याने माझेही लक्ष त्यांचे कडे गेले व आम्ही दोघेही धावत जाऊन त्यांना बिलागलो. आम्हा दोघांना सुखरूप पाहून त्यांना देखील एकदम भरून आले. त्यांची व घरात माझ्या अवघडलेल्या आईची आम्ही हरवल्याचे लक्षात येताच काय स्थिती झाली असेल त्याची कल्पना मुले-नातवंडे झाल्यानंतर आज अधिक चांगल्या रितीने समजून येते.

पोलीस स्टेशन मधील आवश्यक ते सर्व सोपस्कार आटोपून व पोलिसांचे आभार मानून नाना आम्हा दोघांना सायकलवरून घरी घेउन आले. घरात आमच्या काळजीने काळवंडलेली माझी आई डोळ्यात जीव आणून आमची वाट पहात होती. आम्हा दोघांना सुखरूप पाहून तिच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. बराच वेळ आम्हा दोघांना जवळ घेउन ‘कुठे गेला होतात रे बाळांनो?’असे विचारत थोपटत राहिली. आवेग कमी झाल्यावर एकदम काहीसे आठवून आम्हास तसेंच सोडून आई लगबगीने आत गेली आणी देवघरात थंडीने काकडत असलेल्या ओलेत्या बळकृष्णास पाण्यातून बाहेर काढले.

— अविनाश यशवंत गद्रे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

*

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..