देह – एक महान वस्ती

सात कोटीची वस्ती असूनी,  सुंदर वसले शहर एक  ।

प्रत्येक जण  स्वतंत्र असूनी,  कार्ये चालती तेथे अनेक  ।।

सुसंगता शिस्तबद्ध   साह्य करिती एकमेकांना  ।

शत्रूची चाहूल येतां,  परतूनी लाविती त्या घटना  ।।

अप्रतिम  शहर असूनी,  नाव तयाचे असे  ‘पुरूष’  ।

‘पुरू’ म्हणजेच गाव असूनी,  मालक त्याचा आहे ‘ईश  ।।

अशीच अगणित शहरे, या अथांग विश्वाच्या शरीरी  ।

विधात्याची वास्तूकला,  अप्रतीम अजोड ठरे खरी  ।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

About डॉ. भगवान नागापूरकर 1420 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पर्वतीच्या टेकडीवरची लेणी

पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक ...

रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र ...

सातारा जिल्ह्यातील पवनऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हा पवनऊर्जा जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे तो ...

सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन ...

Loading…