नवीन लेखन...

दर्शनी तर घर खुराड्यासारखे

गझल
वृत्त: मेनका
लगावली: गालगागा/गालगागा/गालगा
***********************************
दर्शनी तर घर खुराड्यासारखे
आतुनी पण ते महालासारखे

एकटा बहुधा असा सम्राट मी
वागणे ज्याचे फकीरासारखे

भाव थोडा, आव जास्ती वाटतो
बोलणे त्यांचे प्रचारासारखे

हे हृदय रात्री धुमसते केवढे
हुंदके देते स्मशानासारखे

बोलले डोळ्यातले पाणी मुके
वाटले तेही प्रमादासारखे

टवटवी अन् रंग दोघांचे असे
ती नि मी दिसतो गुलाबासारखे

आमचे सगळेच आहे वेगळे
भांडतोही प्रेम केल्यासारखे

ही दिशांची जंगले, मी एकटा
वाटते मज जग शिका-यासारखे

त्यामुळे तर नोकरी टिकली अरे,
कष्ट केले मी गुलामासारखे

लाभला मज जन्म तर राईपरी
दु:ख का माझे पहाडासारखे

— प्रा. सतीश देवपूरकर

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..