नवीन लेखन...

अमेरिकेतील कंट्री म्युझिक – भाग २

Country Music in America - Part 2

कंट्री म्युझिक म्हणजे अनेक लोकप्रिय संगीत प्रकारांची खिचडी आहे. त्याचा उगम अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांत आणि अ‍ॅपलाचियन पर्वतराजीच्या

आसपासच्या भागात आढळतो. त्याचं मूळ शोधूं गेलं तर, पूर्वापार चालत आलेलं लोकसंगीत, खास आयरीश ढंगाचं सेल्टिक संगीत, चर्चेसमधून पिढ्यान

पिढ्या चालत आलेलं भावपूर्ण भक्ती संगीत, अशा विविध ठिकाणी सापडतं. साधारणपणे १९२० च्या सुमारास कंट्री म्युझिकचा उगम व्हायला लागला.

सुरवातीला त्याला Hilly billy music म्हणजे गांवढळ लोकांचं संगीत अशी उपाधी होती. परंतु जस जशी या संगीताची लोकप्रियता वाढूं लागली,

तसतसे हे हेटाळणीवाचक नाव मागे पडून, कंट्री म्युझिक अशा सन्मानजन्य नावानं ते ओळखलं जाऊ लागलं.

आणखी मागे जाऊन बघितलं तर असं दिसतं की, गेल्या ३०० वर्षांत अमेरिकेत येणार्‍या निर्वासित लोकांनी, आपल्याबरोबर येताना आपापल्या देशांच्या

रूढी, परंपरा, संस्कृती, भाषांबरोबर आपल्या लोककला, वाद्यं आणि संगीत देखील आणलं. आयरीश फीडल, जर्मन डलसीमर, इटॅलियन मेंडोलिन, स्पॅनिश

गिटार ही मुख्यत: युरोपची देणगी. त्यात आफ्रिकेतून आणलेल्या गुलामांबरोबर आलेलं त्यांचे संगीत आणि बॅंजो हे मुख्य वाद्य. अ‍ॅपलॅचियन

पर्वतराजीच्या दक्षिणेकडील भागात, हे वेगवेगळ्या देशातून आलेले वेगवेगळ्या वंशाचे लोक जसजसे आपलं बस्तान बसवू लागले तसतशी त्यांच्यात

संगीताची देवाणघेवाण सुरू झाली. १९ व्या शतकात बरेचसे युरोपियन्स दक्षिणेकडे जाऊन टेक्सासमधे स्थिरस्थावर होऊ लागले. तिकडे आधीपासून

असलेल्या स्पॅनिश, मेक्सिकन तसेच तिथल्या स्थानिक रेड इंडियन जमातींशी त्यांचा संबंध यायला लागला; आणि संगीत हा पुनश्च वेगवेगळ्या

ठिकाणांहून आलेल्या नाना देशीच्या लोकांना जोडणारा धागा ठरला. त्यामुळे टेक्सासमधे देखील अनोखं असं मिश्र संगीत उदयाला येऊ लागलं. तिथे

जाऊन वसलेल्या जर्मन आणि झेक लोकांनी आपल्या मायदेशांतल्या परंपरेला जागून मोठमोठी नृत्यगृहं बांधली. त्या ठिकाणी शेतकरी आणि

आजूबाजूच्या गावातील लोक एकत्र येऊन नाच गाण्याचा, संगीताचा आनंद उपभोगू लागले.

१९२२ सालापासून कंट्री म्युझिकच्या रेकॉर्डस्‌ बाजारात येऊ लागल्या. त्यात जुनी पिढ्यान पिढ्या चालत आलेली घरगुती गाणी, चर्चेस मधील कवनं

आणि लोकसंगीताचा बाज असलेली गाणी होती. त्याचबरोबर विविध देशांतून येऊन अ‍ॅपलॅचियन पर्वतराजीच्या दक्षिणेकडील भागाला आता आपलं घर

समजणार्‍या या लोकांनी रचलेली, आपल्या या नवीन घराची ओळख करून देणारी आणि इथल्या नवीन चालीरीती रिवाजांचं वर्णन करणारी देखील

गाणी होती.
१९३० च्या सुमारास आलेल्या आर्थिक मंदीच्या मोठ्या लाटेमुळे गाण्यांच्या रेकॉर्डसच्या खपावर परिणाम झाला. गाण्यांच्या रेकॉर्डस्‌ विकण्याऐवजी,

रेडीओवरून गाणी प्रसारित करणं स्वस्त आणि सोईस्कर होतं. देशभरची रेडीओ स्टेशन्स, कंट्री म्युझिक वाजवून वाजवून अधिक लोकप्रिय करू लागली.

याच सुमारास हॉलिवूडमधे वेस्टर्न चित्रपटांचा जमाना सुरू झाला होता. वैराण, ओसाड माळरानावरून किंवा भयचकित करणार्‍या डोंगरदर्‍यांमधून तुफान

घोडदौड करणारे, सुसाट वेगाने घोड्यावर बसून गावात शिरून गोळीबार करणारे, अन्यायाशी आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडून, आपल्या रुबाबदार

आणि मर्दानी व्यक्तिमत्वाची छाप पाडणारे काऊबॉइज, सिनेमाचा पडदा ओलांडून दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले होते. त्यांच्या रगेल आणि रंगेल

व्यक्तिमत्वाचा एक पैलू म्हणून काऊबॉय संगीत देखील लोकप्रिय होत होतं. या पडद्यावरच्या काऊबॉईजनी कंट्री म्युझिकला एक वेगळीच गहिरी छटा

आणली.

टेक्सासमधल्या गोर्‍या कष्टकरी लोकांमधे दुसर्‍या महायुद्धानंतर हॉंकी टॉंक (Honky Tonk) म्हणून एक संगीत प्रकार उदयाला आला. हा संगीत

प्रकार म्हणजे देखील इकडूनच्या तिकडूनच्या संगीताची मिळून झालेली कडबोळीच होती. त्याला काही शास्त्रीय बैठक वगैरे नव्हती. परंतु सामान्य

कष्टकर्‍याला फारसा विचार न करता, अर्थ किंवा आशय शोधायच्या भानगडीत न पडता, सहज साधं समजेल आणि माना डोलावयाला लागेल, असं मात्र

ते होतं.

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..