नवीन लेखन...

चंद्राची निर्मिती

माणसाला चंद्राचे आकर्षण हे खूप आधीपासूनच आहे. माणसाला अनेक वेळा चंद्राची निर्मिती कशी झाली याबद्दल प्रश्न पडले आहेत . आणि माणसाला त्याबद्दल अजूनही कुतूहल आहे. याच प्रश्नांवर अनेक वेळा संशोधन झाले आणि अनेक तर्क लावले. या संशोधनावरील काही तर्क आणि चंद्राबद्दल ची माहिती या लेखात पाहू …

चंद्र पृथ्वीच्या एक मात्र नैसर्गिक उपग्रह. चंद्र व पृथ्वीमधील अंतर हे सुमारे ३,८४,४०३ कि.मी आहे. हे अंतर पृथ्वीच्या व्यासाच्या जवळपास ३० पट आहे. चंद्र हा जरी पृथ्वीपेक्षा ३० पट लहान असला , तरी तो आकारमानाप्रमाणे सूर्यमालेतील पाचवा मोठा नैसर्गिक उपग्रह आहे. चंद्राचे वस्तुमान हे पृथ्वीच्या सुमारे २ % टक्के आहे आणि चंद्राची जी काही गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर शक्तीच्या सुमारे १७ % टक्के इतकी आहे.

आत्तापर्यंत माणसाने चंद्रावरती अनेक वेळा प्रवास केली आहे. माणसाला त्याबद्दल ही खूप आकर्षण वाटू लागले. चंद्र हा कसा निर्माण झाला ? कुठे निर्माण झाला ? केव्हा निर्माण झाला ? असे अनेक प्रश्न माणसाला निर्माण होऊ लागले आणि या प्रश्नांची उत्तर मिळविण्यासाठी माणसांनी प्रयत्नही केले आणि त्यातील काही प्रश्नाचे उत्तर हे माणसाने शोधून काढले . अनेक वेळा असा प्रश्न आढळतो की माणसाने चंद्रच का संशोधनासाठी निवडला ? दुसरा कोणताच ग्रह का निवडता आला नाही ? फक्त चंद्र नाही इतर अनेक ग्रह आहेत परंतु सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह म्हणून चंद्र ओळखला जातो . त्यामुळे माणसाला त्याची आकर्षण पूर्वीपासून खूपच लागले आहे. माणसाने सर्वप्रथम कुत्रा, माकड , ससा आणि इतर अनेक प्राण्यांना अवकाशात पाठवलं आणि खात्री पटल्यानंतर माणूस स्वतः अंतरात जाऊ लागला आणि तो जाता जाता एक दिवशी चंद्रावर पोहोचला. चंद्रावर माणसाला नेणारे पहिले अवकाश मोहीम म्हणजे अपोलो ११. माणसाच्या इतिहासातील हा अद्भुतपूर्ण दिवस माणूस कधीही विसरू शकणार नाही. ‌ कारण ती कथा आहे , माणसाने चंद्रावर ठेवलेल्या पहिला पावलाची, ती कथा आहे माणसाने पाहिलेल्या दिवसा स्वप्नांची, ती कथा आहे माणसाने केलेल्या अफाट परिश्रमाची आणि याच परिश्रमानंतर माणसाला मिळालेले हे फळ खूपच अद्भुत पूर्ण आहे.

चंद्राची निर्मिती कशी झाली याबद्दल खगोलशास्त्रज्ञांमध्ये अनेक मतभेद आहेत. चंद्राची निर्मिती कशी झाली यावर अनेक शास्त्रज्ञांनी तर्क लावले. चंद्राची निर्मिती ही सूर्यमायेच्या उत्पत्ती नंतर सुमारे ५ कोटी वर्षानंतर म्हणजेच जवळपास ४५ अब्ज वर्षांपूर्वी झाली असा शास्त्रज्ञांचा दावा आहे . चंद्राच्या उत्पत्ती बद्दल मुख्य चार मतभेद आहेत.

१. सहोदय सिद्धांत ( सिस्टर थियरी )
चंद्र आणि पृथ्वीचा उदय हा एकाच वेळी झाला. असे हा सहोदय सिद्धांत सांगतो. चंद्र आणि पृथ्वी हे दोन्ही जेव्हा जनमले तेव्हा ते एकमेकांच्या जवळ होते. पृथ्वी ही चंद्रापेक्षा मोठी असल्याने चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्र पृथ्वीभोवती फिरू लागला. असे हा सहोदय सिद्धांत सांगतो.

२. पकड सिद्धांत ( कॅप्चर थिअरी )
चंद्राची आणि पृथ्वीची निर्मिती ही एकाच ठिकाणी झाली नाही. एकमेकांपासून लांब झाली , परंतु कालांतराने चंद्र आणि पृथ्वी जवळ आल्याने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने चंद्राला पकडून ठेवले आणि चंद्र हा पृथ्वीभोवती फिरू लागला असे हा पकड सिद्धांत ( कॅप्चर थेअरी ) सांगतो.

३. विभाजन सिद्धांत ( फिक्शन थिअरी )
जेव्हा पृथ्वीचा जन्म झाला तेव्हा ती स्वतःभोवती खूप प्रचंड वेगाने फिरत होती. तेव्हा दिवस हा २४ तासाचा नसून २ तासांचा होता. त्यामुळे पृथ्वीच्या एवढ्या प्रचंड वेगामुळे पृथ्वीवरील एक भाग बाहेर पडला व त्या तुकड्याचे रूपांतर पुढे चंद्रात झाले आणि तेव्हा पृथ्वीवर पडलेला तो खड्डा म्हणजे आज दिसणारा प्रशांत महासागर !

४. महाघात सिद्धांत ( जायंट थियरी )
सूर्यमालेतील एक मोठ्या ग्रहाची पृथ्वीभोवती फिरताना पृथ्वीवर टक्कर झाली. हा ग्रह जवळपास मंगळा एवढा होता. या प्रचंड मोठ्या अपघातामुळे पृथ्वीवर ज्या भागात हा ग्रह आदळळा त्या भागातून जमिनीचा एक तुकडा बाहेर वेगळा पडला . तो म्हणजे आजचा चंद्र. असे हा महाघात सिद्धांत सांगतो.

वरीलपैकी कोणताच सिद्धांत हा जरी सर्वमान्य नसला तरी , चौथ्या सिद्धांतात मात्र बरोबर असावा असे अनेक शास्त्रज्ञ म्हणतात. चंद्राचे वय सुमारे साडेचार अब्ज वर्ष असावे. असा संशोधकांचा अंदाज आहे!

— अथर्व डोके.

संकेतस्थळ – www vidnyandarpan.in.net

ई-मेल- vidnyandarpan@gmail.com

Avatar
About अथर्व डोके 16 Articles
लेखक हे विज्ञान दर्पण वरचे मुख्या लेखक आहेत. त्यांचे लेख विविध संकेतस्थळावरती आणि विविध अंकांमध्ये प्रकाशित होतात. लेखक हे विज्ञानातील विविध विषयावरती लिहितात. आपण लेखकाशी माध्यमाद्वारे संपर्क समजू शकता. मोबाईल क्रमांक - ७२७६१३३५११ ई-मेल - atharvadoke40@gamil.com संकेतस्थळ - vidnyandarpan.in.net

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..