नवीन लेखन...

चल चला चल…

पूर्वी खेड्यात वाहनं नव्हती तेव्हा माणसं गावोगावी चालतच जायची. आमच्या गावामध्येच रोज १५/२० किलोमीटर पायी चालून सातारला जाणारी माणसं होती. उगवतीला निघायचं, चार तासांनी पोहचायचयं. तिथलं काम आटोपलं की, दुपारी निघून अंधार पडण्यापूर्वी घरी यायचं. त्या वेळची माणसं काटक होती. नंतर बैलगाड्या, एसटीनं प्रवास सुरु झाला. आता तर घरटी मोटरसायकल आहेत. साहजिकच पायी चालणारी पिढी संपली व बटनस्टार्टने पायाचे लाड होऊ लागले. कुठे जवळ जायचं म्हटलं तरी गडी माणसं गाडीशिवाय अडू लागली.
शहरात देखील सायकली गेल्या व दुचाकी वाहनांचे असंख्य पर्याय खुणावू लागले. आता घरातल्या प्रत्येकाला दुचाकीशिवाय पर्याय नसल्याने घरटी किमान तीन दुचाकी दिमतीला उभ्या दिसू लागल्या. परिस्थिती चांगली असेल तर चारचाकी, चक्रधरसह हजर असते.
जीवनशैली बदलत गेली. चालणारी माणसं कमी दिसू लागली. परिणामी दिवसातून एक किलोमीटर सुद्धा न चालल्याने डाॅक्टरांची भरती होऊ लागली. रस्ते पूर्वी मोकळे असायचे. आता चालायलाही रस्ता मिळत नाही. शनिवारी, रविवारी सर्वजण आपली वाहनं रस्त्यावर आणतात, रस्ते ब्लाॅक होतात. पार्किंग फुल्ल झाल्यावर नदीकाठी चारचाकी लावून रिक्षाने फिरुन शाॅपिंग केलं जातं. कुठे नो पार्किंग मध्ये गाडी लावली असेल तर पोलीस आपले कर्तव्य इमाने इतबारे पार पाडतात. चारचाकीला क्रेन लावून चौकीत घेऊन जातात.
या सगळ्या त्रासातून वाचण्यासाठी रोज थोडं चालण्याची सवय ठेवा. ते तुम्हाला जीवनभर फायदेशीर ठरेल. कारण आपण वयाने वाढतो तेव्हा आपले पाय हे सर्वात मजबूत असायला हवेत.
चाळीशीनंतर पायांची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण पायाचे स्नायू भक्कम असतील तर ते दीर्घायुष्याचं लक्षण आहे. जर दोनच आठवडे तुम्ही पायांची हालचाल नाही केली तर तुमच्या पायांची मजबूती दहा वर्षांनी कमी होते.
एकदा का आपल्या पायाचे स्नायू दुबळे झाले तर ते बरे होण्यास बराच कालावधी लागतो, म्हणूनच चालत रहा. आपल्या शरीराचा भार सोसणारे आपले पाय म्हणजे जणू मजबूत खांबच आहेत. ज्याचे पाय बळकट त्याचे हृदयही बळकट!
पाय हे आपल्या चलनवलनाचा केंद्रबिंदू असतात. त्यामुळे वार्धक्य हे पायापासून सुरु होते व नंतर वरवर सरकत जाते. वार्धक्याने शरीरातील कॅल्शियम कमी होत जाते. ते जास्त प्रमाणात कमी झाल्यास अस्थिभंग होतो. परिणामी मेंदूचे आजार बळावतात.
पायाचा व्यायाम कधीही सुरु करता येतो, अगदी साठीतसुद्धा! पायांची बळकटी तुमचं वृद्धत्व थोपवू शकते. त्यासाठी रोज किमान पाऊण तास पायी चाला, त्यामुळे पाऊणशे वर्षांपर्यंत तुम्हाला काहीही होणार नाही….
कदाचित तुम्ही म्हणाल, ‘एवढा उपदेश करीत आहात.. तुम्ही स्वत: चालता का?’
मी भरपूर चालतो. सकाळपासून रात्रीपर्यंत माझं एकूण चालणं किमान सहा मैल तरी नक्कीच होतं. त्यामुळे आरोग्य टिकून आहे. नेहमी चालताना पाहून काहींना खटकते तर काहींना प्रेरणा मिळते. कोणी काही म्हणो, आपण आपलं
‘चल चला चल..’ म्हणायचं..
– सुरेश नावडकर १-२-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहे

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..