नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

कादंबरीकार व कथा लेखक प्रा. राम शेवाळकर

महाभारतातील स्त्रीशक्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगेश्वर कृष्ण, सीता, दुर्योधन, रामायणातील राजकारण, विनोबा भावे, ज्ञानेश्वरी, अवसेचे चांदणे, कानडा तो विठ्ठलू, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वरांचा प्रतिभाविलास भाग १ आणि २. ज्ञानेश्वरांचा चित्विलासवाद, ज्ञानेश्वरांचा नारायणीयधर्म, पसायदान, समाधीसोहळा, ज्ञानेश्वरांचा भक्तीयोग भाग १ आणि २, अमृतसरिताः संस्कृत साहित्याचा आस्वादक प्रवाह, या त्यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवण ध्वनिफिती आहेत. […]

कादंबरीकार व कथा लेखक ह. मो. मराठे

ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली. […]

लेखक पुरुषोत्तम नागेश ओक उर्फ पु. ना. ओक

लेखक पुरुषोत्तम नागेश ओक उर्फ पु. ना. ओक यांचा जन्म २ मार्च १९१७ रोजी इंदोर येथे झाला. पु.ना.ओक यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए आणि कायद्याची पदवी घेतली. काही काळ फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजी शिकवले आणि त्यानंतर ब्रिटीश आर्मी जॉईन केली. दुसऱ्या महायुद्धात सिंगापूर मध्ये त्यांची पोस्टिंग होती. जेव्हा जपानने ब्रिटीश आर्मीला हरवले तेव्हा पु. ना. ओक सुद्धा युद्ध […]

अभिनेते आणि दिग्दर्शक जयशंकर दानवे

जयशंकर दानवे यांनी सिनेसृष्टी उत्कृष्ट खलनायक व चरित्र अभिनेता म्हणून गाजवली तर नाट्यसृष्टीत ते उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक व खलनायक म्हणून प्रसिद्धीस आले. राजकपूरना प्रथम “वाल्मिकी” चित्रपटात नारदाचा मेकअप करून हिंदी सिनेसृष्टीला शो मन देणारे अशी त्यांची ओळख होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी एकूण ६५ चित्रपट आणि १३४ नाटके केली. […]

गझलविश्व समृद्ध करणारे प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार

इलाही जमादार यांनी १९६४ सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. कविवर्य सुरेश भटांनंतर मराठी गझलेला उत्तुंगतेवर नेणारे गझलकार अशी त्यांची ओळख होती. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी व गझलकार होते. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. […]

हॉलीवूडचा प्रसिद्ध गायक जस्टीन बीबर

जस्टीन केवळ परदेशातच नव्हे तर भारतात देखील खूप प्रसिद्ध आहे. अगदी लहान वयातच जस्टीनने इतकी प्रसिद्धी मिळविली की बॉलिवूड स्टार्ससुद्धा त्याच्यासमोर फिके पडले. फोर्ब्स मासिकाच्या म्हणण्यानुसार, जस्टीन चार वेळा जगातील १० सर्वात शक्तिशाली सेलिब्रिटींमध्ये यादीत सामिल झाला आहे. जस्टीन बीबरच्या संगीत अल्बमने १० दशलक्षाहून अधिक संगीत रेकॉर्ड विकल्या आहेत. […]

वाई येथील प्राज्ञपाठशाळचे संस्थापक केवलानंद सरस्वती उदयशंकर

करारी स्वभाव, उज्ज्वल चारित्र्य, अध्यात्मनिष्ठा व त्यागी जीवन हे त्यांचे व्यक्तिमत्त्वविशेष होत. वाई येथे त्यांचे स्मारकमंदिर उभारले असून तेथे धर्मकोशाचे संपादनकार्य चालते. १९७५ पर्यंत त्याचे अकरा भाग प्रकाशित झाले. मीमांसाकोश व धर्मकोश ह्या ग्रंथांना आंतरराष्ट्रीय कीर्ती लाभली. […]

भारतीय महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम

घरचा विरोध असतानाही २००० साली १७ व्या वर्षी मेरी कोमने बॉक्सिंग रिंगमध्ये पहिले पाऊल टाकले. दोन आठवड्यांत ती बॉक्सिंगचं बेसिक शिकलीसुद्धा आणि २००० सालीच मेरी कोमने राज्यस्तरीय स्पधेर्चं जेतेपद मिळवले; वर्तमानपत्रात नाव-फोटो झळकले आणि घरी मेरी कोमच्या यशाची कल्पना आली. पण बॉक्सिंगबद्दल मेरी कोमची ओढ पाहून त्यांचा विरोधही मावळला. […]

सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते वसंतदादा पाटील

सहकार क्षेत्रात दादांचा प्रत्येक शब्द अंतिम मानला जात असे. वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले होते पण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी – असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो. […]

माजी क्रिकेटपटू करसन घावरी

करसन घावरी हे फास्ट बॉलर असून ते लेफ्ट आर्म स्पिन बॉलिंग ही करत असत. करसन घावरी आपल्या करीयर मध्ये ३९ कसोटी व १९ वनडे खेळले. १९७४ ते १९८१ पर्यत आपल्या क्रिकेट करियर मध्ये दोन वेळा १९७५ व १९७९ वर्ल्ड कप पण खेळले. […]

1 67 68 69 70 71 381
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..