नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

बॅटमॅन, जेम्स बाँड कॉमिक्सच्या माध्यमातुन प्रसिध्द करणारे डग्लस माँच

डग्लस माँच हे प्रामुख्याने ओळखले जातात, ते त्यांनी लिहिलेल्या ‘बॅटमॅन’च्या कथांबद्दल! ‘बॅटमॅन’ व्यतिरिक्त, मून नाइट हा सुपरहिरो, ब्लॅक मास्क हा सुपरव्हिलन, डेथलॉकसारखा सायबॉर्ग, इलेक्ट्रिक वॉरिअर हा रोबॉट, सिक्स फ्रॉम सीरिअस हे विश्वातल्या आकाशगंगांमधले एजंट्स आणि मास्टर ऑफ कुंग फू अशा त्यांनी निर्माण केलेल्या अद्भुत व्यक्तिरेखांची दुनिया डीसी कॉमिक्स आणि मार्व्हल कॉमिक्समधून बच्चेकंपनीचं वर्षांनुवर्षं मनोरंजन करत राहिली. […]

अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन

१९८९ मध्ये भाग्यश्रीने ‘मैने प्या किया’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मैने प्यार किया या चित्रपटामध्ये भाग्यश्री ने सलमान खानसोबत नायिकेची भूमिका केली होती. मैने प्यार किया प्रदर्शनावेळी भाग्यश्री केवळ १९ वर्षाची होती. मैने प्यार किया या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार झाली. ह्यासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला होता. […]

अमेरिकेतील आमदार श्री ठाणेदार

‘बेळगावातला मॅट्रिकच्या परीक्षेत जेमतेम ५५ टक्क्यांनिशी उत्तीर्ण झालेला एक साधारण विद्यार्थी’ ते कष्टाने उच्चशिक्षण घेऊन ‘अमेरिकेतला एक कल्पक, यशस्वी व्यावसायिक’ बनण्यापर्यंतचा ठाणेदार यांचा हा प्रवास त्यांच्या ‘ही ‘श्री’ची इच्छा’ या आत्मकथनात त्यांनी प्रांजळपणे सांगितला आहे. […]

पडद्यावरचे देखणे रुबाबदार पोलीस इन्स्पेक्टर इप्तेखार

इत्तफाक मधील सी.आय.डी. इन्स्पेक्टर कर्वें या भुमिकेने त्यांचे आयुष्य बदलून टाकले. धुम्मस या गाजलेल्या गुजराती नाटकावर आधारित हा सिनेमा एकाच सेटवर संकलनासह आठ दिवसात तयार झाला. इन्स्पेक्टर चा युनिफॉर्म त्यांच्या व्यक्तीमत्वाला इतका शोभला की तश्याच भुमिकेचे सिनेमे भरभर मिळत गेले. […]

द क्रॉकडाइल हंटर स्टीव्ह आयर्विन

अमेरिका, ब्रिटन आणि जगभरातील एकूण १३० देशांमध्ये स्टीव्हला ‘क्रोकोडाइल हंटर’ म्हणून याच कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख मिळाली. ‘द क्रोकोडाइल हंटर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या काळात ५० कोटी लोकांपर्यंत स्टीव्ह आणि त्याच्या कुटुंबाचे कार्य पोहचले. […]

अमेरिकन विनोदी लेखिका अर्मा बॉम्बेक

अर्मा बॉम्बेक यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९२७ रोजी बेलब्रूक अमेरिका येथे झाला. अर्मा बॉम्बेक या अमेरिकेन लोकांची अत्यंत लोकप्रिय आणि जिचं साहित्य प्रचंड वाचलं जातं, अशी प्रसिद्ध विनोदी कथाकार! त्यांनी घरगुती प्रसंगावर आणि रोजच्या आयुष्यात नेहमी घडणाऱ्या प्रसंगांवर अत्यंत खुसखुशीत भाषेत मिश्कील लेखन करून प्रचंड लोकप्रियता मिळवली. ७० आणि ८०च्या दशकात त्यांचे ‘विट्स एंड’ हा सिंडिकेटेड […]

माणूस या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक श्री. ग. माजगांवकर

‘माणूस’चे मुखपृष्ठ संपूर्ण काळ्या रंगाचे- त्यावर एक मोठे प्रश्नचिन्ह काढून श्रीगमांनी आपला विरोध नि:शब्दपणे, पण अत्यंत समर्थपणे व्यक्त केला. त्याबद्दल पोलिसांनी बोलावून त्यांना चांगली ‘समज’ही दिली होती. भारतात किंवा जगभरात जिथे कुठे अशांतता, असंतोष, उद्रेक, किंवा काही आशादायक घडले, की त्वरित त्याचा लेखाजोखा ‘माणूस’मधून घेतला जायचा. […]

पत्रकार, लेखक हंटर थॉम्प्सन

हंटर थॉम्प्सन हे ‘गॉन्झो जर्नालिझम’ या नवीन विक्षिप्त संकल्पनेचा जन्मदाता होत. एखाद्या बातमीच्या किंवा घटनेच्या निवेदकाने, स्वतःच त्या घटनेचा किंवा प्रसंगाचा एक भाग होऊन, मनात एकामागोमाग एक उसळून येणाऱ्या विचारांच्या आवर्तनांना दिलेलं शब्दरूप असा काहीसा हा प्रकार. समजायला काहीसा क्लिष्ट. १९५६ ते ५८ अशी दोन वर्षं अमेरिकन एअर फोर्समध्ये काढल्यावर ते पत्रकारितेकडे वळले. […]

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार

राम सुतार यांनीच गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा साकारला आहे. त्याची उंची १८२ मीटर इतकी आहे. याशिवाय मुंबईत बसविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३७.२ मीटर उंचीचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा २१२ मीटर उंचीचा पुतळाही ते साकारत आहेत. तसेच, सध्या अयोध्येतील राम मूर्ती बनविण्याचे काम राम सुतार करत आहेत. अयोध्येतील रामाची मूर्ती ही जगात सर्वाधिक उंच असणार आहे. […]

1 68 69 70 71 72 379
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..