माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधीच्या आग्रहाखातर पृथ्वीराज चव्हाण यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती होती. […]
मुजिबुर रहमान हे बांगलादेशचे प्रथम राष्ट्राध्यक्ष व नंतर प्रथम पंतप्रधान होते. मुजिबुर रहमान यांना बंगबंधू नावानेही संबोधत. भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून बांगलादेशाच्या मुक्तीसाठी लढाई केली. ती अगदी थोडक्यात, झटपट, कमीतकमी मनुष्यहानी करून केली त्याला इतिहासात तोड नाही. […]
दत्तू फडकर यांनी ३१ कसोटीत १२२९ धावांसह ६२ विकेट घेतल्या. मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज अशी त्यांची ओळख होती. १९५२ साली इंग्लंड विरूद्ध खेळतांना भारताची परिस्थिती वाईट होती, ० धावांवर ४ गडी बाद झाले होते. त्यावेळी फडकर-ह्जारे जोडीने १०५ धावांची भागीदारी करत भाराताची बाजु सांभाळण्याचा प्रयत्न केला. […]
मनोहर पर्रीकर २००० ते २००५ व २०१२ ते २०१४ ह्या कालावधीत गोवा राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर होते. पर्रिकर यांच्याकडे गोव्याचे राजकारण आमुलाग्र बदलणारे नेते म्हणून गोव्यात पाहिले जाते. संघाच्या विचारधारेत वाढलेले पर्रिकर मोदींप्रमाणेच डिक्टेटर सारखे काम करतात. त्यांचाही त्यांच्या मंत्र्यांवर कमी विश्वास आहे. आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे चोवीस तास कामात घालविणारे पर्रिकर मोदींप्रमाणेच अतिशय शिस्तीचे, वेळेचे कोटेखोर नियोजन करणारे, स्वच्छ कारभार, साधी राहणी आणि मिडीयापासून दूर राहणारे नेते आहेत. […]
५० वर्षांच्या कारकिर्दीत सिनेसृष्टीतील पडद्यावर इतके गाजले होते की, चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिताना केवळ जगदीश राजच पोलिसाची भूमिका साकारणार असे लिहिले जायचे. देव आनंद यांचा ‘सीआयडी’ असो की ‘जॉनी मेरा नाम’, अमिताभ बच्चन यांचा ‘डॉन’ असो की ‘दीवार’ जगदीश राज सगळीकडे पोलिसांच्या गणवेशात दिसले.जगदीश राज यांनी दीडशेहून अधिक चित्रपटात विविध भूमिका केल्या मात्र ते ‘पोलीस’ अधिकाऱ्याच्या भूमिकेत विशेष गाजले. […]
दूरदर्शन सारख्या कौटुंबिक माध्यमाच्या प्रेक्षकांना काय रुचेल, पचेल याचा विचार करून, अनेक कथासंग्रह वाचून, त्यातून निवडलेल्या कथांचं नाटयीकरण, पटकथा-संवादासह स्वत: लिहून काढत बसलेले ते असायचे ते.. दुस-या दिवशी, त्या पटकथेचं कॅमेरा स्क्रिप्ट तयार झालं की मग कथेला साजेशी पात्रयोजना, त्यासाठी संपर्क साधणे वगरे.. तिस-या दिवशी दुपारी वाचन. संध्याकाळी कॅमे-याच्या अंदाजानं हालचालींचं नियोजन.. आणि लगेच पुढल्या दिवशी कलागारांत चित्रीकरण, असा त्यांना घटनाक्रम वर्षानुवर्ष होता. […]
शर्मन जोशीने आपल्या करियर ची सुरुवात थिएटर पासून केली. त्या वेळी तो वर्षभरात ५५० प्रयोग करत असे. हिंदी सिनेमात त्यांचा पहिला चित्रपट गॉडमदर होता. ३ इडियट्स मुळे शरमन जोशी यांना बॉलीवूड मध्ये ओळख मिळाली. […]
२०१२ पासून त्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोकण विभाग संघटक म्हणून काम करत आहेत. फेब्रवारी २०१७ मध्ये रोहा तालुक्यातील वरसे जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या पहिल्यांदा विजयी झाल्या. मार्च २०१७ मध्ये त्यांची रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी दोन वर्षे काम पाहिलं. २०१९ मध्ये श्रीवर्धनमधून आमदार म्हणून विजयी झाल्या. […]
त्यांनी ‘आयबीएन लोकमत’ या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. कोकणासह राज्य, देशातीलही अनेक धांडसी विषयांचे कव्हरेज दिनेश केळुसकर यांनी केले आहे. […]
तीन वेळा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी ‘नर्मदे हर हर’ हे पुस्तक लिहिले. या परिक्रमेत त्यांना आलेले अनुभव अत्यंत रोमांचक आणि अचंबित करणारे आहेत. लेखकपणाचा कोणताही आव न आणता फक्त घटनेशी भिडण्याच्या त्यांच्या शैलीने वाचक मंत्रमुग्ध झाले. त्यांचे काही चमत्कारांचे अनुभव बुद्धीला पटणारे नसले, तरी कुंटे यांची शोधक वृत्ती आणि मानवी स्वभावाची निरीक्षणशक्ती यांमुळे त्यांच्या पुस्तकाच्या चाहत्यांची संख्या वाढतच गेली. […]