नवीन लेखन...

रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ऊर्फ रँग्लर परांजपे

रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे ऊर्फ रँग्लर परांजपे यांचा जन्म १६ फेब्रुवारी १८७६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मुर्डी येथे झाला.

रँग्लर परांजपे हे केंब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रॅग्लर हा किताब पटकावणारे पहिले भारतीय. ते पेशाने गणिताचे प्राध्यापक होते. रँग्लर परांजपे हे गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्य होते. १८९४ साली पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून परांजपे यांनी बी.एससी. पदवी प्राप्त केली. तत्कालीन हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती घेऊन परांजपे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठ क्षेत्रातील सेंट जॉन्स महाविद्यालयात दाखल झाले. तेथे त्यांनी गणित विषयातील सगळ्यात कठीण ‘ट्रायपॉस’ परीक्षा दिली आणि ते त्या परीक्षेत प्रथम आले. यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सीनियर रँग्लर असे म्हणतात.

१९०२ ते १९२७ या काळात रँग्लर परांजपे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. तसेच ते मुंबई विद्यापीठाचे सदस्य, पुणे नगर प्रशासनाचे सदस्यही होते. १९२१ साली तत्कालीन मुंबई सरकारने रँग्लर परांजपे यांची दिवाण म्हणून नियुक्ती केली. पुढे सरकारने त्यांना शिक्षण आणि आरोग्य खात्याचे मंत्री केले. १९२७ साली लंडनच्या इंडिया हाऊसचे कामकाज रँग्लर परांजपे यांच्याकडे सोपविण्यात आले. लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू पद रँग्लर परांजपे यांनी ६ वर्षे भूषविले. त्यानंतर ऑस्ट्रेलियातल्या भारतीय वकिलातीत उच्चायुक्त म्हणून १९४४ साली त्यांची नियुक्ती करण्यात आली.

१९५६ साली रँग्लर परांजपे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. रँग्लर परांजपे अंधश्रद्धेचे विरोधक म्हणून ओळखले जातात. देवावर त्यांची श्रद्धा नव्हती, ते स्वतःला नास्तिक म्हणवून घेत. त्यांचे एटीफोर नॉट आऊट या नावाचे आत्मचरित्र आहे.

गणितातील प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आदर्श म्हणून रँग्लर परांजपे यांचे तैलचित्र, फर्ग्युसन कॉलेजच्या गणित विभागात अजूनही ठेवलेले आहे.

रँग्लर परांजपे यांचे ६ मे १९६६ रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडून रँग्लर परांजपे यांना आदरांजली.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4233 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..