मराठी लघुकथेचे जनक – ना. सी. फडके
मराठी साहित्यात कथा या प्रकारात अनेकांनी आपल्या लीलया लेखणीने खुमासदार शैलीतील कथा दीर्घ व लघु स्वरूपात साकारल्या. या पैकी मराठी लघुकथेचे स्वतंत्रयुग निर्माण करणारे सुप्रसिद्ध साहित्यिक म्हणजे ना. सी. फडके […]
या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..
मराठी साहित्यात कथा या प्रकारात अनेकांनी आपल्या लीलया लेखणीने खुमासदार शैलीतील कथा दीर्घ व लघु स्वरूपात साकारल्या. या पैकी मराठी लघुकथेचे स्वतंत्रयुग निर्माण करणारे सुप्रसिद्ध साहित्यिक म्हणजे ना. सी. फडके […]
लहानपणी फक्त एवढेच कळायचे की ते खूप विद्वान आहेत. दिवस-रात्र वाचन, लेखन करतात. History of Dharma Shastra हा जगप्रसिद्ध ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. केवळ शिक्षण-संशोधन नव्हे तर सतत पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे अशी थोर, महान, विद्वान व्यक्ती आणि आमचे ‘सख्खे शेजारी’ वाडीतील आम्ही सर्व जण त्यांना ‘काणे अण्णा’ च म्हणत असू. राहण्याचे ठिकाण म्हणजे, अर्थातच, – सुप्रसिद्ध, आंग्रेवाडी, दुसरा मजला, वि. पी. रोड, गिरगाव, मुंबई. […]
खरे तर आमच्या मो. ह. विद्यालयाची तुम्ही शान होता. अहो सगळेच शिक्षकाची नोकरी करतात आणि नोकरी करता करता फालतू राजकारणात गुंतून रहातात तसे तुम्ही केले नाहीत हे महत्वाचे तुम्ही शिक्षक होतात ‘ शिक्षक राजकारणी ‘ नव्हता हे महत्वाचे. कारण शिक्षक म्हटले की त्या छोट्या का होईना विश्वात राजकारण नावाची कीड घुसतेच , आता सगळीकडे घुसते , काळच बदलला आहे . […]
हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगात एस डी बर्मन, नौशाद, ओ पी नय्यर, शंकर जयकिशन, रोशन, रवी, सी रामचंद्र,खय्याम आदि अनेक मातब्बर संगीतकार आपल्या एका पेक्षा एक सुंदर आणि श्रवणीय रचनांनी रसिकांना तृप्त करीत होते. अशा स्पर्धेच्या काळात हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात आपल्या अनोख्या संगीताचा ठसा उमटवणे सोपे नव्हते. अशा स्पर्धेच्या युगात मदन मोहन यांनी आपली संगीतकाराची कारकीर्द सुरु केली आणि अल्पावधीतच त्यांनी आपल्या अनोख्या अशा संगीत रचनांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. एक प्रथितयश संगीतकार म्हणून अल्पावधीत त्याचं नाव मोठ्या आदराने घेतलं जाऊ लागलं….. […]
अरुण साधू यांनी पत्रकारिता केलीच परंतु त्यांनी स्तंभलेखक ते कथाकार , कादंबरीकार , विज्ञानलेखक , इतिहास लेखक म्हणून भरपूर लेखन केले. १९९५ पासून २००१ पर्यंत ते पुणे विद्यापीठमध्ये वृत्तपत्रविद्या आणि संपादन विभाग येथे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. […]
आज आपणा सर्वांस ज्यांनी इतरांसोबत मला ही मार्गदर्शन केलं, ज्यांनी मला लिहायला शिकवलं. साहित्य प्रकारची अतिशय चांगल्या पद्धतीने ओळख करून देऊन, मला समृद्ध केलं. लेखनशैली उत्तम होण्यासाठी वेळात वेळ काढून कायम तत्परता दर्शवली. असे जेष्ठ साहित्यिक श्री.अरुण वि.देशपांडे यांच्याबद्दल आणि त्यांच्या दीर्घ लेखन-प्रवासाबद्दलचा हा परिचय लेख. […]
रमेश तामिळनाडू मधून एम.टेक. करण्यासाठी केरळच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये आला होता.त्याचे गाव पाँडेचरीच्या आसपास कुठेतरी होते. तामिळ पिक्चरचा जबरदस्त फॅन असलेला रमेश दिसायला आणि वागायला पण एकदम टिपिकल तामिळ सिनेमातले कॅरॅक्टर! उंच, सावळा, कपाळावरचे केस थोडेसे मागे गेलेले आणि टिपिकल रजनीकांत स्टाईल मिशा ठेवणारा. आम्ही सगळे त्याला “अण्णा” म्हणूनच हाक मारायचो! […]
हिंदी चित्रपट सृष्टीचा सन १९५० ते १९७० हा चित्रपट संगीताच्या दृष्टीने सुवर्ण काळ मानला जातो. या काळात अनेक प्रथितयश संगीतकारांनी अनमोल अशा गाण्यांची रसिकांवर अगदी बरसात केली. नुसते गाण्यांवर चित्रपट चालण्याचे ते दिवस होते. ज्येष्ठ संगीतकार रोशन यांनी याच काळात आपल्या सुमधुर गीतांची देणगी चित्रपट सृष्टीला दिली. […]
मिशी ठेवणार्या एका कालाकराने हॉलीवूडमधे प्रवेश केला. तीन वर्षात ऑस्कर नामांकन व तीन गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळवले. पहिल्या हॉलीवुडपटात उत्कृष्ट दिग्दर्शकाबरोबर व प्रसिद्द नटासोबत काम करून त्याने आपली भूमिका अजरामर केली. हाताने पत्र लिहीण्याच्या व पोस्टमने पत्र पोचवण्याच्या काळात, त्याला आलेल्या प्रेमपत्रांची व मागण्यांची संख्या होती एक महिन्यात ३०००! सुरुवातीची कारकीर्द इजिप्त मधे अरेबिक चित्रपटात घडवलेला व पुढे इंग्रजी येत असल्याच्या गुणावर हॉलिवुड्चा झालेला हा थोर कलाकार म्हणजे ‘ओमर शरीफ’. तरुणींच्या दिलाची धडकन ‘ओमर शरीफ’. […]
ओपी माझा फेवरीट संगीतकार असला तरी रवीच्या संगीताने प्रभावित केल होत साहजिकच रवीने संगीत दिलेले सिनेमा पाहणे रवीची गाणी ऐकणे सुरु झाले…… त्या काळी प्रत्येक संगीतकाराचा अनेक वाद्यांनी युक्त असा मोठा ऑर्केस्ट्रा असे त्यातुलनेत रवीचा ऑर्केस्ट्रा लिमिटेड वाद्यांचा होता. आपल्या संगीतात त्याने प्रामुख्याने शेहनाई,संतूर व गिटार ह्यांचा वापर केला आणि साध्या सोप्या वाटणार्या पण लक्ष वेधून घेणाऱ्या अशा गीतांची रचना केली. […]
Copyright © Marathisrushti.com 2016-2020 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies