नवीन लेखन...

ट्रिक फोटोग्राफी व स्पेशल ईफेक्ट्सचे जनक बाबूभाई मिस्त्री

बाबूभाई मिस्त्री हे भारतीय चित्रपटातील स्पेशल एफ़ेक्ट्स जनक होते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

आपल्या हिंदू संस्कृतीतील ‘पौराणिक’ ग्रंथातील प्रत्येक कथेचा पाया हा चमत्कारावरच रचला गेला आहे. देवांचे अवतार, प्रकटदृश्ये, त्यांची दैवीरूपे हा सर्व भाग काल्पनिक असला तरीही त्याला मूर्तरूप दिलं ते ‘बाबूभाई मिस्त्रीं’नी.

बाबूभाई मिस्त्री यांचा जन्म ५ सप्टेंबर १९१८ रोजी सूरत येथे झाला. बाबूभाई मिस्त्री अवघे १४ वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले. मोठा भाऊ म्हणून आई आणि नऊ लहान भावंडांची जबाबदारी बाबूभाईंच्या खांद्यावर पडली. त्यांना नोकरीच्या शोधात मुंबईत आपल्या काकांकडे जाण्यास भाग पडले गेले, तिथे त्यांचे काका रंगिलदास भगवानदास कृष्णाटोन फिल्म कंपनीत कला दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते.

बाबुभाईंना त्यांच्या काकाने मदत केली आणि त्यांच्या शिफारसीनुसार बाबूभाईंना १९३३ साली आलेल्या ‘हातिमताई’ या चित्रपटात सहाय्यक कला दिग्दर्शकाची नोकरी मिळाली. हातीमाताई हा चित्रपट चार भागात बनला होता व चित्रपटाची निर्मिती भारत मोविटोनच्या बॅनरखाली लेखक-गीतकार आणि दिग्दर्शक जी.आर. सेठी ‘शाड’ आणि संगीत मधुलाल दामोदर मास्टर यांनी दिले होते. बाबूभाई मिस्त्री सुरुवातीच्या काळात चित्रपटांचे पोस्टर्स बनवणे आणि सेट निर्मितीत मदत करणे असे काम करत होते परंतु हळूहळू ते चित्रपटातील सर्व बाबींकडे लक्ष देऊ लागले. याचा परिणाम म्हणून त्यांनी संधी मिळताच चित्रपट निर्मितीच्या उर्वरित विभागात काम करण्यास सुरवात केली. आणि मग ओळखी मुळे लोकांचा बाबूभाईंवरचा विश्वास वाढत गेला. याच दरम्यान नानाभाई भट्ट आणि विजय भट्ट हे ‘ख्वाब की दुनिया’ चित्रपट बनवत होते व ते स्पेशल एफ़ेक्ट्सच्या अडचणीत होते, त्या काळी भारतात स्पेशल एफ़ेक्ट्सची कोणाला माहिती नव्हती. पण बाबूभाई मिस्त्री यांनी डोके वापरून त्यांची अडचण दूर केली जेबीएच वाडिया आणि होमी वाडिया या वाडिया बंधूंची वाडिया मोव्हिएटोन कंपनी धार्मिक, स्टंट व फ़ैंटेसी चित्रपट बनवत असत ‘ख्वाब की दुनिया’ चित्रपटाच्या यशानंतर वाडिया बंधूंनी बाबूभाईंना बोलावून चित्रपटांच्या स्पेशल एफ़ेक्ट्सची जबाबदारी दिली.

आपल्या करीयर मध्ये बाबूभाई मिस्त्री यांनी नूर-ए-यमन’,‘सर्कसवाली’,‘अलादीन और जादुई चिराग़’,‘गुलसनोवर’,‘अलीबाबा और चालीस चोर’,‘अंगारे’, ‘जगदगुरू शंकराचार्य’,‘वीर राजपूतानी’,‘पाकदामन’,‘नवदुर्गा’,‘मिस्टर एक्स’,‘अंगुलीमाल’,‘जनम जनम के फेरे’,‘हमराही’,‘लव इन टोकियो’,‘मेरा नाम जोकर’,‘जुगनू’,‘नागिन’,‘वॉरंट’,‘ड्रीम गर्ल’,‘बारूद’,‘धर्मवीर’,‘बंडलबाज’,‘ख़ुद्दार’,‘ज़माने को दिखाना है’अशा अनेक चित्रपटाच्या स्पेशल एफ़ेक्ट्स साठी व‘महाभारत’, ‘शिवमहापुराण’, ‘कृष्णा’ और ‘विश्वामित्र’या मालीकाच्या साठी काम केले. ‘औरत’या चित्रपटाच्या क्लाईमेक्स मध्ये बिल्डिंग पाडणे किंवा ‘ड्रीमगर्ल’ या चित्रपटाच्या शीर्षक गाण्यात हेमा मालिनी यांना हवेत दाखवणे हे सर्व बाबूभाई मिस्त्री यांच्या कल्पनाशक्तिची कमाल होती. १९९० साली आलेला रतन मोहन द्वारा निर्मित ‘हातिमताई’. हा चित्रपट बाबूभाई मिस्त्री यांचा शेवटचा चित्रपट होता. बाबूभाई मिस्त्री यांचे २० डिसेंबर २०१० रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4231 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..