नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

अफाट कर्तृत्वाच्या वडिलांची तेवढीच अफाट कन्या.. !

“अफाट कर्तृत्वाच्या वडिलांची ही तेवढीच अफाट कन्या.. ! संयुक्त महाराष्ट्राचा लढा, आचार्य अत्रे, ‘नवयुग’ आणि ‘मराठा’ व ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै..! ‘हायकू’ हा जपानी काव्यप्रकार मराठीत रुढ करणा-या ज्येष्ठ कवयित्री म्हणजे शिरीष पै. असंख्य कविता, कथा शिरीषताईनी लिहिल्या. मराठी दैनिकाच्या पहिल्या महिला संपादक म्हणून त्यांना बहुमान मिळाला. शिरीष पै यांच्या लेखनाची सुरुवात त्यांच्या पप्पांमुळे म्हणजे आचार्य अत्रे यांच्यामुळे झाली. त्यांच्याच लेखणीचा वारसा त्यांनी घेतला. त्यांच्या सहवासातच त्यांना लिखाणाची गोडी लागली. कथा, कविता, नाटक आणि प्रासंगिक लेखन असे चौफेर लिखाण त्यांनी केले. […]

आयुष्यात हास्याचे मळे फुलविणारा ‘मुक्री’

आयुष्यात हास्याचे मळे फुलविणारा मुक्री तथा मोहम्मद उमर अली मुक्री याचे आज पुण्यस्मरण त्यानिमित्त समीर परांजपे यांचे ब्लॉग मधून… हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसला. त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. […]

संगीतकार आदेश श्रीवास्तव

आदेश श्रीवास्तव हे अभिनेता बनण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीत आले होते. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९६४ रोजी झाला.”अंगारे‘ या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली. नंतर तब्बल दशकभर त्यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत काम केले. सन १९९३ मध्ये ‘कन्यादान’ या चित्रपटातून संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी पदार्पण केले. त्यानंतर १०० हून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. यात ‘चलते चलते’, ‘बाबुल’, ‘बागबान’, ‘कभी खुशी […]

नामवंत हिंदी लेखक व पत्रकार धर्मवीर भारती

धर्मवीर भारतीं यांचे आडनाव वर्मा. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९२६ रोजी अलाहाबाद येथे झाला. १९४७ मध्ये हिंदी साहित्याची पदवी संपादन केलेले भारती विद्यार्थीदशेपासूनच स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभागी होते. स्वातंत्र्योत्तर काळात काही काळ त्यांनी हिंदी साहित्याचे अध्यापन केले.नंतर ‘अभ्युदय’ या हिंदी साप्ताहिकेतून आपल्या पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. अलाहाबाद विद्यापीठात काही काळ हिंदीचे अध्यापन करून १९६० मध्ये टाईम्स समूहाच्या […]

शाहीर कृष्णा गणपत साबळे

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” अशी गर्जना करून शाहीरी परंपरा अगदी अलिकडच्या काळापर्यंत जपून ठेवणारे शाहीर म्हणजे शाहीर कृष्णा गणपत साबळे यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. तिसऱ्या इयत्तेत असताना शाहीर अमळनेरला गेले. तेथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे, हे त्यांच्या ध्यानात आले आणि त्यांची आवड आजीच्या कानावर गेल्यानंतर पुढे आणखी काही व्याप […]

बंगालीतील महानायक अरुणकुमार चटर्जी ऊर्फ उत्तमकुमार

त्यांनी अभिनयासोबत काही चित्रपटांचे दिग्दर्शक व निर्माती पण केली होती. त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. त्यांनी बंगाली भाषेमधील चित्रपटांशिवाय काही हिंदी चित्रपटांमधूनही त्याने अभिनय केला. १९५३-१९७५ या काळात बंगाली चित्रपटांत उत्तम कुमार यांची सुचित्रा सेन यांच्यासोबत त्यांची जोडी चांगली जमली होती आणि या जोडीचे अनेक चित्रपट गाजले. अभिनेते उत्तमकुमार यांच्यासमवेत सुचित्रा सेन यांनी ३० चित्रपट […]

बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबला वादक पद्मविभूषण किशन महाराज

किशन महाराज बनारस घराण्याच्या कंठे महाराजांचे शिष्य होते. त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. त्यांच्या योगदाना बद्दल भारत सरकारने त्यांना १९७३ साली पद्मश्री आणि त्यानंतर २००२ साली त्यांना पद्मविभूषण देऊन गौरविण्यात आले होते. त्यांना काशी विद्यापीठ आणि रवींद्र विद्यापीठातर्फे डॉक्टरेट ही उपाधीही देण्यात आली होती. किशन महाराज यांचे ४ मे २००८ रोजी निधन झाले. संजीव […]

सुप्रसिद्ध बॉलीवुड मधील संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील प्यारेलाल

प्यारेलाल रामप्रसाद शर्मा उर्फ प्यारेलाल यांना हिंदी चित्रपटाचा संगीतकार व्हायचे नव्हते, तर येहुदी मेन्यूहीनसारखे व्हायोलिनवादक व्हायचे होते. त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९४० रोजी झाला. त्यासाठी सतराव्या वर्षी ते व्हिएन्नाला जायला निघाले होते, पण लक्ष्मीकांत कुडाळकर उर्फ लक्ष्मीकांत यांनी त्यांना थांबवले व दोघे ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ या नावाने संगीत देऊ लागले; आणि हिंदी सिने-सृष्टीत सुप्रस्थापित झाले. प्यारेलाल यांच्या […]

निसर्गकवी माधव केशव काटदरे

‘हिरवे तळ कोकण’ लिहिणारे काटदरे हे अर्थातच कोकणातील होते. त्यांचा जन्म ३ डिसेंबर १८९२ रोजी झाला. पण त्यांचे बरेचसे आयुष्य नोकरीनिमित्त मुंबईत गेले. त्यांची नोकरी कस्टम खात्यात होती. माधव काटदरे यांनी केवळ निसर्गकविताच लिहिली, असे नाही. ऐतिहासिक कविताही त्यांनी विपुल लिहिली. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, सवाई माधवराव, मस्तानी अशा विविध व्यक्तिरेखा त्यांनी काव्यबद्ध केल्या. याशिवाय शिशुगीते, विनोदी […]

लयभास्कर, तालकंठमणि लक्ष्मण पर्वतकर उर्फ खाप्रुमामा

खाप्रुमामा ना त्यांची आई ‘खाप्रु’ असे म्हणत व तेच नाव पुढे रुढ झाले. त्यांनी संगीताचे प्रारंभिक धडे त्यांचे काका सारंगीवादक रघुवीर पर्वतकर यांचेकडुन व तबल्याचे शिक्षण चुलते हरिश्चंद्र पर्वतकर यांच्याकडून घेतले. तसेच पखवाजाचे धडे आपल्या चुलत भावाकडुन घेतले. खाप्रुजींना लयकारीची दैवी देणगी होती. दिलेल्या लयीच्या कितीहीपट लय ते वाजवून दाखवू शकत असत. तसेच एखादा तालाचा ठेका […]

1 285 286 287 288 289 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..