कमलाबाई यांचे वडील उत्तम किर्तनकार तर आई दुर्गाबाई कामत आवडीने सतार वाजवावत. त्यांचा जन्म ६ सप्टेंबर १९०१ रोजी झाला. त्यामुळे कानावर सतत सुरेल स्वर आणि मंजुळ स्वर ऐकतच कमलाबाई लहानाच्या मोठ्या होत होत्या. पण घराची हलाखीची अवस्था असल्याने अवघ्या पाचव्या वर्षापासून कमलाबाईंनी मेळा तसंच जत्रांमधून कामं करायला सुरुवात केली. आणि याच मेळ्याच्या माध्यमातून त्यांच्यावर संवाद,संगीत आणि […]
“कल हो ना हो ‘,” कुछ कुछ होता है’ यश जोहर,या ब्लॉकबस्टर चित्रपटचे निर्माते म्हणून प्रसिध्द होते. त्यांचा जन्म ६ सप्टेंबर १९२९ रोजी झाला. त्याच्या चित्रपटात भव्य सेट्स आणि विदेशी ठिकाणी शुटींग केलेले चित्रपट ही त्याची खासियत होती. १९७७ साली यश जोहर यांनी त्यांच्या स्वत:च्या नावाने धर्म प्रॉडक्शन ही कंपनी सुरू केली. १९८० ते १९९० मध्ये […]
लीलावती भागवत या माहेरच्या लीला पोतदार. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर, १९२० रोजी झाला.मराठी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असलेल्या लीलावती भागवत यांनी काही काळ शिक्षिका म्हणून काम केले. आकाशवाणी मुंबई केंद्रामध्ये त्यांनी वनिता मंडळ हा कार्यक्रम यशस्वी केला. या वनिता मंडळामुळे अनेक प्रतिभावंत स्त्रियांचा समाजाला परिचय झाला. आहारशास्त्रावर बोलण्यासाठी लीलावती पुष्कळदा वसुमती धुरू यांना बोलवायच्या. त्यांतूनच वसुमती […]
पंडित केशव गिंडे मूळचे अभियंते, मुलानेही कोणती तरी कला शिकावी, असे पंडित केशव गिंडे यांच्या आईला वाटत होते. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९४२ रोजी बेळगाव येथे झाला. त्यातून त्यांनी सुरवातीला उभी बासरी आणून दिली. वयाच्या आठव्या वर्षी शाळेत बासरीवर पंडित केशव गिंडे यांनी “राष्ट्रगीत’ वाजविले. १९७० साली ते पुण्यात आले. त्याच दरम्यान पुणे आकाशवाणीवर त्यांची निवड […]
रॉय किणीकर यांचे वडील वकील होते. रॉय किणीकरांनी आयुष्यातील बहुतांश काल कर्नाटकातील गुलबर्गा येथे घालवला. पुढचा काही काळ त्यांनी पुण्यात आणि औरंगाबादेत व्यतीत केला. रॉय किणीकर हे औरंगाबाद येथून प्रकाशित होणार्या दैनिक अजिंठाच्या रविवारच्या आवृत्तीचे संपादक होते. रविवार पुरवणीत ते काही ना काही ललित लेखन करीत असत. रॉय किणीकर यांनी काही नाटकांत भूमिका केल्या होत्या. औरंगाबाद […]
सलिल चौधरी यांचे वडील आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये डॉक्टर म्हणून काम करीत. सलिल चौधरी यांचे बालपण चहाच्या मळ्यांच्या निसर्गरम्य परिसरात गेले. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२२ रोजी झाला. ब्रिटीश मालकवर्गाच्या सहवासामुळे आणि जात्याच आवड असल्यामुळे सलिलदांच्या वडिलांनी पाश्चात्य संगीताच्या ध्वनीमुद्रिकांचा प्रचंड संग्रह केला होता. कुशाग्र बुद्धीमत्ता आणि ग्रहणशीलता असल्यामुळे कुठल्याही गुरूच्या मार्गदर्शनाशिवायच ते स्वरमालिका शिकले एवढेच नव्हे […]
स्मिता तळवलकर या माहेरच्या स्मिता गोविलकर. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९५५ रोजी झाला.स्मिता तळवलकर यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या हुजुरपागा शाळेत झाले. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र हे विषय घेऊन बी. ए. झाल्यावर स्मिता तळवलकर यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमही केले होते. त्यांनी १९७२ साली मुंबई दूरदर्शनवरून वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्द सुरू केली होती. तब्बल सतरा वर्षे त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणून काम […]
” कोकणचा बालगंधर्व” असा ज्याचा उल्लेख केला जातो, देशभरातील अनेक मान्यवरांनी ज्यांची प्रशंसा केली, देशभरातील प्रतिष्ठेचे कैक पुरस्कार ज्याच्या अभिनयाने आपल्याकडे खेचून आणले.” कलावंत हा नेहमी साधाच असतो, माझ्या सौंदर्याने आणि कलेने मला लोकांत ओळख दिली. एकदा तोंडाला रंग चढविल्यानंतर मी त्यांचा होऊन जातो…!” दशावतार कोकणची एक कला ही जीवंत ठेवण्यात ओमप्रकाशचा हात मोलाचा आहे. जास्त धनाची अपेक्षा न बाळगता कलेची श्रीमंती त्यांच्या चेहर्यावर तरळत असते. सततची जागरणं आणि लोकांचे मनोरंजन आयुष्यभर या रंगमंचाची सेवा. खरंच ग्रेट ओमप्रकाश..! तुझ्यातील कलावंताला माझा सलाम…! […]
बॉलिवूडचे मोठे घराणे म्हणून ओळखल्या जाणा-या कपूर घराण्यातील राज कपूर यांचे पुत्र ऋषी कपूर. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी झाला. आपल्या पहिल्याच चित्रपटात एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत, आपल्या वडिलांच्या लहानपणची भूमिका करताना तो निळ्या डोळ्यांचा, गोंडस मुलगा ,गोल चेहरा आणि चेहऱ्यावरचे स्मितहास्य …. दिलेली भूमिका त्याने फक्त व्यवस्थितपणे पार पडलीच नाही तर त्यात आपल्या अभिनयाची झलक […]
डॉ. दीपक अमरापूरकर हे जागतिक कीर्तीचे यकृताचे तज्ज्ञ डॉक्टर..! बॉम्बे हॉस्पिटलची शान, अचूक निदान करणारा, अतिशय बुद्धिमान डॉक्टर..! मूळ सोलापूरचा असलेला हा माणूस अतिशय कष्टातून आणि परिश्रमातून डॉक्टर झाला आणि आपल्या मनमिळाऊ हसतमुख स्वभावानं दुसर्याच्या मदतीला कायम तयार असायचा. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉ. दीपक अमरापूरकर मूळचे सोलापूरचे होते. देशातले नामांकित गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट (पोटविकारतज्ञ) म्हणून त्यांची ओळख होती. हरिभाई देवकरण शाळेत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. LJ वैद्यकीय शिक्षणही त्यांनी सोलापुरातूनच पूर्ण केलं. […]