मराठी रंगभूमीवरील प्रख्यात नट आणि नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्म २४ सप्टेंबर १८८९ रोजी झाला. दाते अवघे पाच वर्षांचे असताना त्यांचे वडील मरण पावले. घरची अत्यंत गरिबी असल्यामुळे इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत शिक्षण झाल्यानंतर चरितार्थासाठी केशवरावांनी मुंबई गाठली व तेथे सुरुवातीला त्यांनी कंपाऊंडर म्हणून काम केले. त्या काळात महाराष्ट्र नाटक मंडळींची काही नाटके पाहिल्यानंतर नट होण्याची महत्वाकांक्षा त्यांच्या मनात […]
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ, चिंतनशील गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ रोजी पुणे येथे झाला. आई-वडील शिक्षक असल्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती. तरीही मुलीनं डॉक्टर व्हावं, अशी आई-वडिलांची तीव्र इच्छा होती, पण हॉस्टेलवर एकटीनं राहण्याची तयारी नसल्यामुळे त्यांना डॉक्टर होण्याचा नाद सोडावा लागला. शेवटी शास्त्र शाखेतली पदवी संपादन करून नंतर त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. […]
सुमारे तीन दशके आपली रोमँटिक गाणी देणारे हिंदी चित्रपट गीतकार लालजी पांडेय उर्फ अंजान यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९३० वाराणसी येथे झाला. अंजान गंगेकाठच्या वाराणसीतच लहानाचे मोठे झाले. गंगेच्या घाटावर फिरताना त्यांच्या काव्यप्रतिभेला एक आगळी खोली लाभली. त्यातूनच पुढे आला एक प्रतिभावंत गीतकार. आपल्या अद्वितीय गीतरचनांमुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. […]
पं. मल्लिकार्जुन मन्सूर भारतीय संगीताच्या क्षेत्रातले उच्चकोटीचे गायक होते. घराणेदार गायकीचे दर्शन घडवणारी त्यांची गायकी शुद्धता, सूक्ष्मता याबरोबरच भावात्मक अभिव्यक्तीसाठी प्रसिद्ध होती. मन्सूर यांनी अवघड गायकीला मुलायमपणा आणला व लोकभिमुख संगीत दर्जेदार नसते, हा विचार चुकीचा ठरविला. भारत सरकारने मा.मल्लिकार्जुन मन्सूर यांना ‘पद्मश्री’ व ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला. […]
भक्ती बर्वे केवळ अभिनेत्री नाही, तर उत्तम निवेदिकाही होत्या. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १९४८ रोजी झाला. त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. गणेशोत्सवात छोट्या छोट्या नकलांपासून त्यांच्या अभिनयाला सुरवात झाली, असे म्हणावे लागेल. त्यांचे उत्तम पाठांतर असल्याने त्यांना पुढे आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली. त्या दूरदर्शनवर निवेदन करीत होत्या. त्या उपजत अभिनेत्री असल्यामुळे त्यांनी केलेली जवळजवळ सर्वच नाटके सुपर हिट […]
श्रीधर पार्सेकर हे व्हायोलीन जगतातील मूलभूत कला-सौंदर्य मूल्यांचा शोध घेणारे प्रतिभावंत होते. श्रीधर पार्सेकर यांनी १९४८ मध्ये, व्हायोलीन हे वाद्य शिकू इच्छिणाऱ्या साठी ‘स्वरनिनाद’ ही पुस्तिका लिहिली होती. ‘पार्सेकर आणि व्हायोलीन’ यात अभेदच होता, असे ‘पुलं’म्हणत असत. […]
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता अतुल कुलकर्णीचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाते. आत्तापर्यंत ७ भाषांमधून ६० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या अतुलने अनेक मानसन्मान प्राप्त केले. हा संवेदनशील अभिनेता सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर आपल्या लेखांद्वारे आणि मुलाखतींमध्ये रोखठोक मते मांडतांना पाहायला मिळतो. ‘हे राम’, ‘चांदनी बार’, ‘खाकी’, ‘पेज ३’, ‘रंग दे बसंती’, ‘वळू’, ‘नटरंग’, ‘पोपट’, ‘एका प्रेमाची गोष्ट’सारख्या चित्रपटांमधून त्याने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. […]
लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्चशिक्षित, प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते होते. त्यांचा प्रेम विवाह डॉ. चिटणीस ह्यांच्यांशी झाला होता. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता. लीला चिटणीस यांची रुपेरी पडद्यावरची कारकीर्द जशी […]
हे लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक, अभिनेता व संगीतकार होते. सुधीर फडके यांचा पहिला चित्रपट हा हिंदीच होता आणि त्याचे नाव होते गोकुल. ज्याची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली होती. या चित्रपटातील जी. एम. दुराणी यांनी गायलेले ‘कहां हमारे श्याम चले’ हे अतिशय सुंदर गीत होते. मोहम्मद रफी, यांनी आपली गायन शैली जी.एम.दुराणी यांच्या कडून प्रेरणा घेऊन […]