अनेकांना आत्मस्तुती आवडते. पण जयवंत दळवींसारख्या मोठय़ा साहित्यिकाला कोणी आपली स्तुती केली तर संकोचल्यासारखे वाटायचे. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. जयवंत दळवींच्या साहित्यात पारदर्शकताच जाणवते. त्यांच्या संपूर्ण साहित्यात त्यांच्या आरवलीच्या घराचे, गावाचे नि एकूणच कोकणातील लोकांचे प्रतिनिधित्व करणा-या माणसांचे चित्रण आढळते. जवळजवळ (कविता सोडून) लेखनाचे सर्व प्रांत काबीज करून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांचा […]
पं. वामनराव सडोलीकर यांच्याबद्दल आजच्या पिढीला काही माहित नाही, पण मागच्या दोन पिढ्या मात्र जरूर त्यांची आठवण काढतात. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९०७ रोजी कोल्हापूरपासून जवळच कोथळी गावी झाला. पं. वामनराव सडोलीकर यांना घरात भाऊ म्हणत. फार लहान वयात घर सोडून मुंबई आणि नाशिकला पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या ‘गांधर्व महाविद्यालया’त मा.पं. वामनराव सडोलीकर दाखल झाले. […]
वैद्यकीय कारणांसाठी रुग्णांना भूल देण्याचे वैद्यकीय तंत्र अॅलोपॅथीत एकोणिसाव्या शतकापासून विकसित झाले. या तंत्रात मोठी सुधारणा घडवून आधुनिक भूलशास्त्राचा विकास करणारे वैज्ञानिक व भूलतज्ज्ञ डॉ. एडमंड टेड एगर यांचे नुकतेच निधन झाले. दर वर्षी विशिष्ट औषधे श्वासावाटे देऊन भूल देण्याची प्रक्रिया आजघडीला ३० कोटी लोकांवर केली जाते. ही नवी प्रक्रिया विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. […]
केशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर ऊर्फ दाजी भाटवडेकर मूळचे मुंबईचे. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १९२१ रोजी झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात दाजींचे आजोबा मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर होते. त्याकाळी त्यांना मुंबईचे महापौरपदही मिळाले होते. त्यांचे घराणे संपन्नत असले तरी घरांत धार्मिक आणि संस्कृती जपणारे वातावरण होते.दर एकादशीला घरात कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम होत असे. दर पंधरवड्याला होणाऱ्या असल्या कार्यक्रमातील नाट्याचा […]
सध्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांमध्ये अजय-अतुल हे नाव आवर्जून घेतलं जातं. केवळ मराठीतच नाही तर हिंदी आणि तेलुगू भाषांमधील चित्रपटांसाठीही या जोडीने संगीत दिग्दर्शन केलंय. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या जोडीचे संगीत अनेकांनाच मंत्रमुग्ध करतं. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानलाही त्यांनी मंत्रमुग्ध केले आहे. या जोडीने आपल्या करीयरची सुरुवात विश्वविनायक या प्रसिद्ध अल्बमने केली. विश्वविनायक या अल्बममध्ये पारंपरिक आरती, […]
मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटककार अनंत विष्णू म्हणजेच बाबुराव गोखले यांचा जन्म १५ सप्टेंबर १९१६ रोजी झाला. बाबुराव गोखले, राजा गोसावी, शरद तळवलकर यांनी गाजवलेलं एव्हरग्रीन अस्सल दर्जेदार विनोदी म्हणजे नाटक ‘करायला गेलो एक’ त्यांचं गाजलेलं नाटक ‘करायला गेलो एक’ म्हणजे मनोरंजनाचा खच्चून भरलेला मसालाच! नव्या पिढीला बाबूराव गोखले यांची नाटके परिचित नाहीत, पण किमान डझनभर नाटकांनी […]
संगीततज्ञ गुरुवर्य प्रा.मा.बा. र. देवधर यांची एक विशेष ओळख म्हणजे पं कुमार गंधर्व ह्या महान गायकाचे ते गुरु …जवळ जवळ १२ वर्ष आपल्या जवळ ठेवून त्यांनी आपल्या ह्या शिष्याला घडवले. भारतातील आवाज साधना शास्त्र किंवा व्हॉइस कल्चरचे ते आद्य प्रणेते आहेत …. त्यांनी सिनेमाला संगीत देण्याचे कार्यही केले … किंबहुना भारतीय चित्रपट सृष्टीचे ते पहिले संगीतकार आहेत. […]
…… आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ असे जाहिरातीमधून प्रसिद्ध होताच नाट्यगृहे हमखास ‘हाऊस फुल्ल’ होत व त्यांच्या एन्ट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट होई. डॉ.काशीनाथ घाणेकर व्यवसायाने डेंटीस्ट होते. त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान अतुलनीय आहे. […]
वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी ऑल इंडिया रेडिओवर शास्त्रीय संगीताचे गायन करणार्या सहस्त्रबुद्धे यांनी निष्ठेने शास्त्रीय संगीताची सेवा केली. उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. ऑस्ट्रेलिया, युरोप, आखाती देश, तसेच उत्तर अमेरिकेसह विविध देशांत त्यांच्या गायनाचे कार्यक्रम झाले होते. त्यांनी अनेक शिष्य घडविले. […]
सतरंजी विक्रेत्यांपासून सुरूवात करणा-या सिप्पी यांनी १९५५ मध्ये चित्रपट कारर्कीदीला सुरूवात केली. शोले, सीता और गीता, सागर, शान या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती सिप्पी यांनी केली. शोले या अजरामर चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांचे नाव चिरंतन रसिकांच्या लक्षात राहिल. […]