नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

नटश्रेष्ठ जयशंकर दानवे

राजकपूरना प्रथम “वाल्मिकी” चित्रपटात नारदाचा मेकअप करून हिंदी सिनेसृष्टीला शो मन देणारे, सुलोचना या हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या अभिनेत्रीला “करीन ती पूर्व” या रंगमंचावरील नाटकाद्वारे प्रथम अभिनय क्षेत्रात आणणारे आणि “जयभवानी” या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून प्रथमच त्यांना मुख्य नायिकेची संधी देणारे, “ ऐका हो ऐका” या नाटकातून गणपत पाटील यांना नाच्याची पहिली टाळी शिकविणारे व राजशेखर यांना […]

लेखक,कवी वि.स.खांडेकर

वि.स. खांडेकर यांचे संपूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर. त्यांचा जन्म १९ जानेवारी १८८९ रोजी झाला. वि.स. खांडेकर यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. कुमारवयापासूनच त्यांच्यावर उत्तम साहित्याचे संस्कार होत होते, ते त्यांच्या मराठीच्या शिक्षकांमुळे आणि […]

उस्ताद विलायत खाँ यांचे निकटवर्तीय शिष्य पं. मधुकर दीक्षित

वडिलोपार्जित त्यांचा भिक्षुकी व्यवसाय होता. त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९३५ रोजी वाराणसी येथे झाला. त्यांच्या कुटुंबात कोणतीही संगीताची पूर्वपीठिका नसताना त्यांना बालवयातच संगीताची आवड निर्माण झाली होती. परंतु, कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यांची सतार वादनाची आवड लक्षात घेऊन त्यांच्या वडील बंधूनी त्यांना त्या काळी सतार विकत घेण्यास ३५ रुपयांची मदत करून, त्यांना सतार शिकण्यास प्रोत्साहित […]

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे उर्फ खळे काका

‘भेटी लागी जीवा…’ सारख्या आर्त अभंगापासून ‘कळीदार कपुरी पान…’ सारख्या अस्सल बैठकीच्या लावणीपर्यंत आणि ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती…’ सारख्या चिमखड्या बालगीतापासून ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ सारख्या रांगड्या शब्दांना अतिशय चपखल चालीचे कोंदण देणारे श्रीनिवास खळे यांना बडोदे येथील सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून गाण्याचे पहिले धडे मिळाले. त्यांचा जन्म ३० एप्रिल १९२६ रोजी मुंबई […]

उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथालेखक राजिंदरसिंग बेदी

सुरुवातीस राजिंदरसिंग बेदी यांनी पंजाबीत लेखन केले; पण नंतर ते उर्दूतून लिहू लागले. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९१५ रोजी झाला. त्यांच्या पंजाबीतील कथांचे हड्डीआँ ते फुल्ल (१९४२) व घर विच बजार विच (१९४४) हे दोन संग्रह होत. आपल्या कथालेखनाची सुरुवात त्यांनी प्रख्यात रशियन लेखक चेकॉव्ह याच्या लेखनाने प्रभावित होऊन केली होती. चेकॉव्हशिवाय त्यांनी टॉलस्टॉय, ब्रेट हार्ट, […]

हिंदी रंगमंचावरील प्रख्यात रंगकर्मी हबीब तन्वर

सर्जनशीलता, व्यासंग, नव्याचा ध्यास आणि रंगमंचावर नवनवे प्रयोग करणारे तन्वर यांनी जीवनात नेहमी साधेपणाचीच कास धरली, त्यामुळे आपले शिष्यगण, मित्र, आप्तेष्ट यांच्यात ते कमालीचे लोकप्रिय होते. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. चरणदास चोर व आगरा बाजार या सारख्या नाटकातून लाखो नाट्य रसिकांच्या ह्रदयावर त्यांनी राज्य केले. शतरंज के मोहरे, लाला शोहर राय, मिट्टी की गाडी, गाव […]

मराठी कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते

कवी बी हे नामाभिधान धारण करून नारायण मुरलीधर गुप्ते यांनी आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठीचिये नगरी मधील विचाराचे व कल्पनेचे कुंज काही काळ निनादवून सोडले व तेथील रसिक रहिवाशांवर आपल्या गीतमाधुर्याची जबरदस्त मोहिनी घातली. त्यांचा जन्म १ जून १८७२ रोजी झाला. खरे सांगायचे म्हणजे ‘बी’ हे कवींचे कवि आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या […]

प्रसिद्ध गीतकार शंकरदास केसरीलाल उर्फ शैलेंद्र

शंकरदास केसरीलाल हे शैलेंद्र यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९२३ रोजी झाला. १९४७ साली एका कार्यक्रमात काव्यवाचनाचे त्याला निमंत्रण आले. तेथे त्याने ‘जलता है पंजाब’ ही कविता सादर केली. त्या कार्यक्रमाला राज कपूर उपस्थित होते. त्याने शैलेंद्र यांची कविता ऐकली आणि ते भारावले. त्याने शैलेंद्र यांना गाठले. तेव्हा राज कपूर ‘आग’ बनवत होता. ‘आग’साठी […]

गायक जयवंत कुलकर्णी

आपल्या जादुई स्वरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तर कधी थिरकायला लावणारे गायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९३२ रोजी झाला.जयवंत कुलकर्णी यांनी गायनाचे धडे प्रसिध्द शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडुन गिरवले, त्यासोबतच हार्मोनियम वाजवण्याची कला सुध्दा त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवासकर यांच्यामुळेच मिळाली. त्यांच्या आवाजातील गाण्यांवर सत्तरच्या दशकातील तरुणाई इतकी फीदा होती की, महाविद्यालयात […]

पंजाबी आणि हिंदी मधील प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम

अमृता प्रीतम यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९१९ रोजी झाला. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी महत्त्वपूर्ण साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित […]

1 286 287 288 289 290 391
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..