डॉ. व्हालिदीमीर डेमीखॉव्ह सोव्हिएत युनियन मधील आघाडीचे वैज्ञानिक व प्रत्यारोपण-शल्यविशारद होते. त्यांनी श्वानहृदय व फुफ्फुसांचे प्रत्यारोपण तर केलेच पण एका श्वानमस्तकाचे प्रत्यारोपणही केले. त्यामुळे त्यांचे नाव अधिकच चर्चेत आले. त्यांच्या या प्रयोगापासून स्फूर्ती घेऊन डॉ. रॉबर्ट व्हाईट यांनी तसाच प्रयोग माकडांवर करून पाहिला. डॉ. डेमीखॉव्ह यांनी ‘ट्रान्सप्लॅन्टोलॉजी’ ह्या शब्दाला जनकत्व दिले. […]
मराठी सिने इंडस्ट्रीत गेल्या चार-पाच वर्षांत आमूलाग्र बदल पाहायला मिळालेत. मराठी कलाकार अपडेट झालाय, त्याचा कॉस्च्यूम सेन्स वाढलाय, त्याचं फॅशन स्टेटमेंट बदललंय अशी वाक्यं आपण या काही वर्षांत नेहमी ऐकतो. या इंडस्ट्रीचा चेहरामोहरा अशा पद्धतीने बदलायला लावणारी काही मोजकी तरुण नावं कारणीभूत ठरली आहेत. या तरुणांच्या यादीत संतोष जुवेकरचा क्रमांक वरच्या यादीत लागेल. […]
भाऊ पाध्ये यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे असे. मुंबईतील संक्रमणकाळ त्यांच्या लेखणीने नेमकेपणाने व बारकाव्यानिशी टिपला होता. पाध्येंनी मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत व एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना अभिव्यक्त केल्या आहेत. […]
शाहिद कपूरचा मुंबईत पंजाबी कुटुंबात जन्म झाला. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९८१ रोजी झाला.बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शक पंकज कपूर आणि अभिनेत्री व शास्त्रीय नर्तिका नीलिमा हे शाहिद कपूरचे आईवडील. शाहिदने लहान असतानाच अभिनय क्षेत्रात पर्दापण केले होते. एक उत्कृष्ट अभिनेत्याशिवाय तो उत्तम डान्सरदेखील आहे. शाहिद ३ वर्षांचा असताना त्याचे आईवडील वेगळे झाले होते. यानंतर तो आपल्या आईसोबत दिल्लीत […]
सृदृढ देहयष्टी, स्टायलिश अंदाज, बारीक पण तीक्ष्ण डोळे, अॅग्रेसिव्ह बॉडी लँग्वेज, गरजणारा आवाज आणि पावरफुल स्क्रिन प्रेझेंस या जोरावर या खलनायकाने अमिताभ बच्चनसारख्या सुपरस्टारलाही रुपेरी पडद्यावर तगडी टक्कर दिली. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९४८ रोजी सिक्किममध्ये झाला.अग्निपथचा कांचा चीना, मेरे अपनेमधला सडकछाप संजू, धुंदमधला अपंग तरीही क्रूर पती, हममधला बख्तावर, क्रांतीवीरचा चतुर सिंग चीता किंवा मग कातिया…या खलनायकाचे निर्दयी […]
विठ्ठलराव गाडगीळ स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री नरहर विष्णू उर्फ काकासाहेब गाडगीळ यांचे चिरंजीव. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९२८ रोजी झाला. मराठी राजकारणी आणि काँग्रेसपक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आणि राज्यसभा व लोकसभेचे खासदार आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील होते. विठ्ठलराव गाडगीळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. ते संसदीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, १९७१ आणि १९७६ मध्ये राज्यसभा सदस्य […]
एस.एच.बिहारी यांचे पूर्ण नाव शमशूल हुदा बिहारी. आपल्या या रोमँटिक गीतलेखनाने तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे एस. एच. बिहारी यांचा जन्म बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील अरा येथे. लहानपणापासूनच त्यांना भाषेचे प्रचंड वेड. त्या वेडातून त्यांनी हिंदी, उर्दू आणि बंगाली भाषांवर प्रभुत्व मिळवले. पण भाषेइतकेच एस. एच. बिहारी यांना फुटबॉलचेही वेड होते. कोलकात्याच्या मोहन बगानकडून तरुणपणी […]
मधुरिका पाटकर हे नाव गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने समोर आलं ते तिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे. तिला शिवछत्रपती पुरस्कारानं (२००८-२००९) सन्मानित केले असून तिचा युथ नॅशनल चॅम्पियनशिप (२००६) अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. खेळात वेगळं नाव कमावलेल्या आणि शेकडो पदकांवर यशाची मोहोर उमटवणाऱया मधुरिकाचं प्रोफाइल शूट करण्याची पहिली संधी मला २०१३ साली मिळाली. तिच्या याच पदकांसोबत तिचा एक फोटो टिपायचा मला मोह आवरला नाही. […]
डॉ. वरदा गोडबोले किराणा गायन शैलीतील एक आश्वासक नाव. सुरांच्या वाटेवर तिची वाटचाल सुरू आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याची संस्कारसंपन्न गायकी अंगी बाळगलेल्या गायक आणि गायिकांची यादी फार तगडी आहे. किराणा घराण्याचे उस्ताद करीम खां यांच्या तालमीत के. डी. जावकर, सवाई गंधर्व आणि बाळकृष्ण बुवा कपिलेश्वरी हे दिग्गज गायक तयार झाले. पुढे सवाई गंधर्व यांच्याकडे […]
‘हार्ट-लंग’ मशीनच्या विकासामुळे ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रियेची गरज अधिकांशाने पूर्ण झाली. डॉ. जॉन हेशॅम गिबन (ज्युनिअर) यांच्याकडे या प्रणालीच्या विकासाचे जनकत्व जाते. दि. ६ मे १९५३ रोजी डॉ. गिबन यांनी ‘हार्ट-लंग’ मशीनच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली. यशस्वीपणे पार पडलेली ही पहिली ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया मानली जाते. […]